मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Bigg Boss 16: उंची छोटी नेटवर्थ मोठी; अब्दु रोजिकबाबत 'या' गोष्टी तुम्हालाही करतील थक्क

Bigg Boss 16: उंची छोटी नेटवर्थ मोठी; अब्दु रोजिकबाबत 'या' गोष्टी तुम्हालाही करतील थक्क

अब्दू रोजिक

अब्दू रोजिक

'बिग बॉस' या लोकप्रिय शोने पुन्हा एकदा टीव्हीवर धडक दिली आहे. यंदा बिग बॉसचा 16 वा सीजन प्रसारित केला जात आहे. सोळाव्या सीजनचा ग्रँड प्रीमिअर सोहळा नुकतंच पार पडला.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Maharashtra, India
  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 2 ऑक्टोबर-  'बिग बॉस' या लोकप्रिय शोने पुन्हा एकदा टीव्हीवर धडक दिली आहे. यंदा बिग बॉसचा 16 वा सीजन प्रसारित केला जात आहे. सोळाव्या सीजनचा ग्रँड प्रीमिअर सोहळा नुकतंच पार पडला. यामध्ये होस्ट-अभिनेता सलमान खानने घरातील सेलिब्रेटी स्पर्धकांची ओळख करुन दिली आहे. यातील काही स्पर्धकांना प्रेक्षकांनी मालिका आणि इतर रिऍलिटी शोमध्ये पाहिलं आहे. तर काही स्पर्धक नव्याने समोर आले आहेत. यातीलच एक नाव म्हणजे गायक अब्दू रोजिक होय. अब्दू रोजिकने पहिल्याच भागात प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. आज आपण त्याबद्दलच जाणून घेणार आहोत.

'बिग बोस 16' मध्ये दरवर्षी प्रमाणे यंदाही विदेशी स्पर्धक सहभागी झाला आहे. यावेळी कझाकिस्तानचा लोकप्रिय गायक अब्दू रोजिक सहभागी झाला आहे. अब्दू 19 वर्षांचा आहे. परंतु त्यांची उंची फारच कमी आहे. परंतु तो प्रचंड सक्रिय कलाकार आहे. आपल्या कलेने त्याने प्रेक्षकांना भुरळ पाडली आहे. गेल्या काही दिवसांपासून अब्दूला अनेक रिऍलिटी शोमध्ये [पाहण्यात आलं आहे.. नुकतंच अब्दू आयफा पुरस्कार सोहळ्यामध्ये बॉलिवूड अभिनेता आणि बिग बॉस होस्ट सलमान खानसोबत दिसून आला होता.

सोशल मीडियावर सक्रिय-

अब्दू रोजिक हा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. तो गेल्या काही दिवसांपासून इंटरनेटवर प्रचंड व्हायरल होत आहे. आपल्या हटके रॅपिंग स्टाईलमुळे अब्दू फारच कमी वेळेत प्रचंड लोकप्रिय झाला आहे. कदाचित त्यामुळेच त्याला बिग बॉसच्या घरात येण्याची संधी मिळाली असेल. सोहळा मीडियावर त्याची मोठी फॅन फॉलोईंग आहे. अब्दू रोजिकचे इन्स्टाग्रामवर 3.8 मिलियन फॉलोअर्स आहेत. तो सतत आपले व्हिडीओ आणि फोट शेअर करत असतो. त्याच्या प्रत्येक पोस्ट चर्चेत असतात.

अब्दू रोजिकला आहे 'हा' आजार-

अब्दू रोजिक हा एक कझाकिस्तानचा प्रसिद्ध गायक आहे. त्याच वय 19 वर्षे आहे. अब्दूचा जन्म 3 सप्टेंबर 2003 मध्ये झाला होता. अब्दूला लहानपणापासून 'रिकेट्स' हा दुर्मिळ आजार आहे. या आजारामुळेच त्याची उंची वाढू शकली नाहीय.परंतु आपलं शारीरिक व्यंग बाजूला ठेऊन आपल्या कलेच्या जोरावर त्याने जगभरात आपली ओळख निर्माण केली आहे.

(हे वाचा:Bigg Boss 16: लेकाला पाहण्यासाठी आईने खरेदी केला 70 हजारांचा टीव्ही; कोण आहे MC STAN?)

अब्दू रोजिक नेटवर्थ-

अब्दू रोजिकची गणना जगातील सर्वात छोट्या गायकांच्या यादीत केली जाते. त्याला अलीकडेच शाहिद कपूर, शिल्पा शेट्टी, अनुष्का शर्मा, विराट कोहली यांसारख्या दिग्गज सेलिब्रेटींसोबत पाहण्यात आलं आहे. इतकंच नव्हे तर अब्दू सलमान खानच्या 'किसी का भाई किसी कि जान' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार अवघ्या 19 वर्षांच्या अब्दूकडे 2 कोटींची संपत्ती आहे. युट्युब, इन्स्टाग्राम रील्स याद्वारे त्याची चांगली कमाई होत असल्याचं रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आलं आहे.

First published:

Tags: Bigg boss, Entertainment