मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Bigg Boss 16: बिग बॉसच्या घरातून बाहेर पडताच शिव ठाकरेच्या 'त्या' वक्तव्याविषयी स्पष्टच बोलली सुंम्बुल; म्हणाली...

Bigg Boss 16: बिग बॉसच्या घरातून बाहेर पडताच शिव ठाकरेच्या 'त्या' वक्तव्याविषयी स्पष्टच बोलली सुंम्बुल; म्हणाली...

बिग बॉस 16

बिग बॉस 16

'बिग बॉस 16' हा शो शेवटाकडे आला असताना घरातून संबूल तौकीरला निरोप घ्यावा लागला. सुंबुल तौकीर खान घरातील महत्वाच्या सदस्यांपैकी एक होती. ती घराबाहेर पडल्याने सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे. आता बिग बॉसमधून बाहेर आल्यानंतर सुंबुलने मोठे भाष्य केले आहे.

पुढे वाचा ...
  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 05 फेब्रुवारी :  'बिग बॉस 16' सध्या तुफान चर्चेत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही राडे,मैत्री, प्रेम पाहायला मिळत आहे. दरम्यान हा सीजन आता शेवटच्या टप्प्यावर येऊन पोहोचला आहे. बिग बॉस 16 च्या ग्रँड फिनालेला काही दिवस बाकी आहेत. शो संपायला 10 दिवसांपेक्षा कमी दिवस शिल्लक आहेत. आता  हा शो शेवटाकडे आला असताना घरातून सुंम्बुल तौकिरला निरोप घ्यावा लागला. सुंम्बुल तौकिर खान घरातील महत्वाच्या सदस्यांपैकी एक होती. ती घराबाहेर पडल्याने सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे. आता  बिग बॉसमधून बाहेर आल्यानंतर सुंबुलने मोठे भाष्य केले आहे.

अर्चना गौतम, प्रियांका चौधरी, शालीन भानोत आणि निमृत कौर अहलुवालिया बिग बॉस 16 च्या ग्रँड फिनालेमध्ये पोहोचल्या आहेत. या आठवड्यात शिव ठाकरे, एमसी स्टॅन आणि सुंम्बुल यांना नामांकन देण्यात आले आहे, त्यामधून  फक्त सुंम्बुलला शोमधून बाहेर काढण्यात आले आहे. तिला काढून टाकल्यामुळे संतप्त झालेल्या तिच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर निर्मात्यांना ट्रोल करायला सुरुवात  केली आहे. त्याचवेळी कन्फेशन रूममध्ये शिव ठाकरेनी सुंम्बुलसाठी बोललेले शब्द पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

हेही वाचा - Sidharth- Kiara Wedding: सुनबाईंबद्दल विचारताच सिद्धार्थच्या आईने दिली 'ही' रिऍक्शन; 'तो' व्हिडीओ व्हायरल

साजिद खानच्या पाठिंब्यामुळेच सुंम्बुल इथपर्यंत पोहोचली आहे, असे काही दिवसांपूर्वी शिव ठाकरेने कन्फेशन रूममध्ये सांगितले होते. तो सुंम्बुलसोबत खूप चांगला वागतो पण ती त्याला फारशी मदत करत नाही. या विधानावर सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी चांगलाच राडा घातला. आता सुंम्बुलने बाहेर येताच शिवच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

सुंम्बुल म्हणाली, 'शिव माझा खूप चांगला मित्र आहे. जर तो असं काही बोलला असेल तर त्यामागे काहीतरी कारण असेल. मी त्याला काहीतरी बोलली असेन किंवा माझ्या एखाद्या कृतीने तो दुखावला असावा. मला वाटतं म्हणूनच तो हे सगळं बोलला असेन. इतके दिवस मी त्याच्यासोबत आहे. त्याने मला खूप प्रेम दिले. पण माझा त्याच्याशी संबंध असल्याने मला वाटते की हे लोकही माझ्यावर तितकंच प्रेम करतात.'

सध्या छोट्या पडद्यावर हिंदी बिग बॉसमध्ये मराठमोळा शिव ठाकरे धुमाकूळ घालताना दिसतोय. त्याने आपल्या दमदार खेळाने इतर स्पर्धकांना मागे टाकलंय. इतकंच नाही तर शिवचा खेळ पाहून मराठीच नाही तर हिंदी प्रेक्षकही त्याच्या पाठीशी उभे आहेत. शिव ठाकरेने भारतभर हवा केली आहे. 'बिग बॉस मराठी २' ची ट्रॉफी जिंकल्यानंतर आता त्याने आपलं लक्ष 'बिग बॉस 16 वर केंद्रित केलं आहे. ही ट्रॉफी मिळवण्यासाठी तो प्रचंड मेहनत करताना दिसतोय.

बिग बॉस 16 चा ग्रँड फिनाले 12 फेब्रुवारीला होणार आहे. आता बिग बॉसच्या विजेतेपदावर कोण आपलं नाव कोरणार ते पाहणं महत्वाचं आहे.

First published:

Tags: Bigg boss, Entertainment, Tv actress