मुंबई, 02 डिसेंबर : 'बिग बॉस' प्रत्येक सीझन चांगलाच लोकप्रिय ठरतो. बिग बॉसचा 16 वा सीझन सुरु असून यंदाच्या सीझन चांगलाच वादग्रस्त ठरत आहे. जसा जसा बिग बॉसच्या शो पुढे सरकत आहे तस तसा सदस्यांचा खरा चेहरा समोर येत आहे. या आठवड्यात बिग बॉसच्या घरात खूप हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. घरात शालीन आणि टीना हे कायमच चर्चेत राहणारे स्पर्धक आहेत. आता 'बिग बॉस 16' च्या 'वीकेंड का वार' मध्ये सलमान खान स्पर्धकांना आठवड्या भराच्या कामासाठी शाळा घेतो. पण या वेळचा हा एपिसोड काहीसा वेगळा असणार आहे. कारण या आठवड्यात सलमान नाही तर बाहेरचे प्रेक्षक येऊन स्पर्धकांची चांगलीच शाळा घेत खडे बोल सुनावणार आहेत.
या आठवड्याच्या वीकेंड का वार या एपिसोडचा एक प्रोमो समोर आला आहे. त्यामध्ये मध्ये टीना दत्ताच्या शालिन भानोटसोबतच्या मैत्रीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाणार आहे. येत्या भागात शोमध्ये दोघांना त्यांच्या नात्याबद्दल बोलल्यानंतर होस्ट सलमान खान थेट आव्हानच देणार आहे. तसाच त्यामुळे टीना आणि सहलींचा खरा चेहरा समोर येणार आहे.
हेही वाचा - अनेक वर्षांनंतर समोरासमोर आले शाहरुख आणि प्रियांका; चाहत्यांना आठवला 'तो' किस्सा
टीना-शालीनचे नाते खोटे!
ColorsTV ने शेअर केलेल्या प्रोमोनुसार, प्रेक्षक स्टेजवर बसून बिग बॉस 16 च्या स्पर्धकांना प्रश्न विचारताना दिसत आहेत. एकाने शालीनला विचारले, 'तू नेहमी टीनाच्या मागे का धावतेस?' ज्यावर सलमान म्हणाला, 'काय करणार सवयच आहे त्याची ती.' तर दुसऱ्या एका प्रेक्षकाने शालीनबद्दल असेही म्हटले आहे की, 'टीना त्याचा स्वतःच्या फायद्यासाठी वापर करत आहे'. या आरोपांना उत्तर देताना शालीन म्हणाली की, 'मी कोणावरही अवलंबून नाही. मी माझी स्वतंत्र खेळत आहे.'
View this post on Instagram
शालीनसोबतच्या तिच्या नात्याबद्दलच्या सर्व चर्चेला उत्तर देताना टीना क्लिपमध्ये म्हणाली, 'मला शालीनशी मैत्रीही करायची नाही कारण ती आता माझ्यावर उलटत आहे.' शालीनसोबतच्या मैत्रीवर टीनाच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना सलमान म्हणाला, "आता मला हे पाहावं लागेल, हे तुमच्यासाठी एक आव्हान आहे." असं म्हणत सलमानने या दोघांना चॅलेंज दिलं आहे.
यापूर्वी बिग बॉस 16 ची माजी स्पर्धक श्रीजीता डे आणि बिग बॉस 15 फेम राजीव अदातिया यांनी देखील टीना आणि शालीनच्या मैत्रीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते आणि शोमधील त्यांच्या 'फेक क्रिंज लव्ह स्टोरी'बद्दल ट्विट केले होते. सोशल मीडियावर अनेकांनी असेही सांगितले की, त्यांचे नाते बिग बॉसमधील त्यांच्या खेळाचा एक भाग आहे. त्यामुळे शालीन आणि टिनाचं खर्च एकमेकांवर प्रेम आहे कि गेम जिंकण्यासाठी ते असं करत आहेत ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bigg boss, Entertainment, Tv actress, Tv celebrities