मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

सलमान खानच्या ‘राधे’ चित्रपटातील या प्रसिद्ध अभिनेत्याला कोरोना; रुग्णालयात उपचार सुरू

सलमान खानच्या ‘राधे’ चित्रपटातील या प्रसिद्ध अभिनेत्याला कोरोना; रुग्णालयात उपचार सुरू

Bigg Boss 8 चा विजेता झालेल्या या अभिनेत्याने नुकतंच सलमानसोबत (Salman Khan) 'राधे' (Radhe) सिनेमात काम केलं आहे. कोरोनाबाधित (Corona) झाल्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

  • Published by:  Amruta Abhyankar
मुंबई, 31 डिसेंबर : 2020 मध्ये अनेक सेलिब्रिटींनादेखील कोरोनाची बाधा (Coronavirus) झाली. यात थेट अमिताभ बच्चनपासून ते नव्या दमाच्या कृती सेनॉन आणि वरुण धवन यांचाही समावेश होता. आता यात आणखी एका नावाची भर पडली आहे. बिग बॉस सिझन 8 (Bigg Boss 8) चा विजेता गौतम गुलाटीला (Gautam Gulati) कोरोनाची लागण झाली आहे. सोशल मीडियावरुन त्याने स्वत: ही माहिती दिली. बिग बॉस सिझन 8 चा विजेता गौतम गुलाटीला कोरोनाची लागण झाली आहे. तो सध्या लंडनमध्ये आहे. त्याच्या चाहत्यांना जेव्हा ही बातमी समजली तेव्हापासून ते गौतम लवकर बरा व्हावा यासाठी प्रार्थना करत आहेत. गौतमने हॉस्पिटलमधील एक व्हिडीओदेखील इन्स्टा स्टोरीजवर शेअर केला आहे. इंडस्ट्रीमधील अनेक कलाकारांनीदेखील त्याला लवकर बरं होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. गौतमच्या पोस्टवर श्रृती हसन, पराह खान यांनी कॉमेंट्स केल्या आहेत.
View this post on Instagram

A post shared by (@welcometogauthamcity)

गौतम गुलाटीचं बेशरम बेवफा गाणं काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालं होतं. यामध्ये त्याच्यासोबत दिव्या खोसला कुमार आणि सिद्धार्थ गुप्ताही झळकले होते. हे गाणं प्रेक्षकांना अतिशय आवडलं होतं. तसंच गाण्यामधील दिव्याची आणि त्याची केमिस्ट्रीदेखील प्रेक्षकांना अतिशय आवडली होती. गौतमने सलमान खानसोबत राधे सिनेमातही काम केलं आहे.
First published:

Tags: Bigg boss, Coronavirus

पुढील बातम्या