मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Bigg boss 16: 'माझ्या मुलीला मत देऊ नका'; संबूलच्या वडिलांची चाहत्यांना विनंती; नेमकं काय घडलं?

Bigg boss 16: 'माझ्या मुलीला मत देऊ नका'; संबूलच्या वडिलांची चाहत्यांना विनंती; नेमकं काय घडलं?

बिग बॉस 16

बिग बॉस 16

सुंबूल शोमध्ये फक्त शालीनसोबत दिसते. दोघांमधील वाढती जवळीक सध्या चर्चेचा विषय आहे. यामुळे सोशल मीडियावरही तिला ट्रोल केलं जात आहे. त्यातच आता सुंबूलच्या वडिलांनी मोठं विधान केलं आहे. त्यांना संबूलला बिग बॉसमध्ये पाठवल्याचा पश्चाताप होतो आहे.

पुढे वाचा ...
  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Nishigandha Kshirsagar

मुंबई, 24 नोव्हेंबर :  बिग बॉस हिंदीचा 16 वा सिझन सध्या बराच चर्चेत आहे. यातील प्रत्येक स्पर्धक आपली ओळख निर्माण करतोय. बिग बॉस मधील एका स्पर्धकाची कायम चर्चा होते ती म्हणजे सुंबूल तौकीर खान.ही  अभिनेत्री  बिग बॉसमधील सर्वात लहान स्पर्धक आहे. सुंबूलने बिग बॉसमध्ये प्रवेश केला तेव्हा सर्वांची तिच्यावर नजर होती. सुंबूल बिग बॉसच्या विजेतेपदाची दावेदार मानली जात होती. पण याउलट सुंबूल सर्वात दुबळी स्पर्धक ठरत आहे. सुंबूल शोमध्ये फक्त शालीनसोबत दिसते. दोघांमधील वाढती जवळीक सध्या चर्चेचा विषय आहे. यामुळे सोशल मीडियावरही तिला ट्रोल केलं जात आहे. त्यातच आता सुंबूलच्या वडिलांनी मोठं विधान केलं आहे. त्यांना संबूलला बिग बॉसमध्ये पाठवल्याचा पश्चाताप होतो आहे.

सुंबूलच्या वडिलांनी एक दिवस बिग बॉस मध्येही हजेरी लावली होती. त्यांनी तिथे येऊन तिला समजावले होते. तर काही स्पर्धकांची कानउघडणी केली होती. आता अलीकडेच  ‘आजतक’शी बोलताना त्यांनी आपल्या मुलीविषयी मोठं वक्तव्य केलं आहे. या मुलाखतीत ते म्हणाले कि,  ''मी माझ्या 18 वर्षांच्या मुलीला काहीतरी शिकण्याच्या उद्देशाने बिग बॉसमध्ये पाठवलं होतं. माझ्या मुलीने आयुष्यात कधीच नकारात्मकपणा पाहिलेला नाही. ती नेहमी माझ्या सावलीत राहिली आहे. बिग बॉसमध्ये जाऊन तिने लोकांना समजून घ्यावं, जग किती निष्ठूर आहे हे तिला कळावं अशी माझी अपेक्षा होती.''

हेही वाचा - Ruchira jadhav : बिग बॉसमधून बाहेर पडताच रुचिरा डेटवर; पोस्ट करत म्हणाली 'शेवटी जाऊन भेटलेच त्याला...'

अलीकडेच, 'वीकेंड का वार'मध्ये सलमान खानने सुंबुल तौकीर आणि शालीन भानोत यांचा क्लास घेतला. सलमानने शालीनआणि सुंबूलला खडसावत म्हणतो, संबूळ  जे करत आहे त्यामुळे तिच्याबद्दल प्रेक्षकांमध्ये चुकीचा संदेश जात आहे.' असं मत मांडलं  होतं. त्यानंतर संबूलच्या वडिलांनी या ठ्वड्यात देखील घरात तिच्याशी संवाद साधला होता. यावेळी त्यांनी टीनाबद्दल अपशब्द वापरले होते.

'आज तक'शी संवाद साधताना सुंबुलच्या वडिलांनी सांगितले की, कोणत्या परिस्थितीत त्याने हे सर्व सांगितले. त्यांनी सांगितले की वीकेंड का वारचा एपिसोड पाहिल्यानंतर त्यांची तब्येत बिघडली होती आणि त्यांना हॉस्पिटल मध्ये दाखल करावे लागले होते. यावेळी मी झोपेतच संबुलशी बोलत होतो. त्यामुळे टीना विषयी अपशब्द तोंडातून गेल्याचे त्यांनी सांगितले. आता त्यांनी यावेळी तिची देखील माफी मागितली आहे.

सुंबुलच्या वडिलांनीही आपल्या मुलीला या शोमध्ये पाठवल्याबद्दल खंत व्यक्त केली आहे. तसेच चाहत्यांना तिला मत देऊ नका असा संदेश देखील दिला आहे. ते म्हणाले, 'मला माहित आहे की तिच्यावर प्रेम करणारे बरेच लोक आहेत, परंतु आता तिने घरातून बाहेर पडण्याची वेळ आली आहे. सध्या जी मुलगी घरात आहे ती माझी मुलगी नाही. तिने आपली सकारात्मकता आणि आनंद गमावला आहे. तिला पुन्हा दुःखात पडावं असं मला वाटत नाही. म्हणूनच मी चाहत्यांना विनंती करतो की तिला मत देऊ नका आणि या शनिवारी तिला घराबाहेर जाऊ द्या.'' संबूलच्या वडिलांनी केलेल्या या विधानामुळे तिच्या चाहत्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे.

First published:

Tags: Bigg boss, Entertainment, Tv actress