Home /News /entertainment /

बुरखा घालून प्रसिद्ध अभिनेत्रीने केलं असं काही, VIDEO पाहताच भडकले युजर्स

बुरखा घालून प्रसिद्ध अभिनेत्रीने केलं असं काही, VIDEO पाहताच भडकले युजर्स

अभिनेत्रीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) होत आहे. ज्यामध्ये ती बुरखा घालून एका मॉलमध्ये डान्स करताना दिसत आहे.

  मुंबई,22 जून-  कंगना राणौतच्या 'लॉक अप'   (Lockupp)  मधून चर्चेत आलेली बॉलिवूड अभिनेत्री मंदाना करीमी   (Mandana Karimi) आता एका नव्या वादात अडकताना दिसत आहे. अभिनेत्रीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video)  होत आहे. ज्यामध्ये ती बुरखा घालून एका मॉलमध्ये डान्स करताना दिसत आहे. अभिनेत्रीची हा अंदाज अनेक  लोकांना पसंत नाही पडला. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर लोकांनी तिला प्रचंड  ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. त्यानंतर मंदानानेही ट्रोलर्सला  चोख प्रत्युत्तर दिलं आहे. सर्वप्रथम, मंदानाच्या त्या व्हिडिओबद्दल बोलूया, ज्यामुळे तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. व्हिडिओमध्ये, मंदाना तुर्कीच्या इस्तंबूलमधील एका मॉलमध्ये काळ्या रंगाच्या बुरख्यात 'द बीटनट्स शाकाबूम'वर डान्स करताना दिसत आहे. मंदानाने स्वतः हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.  जो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तिने कॅप्शनमध्ये लिहलंय, "माझी इच्छा आहे की हिजाबसह शूटिंग करता आलं असतं तर, आणि ते या BTS इतकं सोपं असतं तर... काही  तिरस्कार नाही, फक्त चित्रपट बनवणाऱ्यांचा झुंड."असं कॅप्शन देत अभिनेत्रीने हा व्हिडीओ शेअर केला आहे.
  मंदानाने आपल्या इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ शेअर करताच अनेकांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. अनेकांनी मंदानाला हिजाबचा अनादर करणारी व्यक्ती असंही म्हटलं आहे. अनेक युजर्सनी कमेंट्स करत तिला हिजाबचा अनादर न करण्याचा सल्ला दिला आहे. तर काहींनी तिला अनफॉलो करण्याचंही म्हटलं आहे. लोकांच्या अशा गोष्टींनी व्यथित झालेल्या मंदानाने आता ट्रोल करणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर दिलं आहे.पाहूया अभिनेत्रीने काय म्हटलंय. (हे वाचा:असा आहे अनुष्का शर्माचा फिटनेस फंडा; अभिनेत्रीने शेअर केली आपली Yoga Journey  ) या सर्व प्रकारानंतर मंदनाने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर तिच्या शॉर्ट ड्रेसमधील एक फोटो शेअर केला आहे. फोटोसोबत तिने कॅप्शनमध्ये लिहलंय, “मी माझ्या बुरख्यावरील व्हिडीओमध्ये लोकांच्या कमेंट वाचत आहे. लोक खरंच वेडे आहेत. हे  जग वेडं आहे. मला युनिकॉर्न व्हायचं आहे." मंदानाच्या या उत्तरानंतर अनेकांनी तिचा व्हिडिओ सकारात्मक दृष्टिकोनातूनही घेतला आहे आणि मंदानाच्या धाडसाचं  आणि नृत्याचं कौतुक केलं आहे. फक्त लॉकअपचं नव्हे तर मंदना 'बिग बॉस'मध्येसुद्धा सहभागी झाली होती.
  Published by:Aiman Desai
  First published:

  Tags: Bigg boss, Entertainment

  पुढील बातम्या