मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Bigg Boss 16: 20 वर्ष लहान सुंबुलसोबत जोडलं जातंय शालिनचं नाव; अभिनेत्याचा आधीच झालाय घटस्फोट

Bigg Boss 16: 20 वर्ष लहान सुंबुलसोबत जोडलं जातंय शालिनचं नाव; अभिनेत्याचा आधीच झालाय घटस्फोट

सुंबूल-शालिन

सुंबूल-शालिन

'बिग बॉस 16'ची रंगत हळूहळू वाढत आहे. पहिल्याच आठवड्यात वादविवाद,मैत्री, प्रेम,तंटे पाहायला मिळत आहेत. शोमध्ये स्पर्धकांनी धमाका केला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Maharashtra, India
  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 7 ऑक्टोबर-  'बिग बॉस 16'ची रंगत हळूहळू वाढत आहे. पहिल्याच आठवड्यात वादविवाद,मैत्री, प्रेम,तंटे पाहायला मिळत आहेत. शोमध्ये स्पर्धकांनी धमाका केला आहे. कोणी जेवणावरुन वाद घालत आहे तर कोणी घरातील कामकाजांवरुन तर अनेकांनी एकमेकांबाबत खाजगी प्रतिक्रिया देत रोष ओढवला आहे. सध्या सुंबूल तौकीर आणि शालिन भनौत आपल्या वाढत्या जवळीकतेमुळे प्रचंड चर्चेत आले आहेत. तसेच यावरुन आता शालिनच्या पूर्व आयुष्याबाबतही चर्चा सुरु झाली आहे. 'बिग बॉस 16' मध्ये शालिन भनौत स्पर्धक म्हणून सहभागी झाला आहे. शोमध्ये त्याच्याकडे एक दमदार स्पर्धक पाहिलं जात आहे. शोमधील आपल्या माइंड गेममुळे चर्चेत आलेला शालिन तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असते. त्याची माजी पत्नी आणि अभिनेत्री दलजीत कौरने शालिनवर अनेक गंभीर आरोप केले होते.त्यानंतर त्यांनी घटस्फोटसुद्धा घेतला होता.

शालिन भनौत आणि दलजीत कौर यांनी 2009 मध्ये 'कुलवधू' होतं. या मालिकेदरम्यानच त्यांच्यात जवळीकता निर्माण झाली होती. त्यानंतर काही वर्षांनी त्यांनी लग्न केलं होतं. लग्नानंतर बरेच दिवस दोघांमध्ये उत्तम बॉन्डिंग होतं. या दोघांना जेडेन नावाचा एक लेकसुद्धा आहे. सर्व काही ठीक चाललंय असं वाटत असतानाच या दोघांनी विभक्त होत चाहत्यांना धक्का दिला होता. या दोघांनी स्वतः आपण घटस्फोट घेत असल्याचं जाहीर केलं होतं. त्यामुळे सर्वच चकित झाले होते.

सुरुवातीला एकमेकांवर जीव ओवाळणाऱ्या या जोडप्याने 2015 मध्ये विभक्त होत घटस्फोट घेतला होता. त्यांच्या नात्याचा शेवट फारच वाईट टप्प्यावर झाला होता. शालिनपासून घटस्फोट घेतल्यानंतर दलजीतने त्याच्यावर अनेक गंभीर आरोप केले होते. आपल्या जबाबात दलजीतने शालिनवर मारहाण आणि विवाहबाह्य संबंध असे गंभीर आरोप केले होते. इतकंच नव्हे तर या दोघांचं प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचलं होतं. गुन्हाही दाखल झाला होता. परंतु काही काळानंतर शालिनची या आरोपातून निर्दोष मुक्तता झाली होती. त्यानंतर शालिन पडद्यावरून जणू गायब झाला होता. त्याच्या करिअरला एकप्रकारे उतरती कळा लागली होती. परंतु काही वर्षांच्या ब्रेकनंतर शालिनने एकता कपूरच्या लोकप्रिय 'नागिन' या मालिकेतून पडद्यावर पुनरागमन केलं होतं. आज तो पुन्हा अभिनय क्षेत्रात सक्रिय झाला आहे.

'बिग बॉस 16'मध्ये शालिन आपली पूर्व इमेज बनवण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच तो आपल्या गेमवर लक्ष देत आहे. दरम्यान शोमधील 'इमली' फेम सुंबूल तौकीर खानसोबतची त्याची जवळीकता केवळ प्रेक्षकच नव्हे तर स्पर्धकांनाही गोंधळात टाकणारी आहे.

(हे वाचा: Bigg Boss 16: 11 वर्षांनी लहान अब्दूला टीनाने केलं KISS; नंतर जे घडलं...)

याबाबत बोलताना टीना दत्ताने शालिनला सुंबुलबाबत विचारलं होतं. परंतु शालिनने या गोष्टीला स्पष्टपणे नकार दिला आहे. सांगायचं झालं, तर शालिन आणि सुंबूलच्या वयात 20 वर्षांचं अंतर आहे. सर्वप्रथम मान्या सिंगने या दोघांवर शोमध्ये खोटं नातं निर्माण करत असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर या प्रकरणाची चर्चा सुरु झाली आहे.

First published:

Tags: Bigg boss, Entertainment