मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

BB16: 'तू मोठा दिग्दर्शक असशील पण...'; साजिद खानवर भडकला सलमान खान

BB16: 'तू मोठा दिग्दर्शक असशील पण...'; साजिद खानवर भडकला सलमान खान

बिग बॉस 16

बिग बॉस 16

'बिग बॉस' प्रत्येक सीझन चांगलाच लोकप्रिय ठरतो. बिग बॉसचा 16 वा सीझन सुरु असून यंदाच्या सीझन चांगलाच वादग्रस्त ठरत आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Sayali Zarad

मुंबई, 27 नोव्हेंबर : 'बिग बॉस' प्रत्येक सीझन चांगलाच लोकप्रिय ठरतो. बिग बॉसचा 16 वा सीझन सुरु असून यंदाच्या सीझन चांगलाच वादग्रस्त ठरत आहे. जसा जसा बिग बॉसच्या शो पुढे सरकत आहे तस तसा सदस्यांचा खरा चेहरा समोर येत आहे.  या आठवड्यात बिग बॉसच्या घरात खूप हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. घरात अनेक स्पर्धकांमध्ये मारामारी झाली. पण अर्चना आणि साजिद खानच्या भांडणाने संपूर्ण शोची लाइमलाईटच घेतली. 'बिग बॉस 16' च्या 'वीकेंड का वार'मध्ये सलमान खानने अर्चना गौतम आणि साजिद खानचा चांगलाच क्लास घेतला.

साजिद अर्चनासोबतच्या भांडनात तिला म्हणाला, की तो तिला शोमधून काढून टाकू शकतो कारण तो खूप मोठा दिग्दर्शक आहे. त्यानंतर अर्चानेनही त्याला बरंच सुनावलं. वीकेंड का वारच्या एपिसोडमध्ये सलमानने यावरुन साजिद खानचा चांगलाच क्लास घेतला. सलमान खान साजिद खानला म्हणाला, 'तू मोठा दिग्दर्शक असशील पण तू बिग बॉस चालवू शकत नाहीस आणि अर्चनाला कोणीही काढू शकत नाही, मीही नाही. कोणाला ठेवायचं कोणाला काढून टाकायचं हे फक्त प्रेक्षक ठरवू शकतात. साजिदला वाटतं की तो नेहमीच बरोबर असतो, पण तसं नसतं. जेव्हा तो चुकीचा असेल तेव्हा त्याच्या मित्रांनी आणि इतरांनी त्याला सांगायला पाहिजे.' त्यानंतर सलमान खानने साजिद आणि अर्चना यांना एकमेकांची माफी मागायला सांगितली आणि दोघांनीही एकमेकांना मिठी मारली.

View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

सलमान निमृत कौर अहलुवालियाशी बोलतो. तिने साजिदला कधीच समजावून सांगितले नाही का, याचे स्पष्टीकरण तिला विचारतो. मग तो शिवलाही हाच प्रश्न विचारतो की साजिदला तो चुकीचं करतोय हे कधी समजावलं. त्यानंतर साजिद खान आणि अर्चना गौतम यांच्यातील वाद मिटताना दिसतो.

दरम्यान, बिग बॉसच्या सहभागावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. बॉलीवूडसह अनेक महिलांनी साजिदच्या बिग बॉसच्या घरातील प्रवेशावर टीका केली आहे, अनेकांनी आरोप केले आहेत. एवढेच नाही तर साजिद खानला 'बिग बॉस 16'मधून बाहेर काढण्याची मागणी होत आहे.

First published:

Tags: Bigg boss, Entertainment, Salman khan