मुंबई, 28 नोव्हेंबर : बिग बॉस 16 सध्या टेलिव्हिजनवर चर्चेचा विषय ठरला आहे. कधी शिवचं कौतुक तर कधी अर्चनाची दादगिरी. इतकच काय तर सुंबूलनं केलेला ड्रामा तर सध्या खूपच ट्रेंडमध्ये आहे. बिग बॉसच्या घरातील 50 दिवस पूर्ण झाले आहेत. 50 दिवसांनी घरातील खेळाला खरी मज्जा येणार आहे. कारण आता सीझनची पहिली वाइल्ड कार्ड एंट्री होणारआहे. वाईल्ड कार्ड एंट्री घेत घरात एक अतरंगी सदस्य आला आहे ज्याचं नाव आहे नानासाहेब वाघचौरे ज्याला सगळे गोल्ड बॉय म्हणून ओळखलं जातं. गोल्डन बॉयची घरातील एंट्री कन्फर्म झाली आहे. कोण आहे हा नानासाहेब उर्फ गोल्डन बॉय जाणून घ्या.
नानासाहेब वाघचौरे हा महाराष्ट्रातील मुलगा आहे. तो पुण्याचा असून त्याच्याकडे लाखो रुपयांचं सोन आहे. सोन घालून फिरायला त्याला प्रचंड आवडतं. त्यानं बिग बॉसमध्ये वाइल्ड कार्ड एंट्री म्हणून जात असल्याचं त्याच्या सोशल मीडियावरून सांगितलं आहे. तो बिग बॉसमध्ये जात असल्यानं सगळ्यांच भुवया उंचावल्या आहेत. घरात तो एमसी स्टँडला टक्कर देणार असल्याचं म्हटलं जात आहे.
हेही वाचा - Bigg Boss Marathi 4 : आपलीच माणसं देणार दगा; बिग बॉसच्या घरात या सदस्यांना मिळणार कचऱ्याच्या डब्यात स्थान
View this post on Instagram
गोल्डन बॉय नानासाहेबर वाघचौरे सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय आहे. त्याचे इन्स्टाग्रामवर 1.6 मिलियन फॉलोअर्स आहेत. त्याला सोन प्रचंड आवडतं. कितीतरी किलोंचं सोन तो अंगावर घालून फिरत असतो. त्याच्या फोटो समोर आला आहे ज्यात त्याच्या गळ्यात मोठ मोठ्याला चैनी, दहा बोटात मोठ्या अंगठ्या पाहायला मिळत आहेत. गोल्डन बॉयच्या प्रत्येक फोटोमध्ये किलोभर सोन पाहायला मिळत आहे. दररोज तो अंगावर अडीच ते तीन किलोचं सोनं अंगावर घालतो.
बिग बॉसच्या घरात एमसी स्टँडही करोडोंची ज्वेलरी कॅरी करत आहे. आता एमसी स्टँडला टक्कर देण्यासाठी गोल्डन बॉय घरात एंट्री घेणार आहे. गोल्डन बॉयला घरात पाहण्यासाठी प्रेक्षक चांगलेच उत्साही आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, एमसी स्टँड आणि गोल्डन बॉस एकमेकांना ओळखतात. पण दोघांमध्ये मैत्री आणि की दुष्मनी हे अद्याप समोर आलेलं नाही. पण दोघांना एकत्र पाहण्यासाठी सगळ्यांनी उत्साह दाखवला आहे.
तसंच गोल्डन बॉय हाही महाराष्ट्रातील पुण्याचा आहे. त्यामुळे शिव नंतर महाराष्ट्राच्या मातीतील आणखी एक व्यक्ती घरात पाहायला मिळणार आहे. शिव आणि गोल्डन बॉय यांच्यात कसं बॉडिंग होणार हे देखील पाहणं मजेशीर ठरणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Bollywood News