मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Bigg Boss 16: 11 वर्षांनी लहान अब्दूला टीनाने केलं KISS; नंतर जे घडलं...

Bigg Boss 16: 11 वर्षांनी लहान अब्दूला टीनाने केलं KISS; नंतर जे घडलं...

अब्दू-टीना

अब्दू-टीना

'बिग बॉस 16' चा लेटेस्ट एपिसोड खूपच मजेशीर असल्याचं पाहायला मिळालं. शोमध्ये नेहमीच वादविवाद आणि प्रेमाची चर्चा होत असते. या शोमध्ये पुन्हा एकदा ऍक्शन, रोमान्स आणि कॉमेडीचा तडका पाहायला मिळाला.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Maharashtra, India
  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 6 ऑक्टोबर-   'बिग बॉस 16' चा लेटेस्ट एपिसोड खूपच मजेशीर असल्याचं पाहायला मिळालं. शोमध्ये नेहमीच वादविवाद आणि प्रेमाची चर्चा होत असते. या शोमध्ये पुन्हा एकदा ऍक्शन, रोमान्स आणि कॉमेडीचा तडका पाहायला मिळाला. या सर्वांमध्ये टीना दत्ता आणि अब्दू रोजिक भाव खाऊन गेले. नुकतंच बिग बॉसमध्ये छोट्या पडद्यावरील सोज्वळ सून अर्थातच 'उतरन' फेम टीनाने अब्दू रोजिकला किस करत सर्वांच्या भुवय्या उंचावल्या आहेत.

टीना दत्ताने अब्दू रोजिकला एक नव्हे तर दोन वेळा किस केलं. त्यानंतर अब्दू लाजून चुर्रर्र झाला होता. टीनाने किस केल्यानंतरसुद्धा अब्दूने लक्ष न देता आपलं काम करणं पसंत केलं. परंतु यादरम्यान त्याच्या चेहऱ्यावरील स्मितहास्य पाहून चाहत्यांनी कमेंट्स करायला सुरुवात केली आहे. सुरुवातीला टीना दत्ता घराच्या गार्डनमध्ये आराम करत होती. त्यांनंतर ती आत येऊन अब्दूच्या गालावर किस करण्याची इच्छा व्यक्त करते. त्यामुळे अब्दू अगदी लाजून जातो.

त्यानंतर अब्दू सोफ्यावर बसलेला असताना टीना पुन्हा येऊन त्याच्या गालावर किस करुन निघून जाते. या सर्व प्रकाराने घरातील इतर स्पर्धकही आश्चर्याने पाहात असतात. तर काही स्पर्धक अब्दूची मजा घेत असतात. दरम्यान अब्दू मात्र लाजून खाली मान घालून स्मितहास्य देत असतो. टीना इतक्यातच थांबत नाही, तर ती अब्दूसोबत मजेशीर फ्लर्टसुद्धा करते. ती अब्दुला आपल्यासोबत डेटवर जाण्यासाठी विचारत असते. सध्या टीना आणि अब्दूची ही मजेशीर केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड पसंत पडत आहे.

अब्दू रोजिक हा एक कझाकिस्तानचा प्रसिद्ध गायक आहे. त्याच वय 19 वर्षे आहे. अब्दूचा जन्म 3 सप्टेंबर 2003 मध्ये झाला होता. अब्दूला लहानपणापासून 'रिकेट्स' हा दुर्मिळ आजार आहे. या आजारामुळेच त्याची उंची वाढू शकली नाहीय.परंतु आपलं शारीरिक व्यंग बाजूला ठेऊन आपल्या कलेच्या जोरावर त्याने जगभरात आपली ओळख निर्माण केली आहे.

View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

(हे वाचा:Bigg Boss 16: 'शिव ठाकरेची एमसी स्टॅनबाबत पर्सनल कमेंट'; बिग बॉसच्या घरात पुन्हा जोरदार वाद )

अब्दू रोजिक हा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. तो गेल्या काही दिवसांपासून इंटरनेटवर प्रचंड व्हायरल होत आहे. आपल्या हटके रॅपिंग स्टाईलमुळे अब्दू फारच कमी वेळेत प्रचंड लोकप्रिय झाला आहे. कदाचित त्यामुळेच त्याला बिग बॉसच्या घरात येण्याची संधी मिळाली असेल. सोहळा मीडियावर त्याची मोठी फॅन फॉलोईंग आहे. अब्दू रोजिकचे इन्स्टाग्रामवर 3.8 मिलियन फॉलोअर्स आहेत. तो सतत आपले व्हिडीओ आणि फोट शेअर करत असतो. त्याच्या प्रत्येक पोस्ट चर्चेत असतात.

First published:

Tags: Bigg boss, Entertainment, Tv actors