मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Bigg Boss 16: कुठे आहे बिग बॉसचं घर?कोण करतं डिझाईन?तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील इथे

Bigg Boss 16: कुठे आहे बिग बॉसचं घर?कोण करतं डिझाईन?तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील इथे

 टीव्हीवरील विवादित आणि तितकाच लोकप्रिय शो 'बिग बॉस'चा 16 वा सीजन लवकरच सुरु होणार आहे. यंदाचा सीजन 1 ऑक्टोबरपासून टीव्हीवर पाहायला मिळणार आहे.

टीव्हीवरील विवादित आणि तितकाच लोकप्रिय शो 'बिग बॉस'चा 16 वा सीजन लवकरच सुरु होणार आहे. यंदाचा सीजन 1 ऑक्टोबरपासून टीव्हीवर पाहायला मिळणार आहे.

टीव्हीवरील विवादित आणि तितकाच लोकप्रिय शो 'बिग बॉस'चा 16 वा सीजन लवकरच सुरु होणार आहे. यंदाचा सीजन 1 ऑक्टोबरपासून टीव्हीवर पाहायला मिळणार आहे.

  • Published by:  Aiman Desai
मुंबई, 22 सप्टेंबर-   टीव्हीवरील विवादित आणि तितकाच लोकप्रिय शो 'बिग बॉस'चा 16 वा सीजन लवकरच सुरु होणार आहे. यंदाचा सीजन 1 ऑक्टोबरपासून टीव्हीवर पाहायला मिळणार आहे. यावेळीसुद्धा बॉलिवूड अभिनेता सलमान खान शो होस्ट करणार आहे. मात्र, शो ऑन एअर होण्याआधीच त्यातील घर, डिझाईन, क्रू मेम्बर्स, घरातील खर्च आणि स्पर्धकांची बरीच चर्चा होत आहे.आज आपण याबाबतच माहिती करुन घेणार आहोत. बिग बॉसच्या घरामागे किती हात राबत असतात हे आज आपण पाहणार आहोत. कुठे आहे 'बिग बॉस'चं घर? 'बिग बॉस' हा छोट्या पडद्यावरील प्रचंड लोकप्रिय शो समजला जातो. याकाळात हा शो टीआरपी रेसमध्ये सर्वात पुढे असतो. या शोमधील घर आणि आतील इंटेरिअर डिझाईनदेखील डोळे दिपून टाकणारी असते. सुरुवातीला चौथ्या सीजनपर्यंत बिग बॉसचं घर लोणावळ्यामध्ये तयार करण्यात आलं होतं. तसेच पाचवा सीजन सोडून सहाव्यापासून बाराव्या सीजनपर्यंत हे घर लोणावळ्यातचं होतं. तेराव्या आणि पंधराव्या सीजनसाठी मुंबईतील गोरेगांव याठिकाणी हे प्रशस्त घर उभारण्यात आलं होतं. तर चौदाव्या सीजनसाठी हे घर फिल्मसिटीमध्ये बनण्यात आलं होतं. बिग बॉसच्या घराचा एरिया-किंमत?- 'बिग बॉस'चं घर हे प्रत्येक सीजनच्या विविध थीमवर आधारित असतं. हे घर प्रचंड प्रशस्त आणि सर्व अत्याधुनिक सोयी-सुविधांनी परिपूर्ण असं बनवण्यात आलेलं असतं. या घरामध्ये स्टाईलिश किचन, स्विमिंगपूलपासून ते जीमपर्यंत सर्व सुविधा उपलब्ध असतात. जवळजवळ 18 हजार 500 स्क्वेअर फूट इतक्या जागेत हे घर विस्तारलेलं असतं. या घराची किंमत कोट्यवधी रुपये असते. घर डिझाईन आणि मेंटेन करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च होतात. परंतु घराची नेमकी किंमत अजून अधिकृतरित्या समोर आलेली नाहीय. (हे वाचा: मान्या सिंग बनली Bigg Boss 16 ची पहिली कन्फर्म स्पर्धक; नेमकी आहे तरी कोण? ) बिग बॉसचं घर कोण करतं डिझाईन? 'बिग बॉस' हा विदेशी शी 'बिग ब्रदर' चा हिंदी व्हर्जन आहे. ही त्यांचीच फ्रँचाइजी आहे. या शोला भारतात एन्डमोल शाईनने प्रोड्युस केलं आहे. ही प्रसिद्ध कंपनी हे घर भाडेतत्वावर चालवण्यासाठी घेत असल्याने तीच या घराची मालकसुद्धा असते. हे घर तयार करण्यासाठी जवळजवळ 500 ते 600 इतके मजूर राबत असतात. घर डिझाईन करण्यासाठी एक-दोन नव्हे तर तब्बल सहा महिन्यांचा कालावधी लागत असल्याचं अनेक रिपोर्टसमध्ये सांगण्यात आलं आहे. बिग बॉसचं घर दिग्दर्शक उमंग कुमार आणि त्यांची पत्नी विनिता कुमार दोघे मिळून डिझाईन करतात. उमंग कुमार यांनी मेरी कॉम, सरबजीत, पीएम नरेंद्र मोदी अशा अनेक चित्रपटांचं दिग्दर्शक केलं आहे.
First published:

Tags: Bigg boss, Entertainment, Salman khan

पुढील बातम्या