Home /News /entertainment /

झायरा वसीमनंतर आता आणखी एका अभिनेत्रीनं इस्लामसाठी सोडलं बॉलिवूड, म्हणाली...

झायरा वसीमनंतर आता आणखी एका अभिनेत्रीनं इस्लामसाठी सोडलं बॉलिवूड, म्हणाली...

एक पोस्ट शेअर कर सना खान (Sana Khan)ने असं म्हटलं आहे की, 'माझ्यासाठी सर्वात आनंदाचा क्षण. अल्लाह माझ्या या प्रवासात मला करेल आणि रस्ता दाखवेल.

  मुंबई, 09 ऑक्टोबर : बिग बॉस-6 (Bigg Boss 6) ची स्पर्धक आणि बॉलिवूड अभिनेत्री सना खान (Sana Khan) हिने देखील अभिनय क्षेत्र सोडण्याचा निर्णय घेतला आहे. अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर पोस्ट करत याबाबत माहिती दिली. अभिनत्री सना खान देखी झायरा वसीमच्या मार्गावर चालताना दिसत आहे. अभिनेत्रीने तिच्या मेसेजमध्ये असे करण्याचे कारण धर्म सांगितले आहे. तिच्या आयुष्यातील हा महत्त्वाचा निर्णय असल्याचे म्हणत अभिनेत्रीने याबाबत आनंद व्यक्त केला आहे. एक पोस्ट शेअर कर सना खान (Sana Khan)ने असं म्हटलं आहे की, 'माझ्यासाठी सर्वात आनंदाचा क्षण. अल्लाह माझ्या या प्रवासात मला करेल आणि रस्ता दाखवेल.' तिने एक नोट या पोस्टमध्ये शेअर केली आहे. ज्यात सना खानने असे म्हटले आहे की, 'बंधू आणि भगिनींनो, मी आता माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या वळणावर येऊन ठेपले आहे आणि याबाबत मी आता तुमच्याशी बोलत आहे. मी अनेक वर्षांपासून फिल्म इंडस्ट्रीमध्ये आहे. या काळात मला किर्ती, इज्जत आणि संपत्ती मिळाली. माझ्या चाहत्यांकडून हे सर्व मिळाले, ज्यासाठी मी कृतकृत्य आहे.' (हे वाचा-'जिवंतपणी त्यांच्यासाठी काही करू शकलो नाही',विलासरावांबद्दल बोलताना रितेश भावुक) तिने पुढे असं म्हटलं आहे की, 'मात्र काही दिवसांपासून मला असं वाटत आहे की जगात येण्याचं उद्दिष्ट केवळ संपत्ती आणि किर्ती मिळवणे एवढंच आहे का?  निराधार लोकांसाठी आयुष्य घालवणे हे त्याचे कर्तव्य नाही का? काय त्याने असा विचार नाही केला पाहिजे का की मृत्यू कधीही येऊ शकतो आणि मेल्यानंतर त्याचे काय होणार आहे? या दोन्ही प्रश्नांची उत्तरं मी शोधतेय. विशेषत: दुसऱ्या प्रश्वाचे उत्तर, मरणानंतर माझे काय होईल?'
  सनाने आधी म्हटलेल्या प्रश्नांची उत्तरं ती 'मजहब'मध्ये शोधत आहे. या पोस्टमध्ये तिने Showbizz (फिल्म इंडस्ट्री) सोडत असल्याचे म्हटले आहे. (हे वाचा-सुनील शेट्टी-रविना टंडन ते दिल्ली कॅपिटल्सची टीम झाली आहे Baba Ka Dhaba ची फॅन) सना खान ही अभिनेत्री बिग बॉस 6 दरम्यान चर्चेत आली होती. काही दिवसांपूर्वी तिने तिचा बॉयफ्रेंड मेलविन लुईसवर अनेक आरोप केले होते. त्याच्या बद्दल तिने सोशल मीडियावर काही पोस्ट शेअर केल्या होत्या. आता पुन्हा एकदा अभियन क्षेत्र सोडण्याच्या निर्णयामुळे चर्चेत आली आहे.
  Published by:Janhavi Bhatkar
  First published:

  Tags: Bigg boss, Bollywood actress

  पुढील बातम्या