मुंबई, 04 डिसेंबर : 'बिग बॉस 16 हा शो दिवसेंदिवस रंजक होत चालला आहे. यंदाचा सीझन सध्या खूप चर्चेत आहे. सलमान खानच्या या शोमध्ये रोज काहीतरी नवीन घडामोडी पाहायला मिळत आहे. हा खेळ आता रंगात येत आहे. यात वादविवादच नव्हे तर कधी वातावरण हाणामारी पर्यंत जातं. शो मध्ये प्रत्येक दिवशी काही ना काही ड्रामा करत घरातील स्पर्धक चर्चेत राहतात. बिग बॉसच्या घरात क्वचितच भावनिक वातावरण पाहायला मिळतं. मात्र शोच्या आगामी 4 डिसेंबरचा एपिसोडमध्ये वेगळ चित्र पहायला मिळणार आहे. या एपिसोडमध्ये बिग बॉसच्या घरातील आपला माणूस शिव ठाकरे चक्क रडताना दिसणार आहे. नक्की काय घडणार आहे घरात पाहा.
बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या सीजनचा विजेता आणि बिग बॉस सोळाचा स्पर्धक शिव ठाकरे यंदाचा १६ वा सिझन देखील गाजवत आहे. सध्या बिग बॉस हिंदीमुळे शिव ठाकरे प्रचंड चर्चेत आहे. इतकंच नव्हे तर तो सतत सोशल मीडियावर ट्रेंडदेखील होत आहे. शिवची प्रत्येक खेळी प्रेक्षकांना पसंत पडत आहे. त्याच्या खेळामुळे तो प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतोय. पण अशातच तो बिग बॉसच्या घरात अचानक ढसाढसा रडायला लागला आहे.
हेही वाचा - Sayali Sanjeev : '...यामुळे आमच्यात दुरावा'; ऋतुराजविषयी जरा स्पष्टच बोलली सायली संजीव
बिग बॉसचा एक प्रोमो नुकताच समोर आला आहे. या प्रोमोमध्ये बिग बॉस सदस्यांना म्हणतायत कि, 'नऊ आठवड्यांपासून तुम्ही सगळेघरच्यांपासून दुर आहात. तुम्हाला नक्कीच त्यांची आठवण येत असणार. तुमच्या मनात खूप काही साठलं असेल. चला मला तुमच्या मनातील भावना सांगा.' आता घरात 'फॅमिली वीक' टास्क अंतर्गत बिग बॉस कुटुंबातील सर्व सदस्यांना त्यांच्या मनातील भावना शेअर करण्याची संधी देणार आहेत. जेव्हा बिग बॉसने ही संधी दिली तेव्हा घरातील सर्व सदस्य भावूक झालेले दिसले तर शिव ठाकरे जोरजोरात रडतांना दिसला आहे.
View this post on Instagram
जेव्हा शिव कन्फेशन रूममध्ये जातो तेव्हा तो बिग बॉसला सांगतो, ' काहींना वाटतं की मी डोक्याने खेळतो . पण घरच्यांना माहीत आहे की मी नेहमी माझ्या मनाचं ऐकतो. मला त्यांच्यासमोर रडताही येत नाही. नाहीतर मी कमजोर वाटेल.' असं म्हणत शिव रडायला लागतो.
दरम्यान, सलमान खानने वीकेंड का वारमध्ये अनेक स्पर्धकांच्या गोष्टी उघड केल्या होत्या, ज्यामुळे प्रियांका आणि अंकितच्या नात्यात दुरावा निर्माण झाला होता. त्याचवेळी टीना आणि शालीन नात्याला देखील तडा गेला आहे. वीकेंड का वार नंतर प्रियांका आणि अंकितचे नाते संपुष्टात येईल असे वाटत होते, पण तसे झाले नाही. प्रियांका, अंकित, टीना आणि शालीन आपलं नातं घट्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे घरात येणाऱ्या काळात काय घडणार ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bigg boss, Marathi entertainment