मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Bigg Boss 16: 'शिव ठाकरेची एमसी स्टॅनबाबत पर्सनल कमेंट'; बिग बॉसच्या घरात पुन्हा जोरदार वाद

Bigg Boss 16: 'शिव ठाकरेची एमसी स्टॅनबाबत पर्सनल कमेंट'; बिग बॉसच्या घरात पुन्हा जोरदार वाद

शिव ठाकरे-एमसी स्टॅन

शिव ठाकरे-एमसी स्टॅन

'बिग बॉस' च्या घरात राडे होणार नाहीत असं शक्यच नाही. या वादविवादांमुळेच शोची टीआरपी प्रचंड वाढते असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. नुकतंच बिग बॉसच्या सोळाव्या सीजनची धमाकेदार सुरुवात झाली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Maharashtra, India
  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 6 ऑक्टोबर-   'बिग बॉस' च्या घरात राडे होणार नाहीत असं शक्यच नाही. या वादविवादांमुळेच शोची टीआरपी प्रचंड वाढते असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. नुकतंच बिग बॉसच्या सोळाव्या सीजनची धमाकेदार सुरुवात झाली आहे. आणि या पहिल्याच आठवड्यात स्पर्धकांनी घरात धुमाकूळ माजवला आहे. सेलिब्रेटी स्पर्धक सतत कोणत्या ना कोणत्या कारणावरुन एकमेकांसोबत वादविवाद करताना पाहायला मिळत आहेत. दरम्यान शिव ठाकरे आणि एमसी स्टॅनमध्ये असं काही झाली ऐकून रॅपर इमोशनल झाला.

बिग बॉसच्या घरात आता टास्कला सुरुवात झाली आहे. नुकतंच घरात पहिला टास्क पार पडला. यामध्ये एमसी स्टॅनच्या बुटांवर कमेंट करण्यात आल्या. हे प्रकरण इतकं वाढलं कि त्याचं रुपांतर भांडणात व्हायला वेळ लागला नाही. दरम्यान स्पर्धक असलेलय साजिद खानने हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. परंतु बिग बॉसच्या घरातील हा वाद सध्या चर्चेत आला आहे. पाहूया नेमकं काय घडलंय.

'बिग बॉस'ने घरामध्ये रॅपर एमसी स्टॅन आणि गायक असणारा अब्दू रोजिक यांच्यामध्ये एक स्पर्धा ठेवली होती. यामध्ये घरातील सदस्यांना या दोन्हीपैकी एका सदस्यासोबत रील बनवण्यास सांगण्यात आलं होतं. या टास्कदरम्यान अभिनेता शालिन भनौतने रॅपर एमसी स्टॅनसोबत रील बनवला. या रीलमध्ये शालिनने आपल्या बुटांचा उल्लेख केला होता. ज्यावर 80 हजार असं लिहलं होतं. यावेळी शालिन आणि एमसीने रील तर बनवलं पण त्यानंतर एमसी स्टॅनच्या बुटांची खिल्ली उडवली जाऊ लागली.

अर्चना गौतमने गौतम वीजसमोर एमसी स्टॅनच्या बुटांवर कमेंट करत खिल्ली उडवली. नंतर ही गोष्ट एमसी स्टॅनपर्यंत पोहोचली. त्यानंतर या विषयावर साजिद खान,शिव ठाकरे, एमसी स्टॅन आणि अब्दू रोजिकमध्ये चर्चा झाली. यावेळी साजिद खानने सर्वांना समजवण्याच्या हेतूने म्हटलं, 'जी लोक गरिबीतून, कष्ट करुन वर येतात. जास्त पैसा कमावतात लोक त्यांच्याबाबत नेहमी असंच बोलत असतात. यावर स्टॅनने म्हटलं , 'मी असा मुलगा नाहीय. मी कधीच माझ्या मित्रांसमोर पैशांचा रुबाब दाखवला नाहीय'.

(हे वाचा:Bigg Boss 16: 'येथे सर्वांना सिद्धार्थ-शेहनाज बनायचं आहे'; सुम्बुल-शालिनच्या नात्यावर मान्याची टीका )

यावर मजा करत शिवनेसुद्धा एमसी स्टॅनवर वैयक्तिक कमेंट केली. त्याला नंतर आपल्या चुकीची जाणीव झाली आणि त्याने एमसीची माफीदेखील मागितली.परंतु तोपर्यंत विलंब झाला होता. ती कमेंट ऐकून एमसीला राग अनावर झाला होता. रागात एमसीनेदेखील शिव ठाकरेला चांगलंच ऐकवलं आहे. यावेळी इतर स्पर्धक एमसी स्टॅनसोबत उभे राहिले. तर शिवला आपला ऍटिट्यूड बदलण्याचा सल्लाही देऊन टाकला. हा एपिसोड सध्या जोरदार चर्चेत आहे.

First published:

Tags: Bigg boss, Entertainment