मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

शारीरिक छळ, शिवीगाळ, धमकी आणि मारहाण; बिग बॉसच्या गोल्डन बॉयवर पत्नीनं केलेत गंभीर आरोप

शारीरिक छळ, शिवीगाळ, धमकी आणि मारहाण; बिग बॉसच्या गोल्डन बॉयवर पत्नीनं केलेत गंभीर आरोप

गोल्डन बॉय सनी वाघचौरे

गोल्डन बॉय सनी वाघचौरे

बिग बॉसमध्ये एंट्री घेतलेल्या गोल्डन बॉय सनी वाघचौरे बद्दल एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Nishigandha Kshirsagar

मुंबई, 01 डिसेंबर : बिग बॉस 16 सध्या टेलिव्हिजनवर चर्चेचा विषय ठरला आहे. कधी शिवचं कौतुक तर कधी अर्चनाची दादगिरी. इतकच काय तर सुंबूलनं केलेला ड्रामा तर सध्या खूपच ट्रेंडमध्ये आहे.   बिग बॉसच्या घरात 50 दिवसांनी घरातील खेळाला खरी मज्जा येणार आहे. कारण आता सीझनची पहिली वाइल्ड कार्ड एंट्री होणारआहे. वाईल्ड कार्ड एंट्री घेत घरात एक अतरंगी सदस्य आला आहे ज्याचं नाव आहे सनी वाघचौरे ज्याला सगळे गोल्ड बॉय म्हणून ओळखलं जातं.  गोल्डन बॉयची घरातील एंट्री झाली आहे. त्याच्या येण्याने घरात रंगत वाढली आहे. पण आता सनी वाघचौरे बद्दल एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

सनी  वाघचौरे हा महाराष्ट्रातील मुलगा आहे.  तो पुण्याचा असून त्याच्याकडे लाखो रुपयांचं सोन आहे. सोन घालून फिरायला त्याला प्रचंड आवडतं. त्यानं बिग बॉसमध्ये वाइल्ड कार्ड एंट्री म्हणून जात असल्याचं त्याच्या सोशल मीडियावरून सांगितलं आहे.  तो बिग बॉसमध्ये जात असल्यानं सगळ्यांच भुवया उंचावल्या आहेत. घरात तो एमसी स्टँडला टक्कर देणार असल्याचं म्हटलं जात आहे.मात्र आता सनी वाघचौरेबद्दल एक धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. सनी वाघचौरेच्या विरोधात मानसिक आणि शारीरिक छळ तसंच गर्भपात केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केल्याची माहिती समोर येत आहे. ही  बातमी लोकसत्ताने दिली आहे.

हेही वाचा - Bigg Boss 16 Wild Card: पुण्याचा गोल्डन बॉय गाजवणार बिग बॉस; इतकं किलो सोन घेऊन गेलाय घरात

गोल्डमॅन म्हणून ओळख असलेल्या सनी वाघचौरे याच्यावर दोन वर्षांपूर्वी त्याच्या पत्नीने गंभीर आरोप लावले होते. त्याने माझा मानसिक आणि शारीरिक छळ केला. तसेच त्याने गर्भपाताची औषधे देऊन गर्भपात केल्याचा आरोप तिने केला होता. याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मारहाण, कौटुंबिक हिंसाचार, हुंडाबळीसाठी छळ केल्याचा आरोपाखाली हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सनीसह त्याच्या  कुटुंबातील इतर चार जणांवर त्याच्या पत्नीने गंभीर  आरोप केले होते.

सनीच्या पत्नीने गंभीर आरोपात म्हटलं होतं कि,“तसेच तो बाहेरील स्त्रियांशी शारीरिक संबंध ठेऊन मला मारहाण करत. शिवीगाळ करुन धमकीही द्यायचा. इतकंच नव्हे तर सनीसह सासरकडच्या इतर मंडळींकडूनही अनेक वर्ष माझा छळ केला गेला. सनी वाघचौरेसह त्याच्या कुटुंबातील इतर सदस्यांनी मला गर्भपाताची औषधं देत गर्भपात केल्याचा गंभीर आरोप तिने केला होता. तसेच वाघचौरे कुटुंबियांकडून मला पट्ट्यानेही मारहाण करण्यात आली होती”, असे तिने या तक्रारीत नमूद केले होते.

सनीच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीनंतर सनी नाना वाघचौरे, आशा नाना वाघचौरे, नाना वाघचौरे आणि नीता गायकवाड या चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता असा स्पर्धक बिग बॉसच्या घरात सहभागी झाल्याने सगळीकडे त्याची चर्चा होत आहे.

First published:

Tags: Bigg boss, Bollywood, Entertainment