मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Bigg Boss 16: बिग बॉसच्या घरात दिसणार 'उडारियां' फेम अंकित-प्रियांकाचा रोमान्स; समोर आल्या डिटेल्स

Bigg Boss 16: बिग बॉसच्या घरात दिसणार 'उडारियां' फेम अंकित-प्रियांकाचा रोमान्स; समोर आल्या डिटेल्स

प्रियांका-अंकित

प्रियांका-अंकित

'बिग बॉस 16' ची आज धमाकेदार सुरुवात होणार आहे. छोट्या पडद्यावरील सर्वात लोकप्रिय आणि तितकाच विवादित शो म्हणून 'बिग बॉस'ची ओळख आहे. या शोमध्ये अनेक वादविवाद, राडे, मैत्री-प्रेम सर्वकाही एकत्र पाहायला मिळतं.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Maharashtra, India
  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 1 ऑक्टोबर-  'बिग बॉस 16' ची आज धमाकेदार सुरुवात होणार आहे. छोट्या पडद्यावरील सर्वात लोकप्रिय आणि तितकाच विवादित शो म्हणून 'बिग बॉस'ची ओळख आहे. या शोमध्ये अनेक वादविवाद, राडे, मैत्री-प्रेम सर्वकाही एकत्र पाहायला मिळतं. हे सेलिब्रेटी स्पर्धक 100 दिवस बिग बॉसच्या घरात राहण्याचं स्वप्न घेऊन सहभागी होतात. त्यातील काही यशस्वी होतात तर काही आठवड्याच्या शेवटाला शोमधून बाहेर होतात. यंदाच्या सीजनमध्ये कोणकोणते सेलिब्रेटी कलाकार पाहायला मिळणार याबाबत चाहते प्रचंड उत्सुक आहेत. आज रात्री ग्रँड प्रीमिअरमध्ये हा खुलासा होणार आहे. दरम्यान 'उडारियां' या प्रसिद्ध मालिकेतील जोडपं बिग बॉसच्या घरात दिसणार असल्याचं समोर आलं आहे.

आज 'बिग बॉस 16' चा ग्रँड प्रीमिअर सोहळा पार पडणार आहे. यासाठी प्रेक्षक प्रचंड आतुर आहेत. त्तपूर्वी समोर आलेल्या माहितीनुसार, कलर्स वाहिनीवरील प्रचंड गाजलेली मालिका 'उडारियां' मधील लोकप्रिय जोडपं बिग बॉसच्या घरात दिसणार आहे. अभिनेता अंकित गुप्तता आणि अभिनेत्री प्रियांका चहर चौधरी बिग बॉसच्या घरात एन्ट्री करणार आहेत.

'उडारियां' ही मालिका प्रचंड लोकप्रिय झाली होती. या मालिकेत अंकित आणि प्रियांका मुख्य भूमिकेत झळकले होते. या दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड पसंत पडली होती. हे दोघेही फारच छान मित्र बनले आहेत. परंतु त्यांच्या चाहत्यांना नेहमीच त्यांच्यामध्ये मैत्रीपेक्षाही पुढचं नातं असल्याचा अंदाज आहे. या दोन्ही कलाकारांना खऱ्या आयुष्यातही एकत्र पाहण्याची चाहत्यांची इच्छा आहे. परंतु त्यापूर्वी अंकित आणि प्रियांका बिग बॉसच्या घरात एकत्र एंट्री करताना दिसणार आहेत. नुकतंच या शोचा नवा प्रोमो समोर आला आहे. त्यामुळे त्यांचे चाहते प्रचंड आनंदी झाले आहेत.

या प्रोमोमध्ये बिग बॉस होस्ट अभिनेता सलमान खान अंकित आणि प्रियांकासोबत संवाद साधताना दिसून येत आहे. यावेळी सलमान खान त्यांना त्यांच्या नात्याबाबत प्रश्न विचारतो. यावर उत्तर देत, प्रियांका म्हणते आम्ही बेस्ट फ्रेंड आहोत. ती पुढे म्हणतेमाझं आणि अंकितचं नातं फारच खास आहे. आम्ही दोघे एकत्र नसलो तरीही आम्ही एकमेकांची काळजी घेत असतो'. या दोघांच्या ऑनस्क्रीन केमिस्ट्रीसोबत ऑफस्क्रीन केमिस्ट्रीसुद्धा जबरदस्त आहे.

(हे वाचा: Bigg Boss 16: रिक्षाचालकाच्या लेकीने आधी पटकावला मिस फेमिनाचा ताज; आता गाजवणार बिग बॉस)

नेहमीप्रमाणे यंदाही सलमान खान हा शो होस्ट करणार आहे. सलमान 2010 पासून बिग बॉसचा होस्ट आहे. बिग बॉस 16 चा प्रीमियर आज, शनिवारी रात्री 9.30 वाजता कलर्स टीव्हीवर होणार आहे. प्रीमियर एपिसोड दोन दिवस चालेल अशी अपेक्षा आहे. पहिल्या दिवशी शोच्या प्रीमियर एपिसोडमध्ये स्पर्धकांची ओळख करुन दिली जाईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी, स्पर्धक बिग बॉसच्या घरात प्रवेश करतील.

First published:

Tags: Bigg boss, Entertainment, Tv actors