मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Bigg Boss 16: घरात पहिल्याच दिवशी 'बिकिनी गर्ल'चा राडा; स्पर्धकांशी घेतला पंगा

Bigg Boss 16: घरात पहिल्याच दिवशी 'बिकिनी गर्ल'चा राडा; स्पर्धकांशी घेतला पंगा

फोटो

फोटो

नुकतंच 'बिग बॉस'ची धमाकेदार सुरुवात झाली आहे. सेलिब्रेटी स्पर्धकांची ओळख अखेर समोर आली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Maharashtra, India
  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 2 ऑक्टोबर-   नुकतंच 'बिग बॉस'ची धमाकेदार सुरुवात झाली आहे. सेलिब्रेटी स्पर्धकांची ओळख अखेर समोर आली आहे. प्रत्येक स्पर्धक बिग बॉसच्या घरात प्रवेश करतो तेव्हा तो शोचा विजेता बनण्यासाठी काही ना काही रणनीती बनवून येतो. पण बिग बॉसच्या घरातील इतर स्पर्धक टास्कसमोर सर्व काही मागे पडतं. शनिवारी, बिग बॉसचा प्रीमियर पडला. यामध्ये 16 स्पर्धकांनी घरात एन्ट्री केली आहे. परंतु एन्ट्री करताच बिग बॉसच्या घरात राडा दिसून आला. घरात असलेल्या बेडवरुन दोन स्पर्धकांमध्ये चांगलीच तुतू-मैमै दिसून आली. पहिल्याच दिवशी स्पर्धकांमध्ये वादविवाद सुरु झाल्याने येणाऱ्या काळात शो फारच धमाकेदार आणि चटपटीत होणार हे मात्र नक्की.

शनिवारी रात्री बिग बॉसच्या सोळाव्या सीजनला सुरुवात झाली आहे. होस्ट-अभिनेता सलमान खानने आपल्या नेहमीच्या खास अंदाजात घरातील स्पर्धकांची ओळख करुन दिली आहे. यंदा बिग बॉसच्या घरात उत्तर प्रदेशची काँग्रेस नेता आणि 'बिकिनी गर्ल' म्हणून प्रसिद्ध असलेल्या अर्चना गौतमनेही एन्ट्री केली आहे. घरात दाखल होताच अर्चनाने आपला खेळ सुरु केला आहे. सलमानने ओळख करुन दिल्यानंतर अर्चनाने फार मजेशीर रित्या स्वतःला सादर केलं आहे. अर्चनाने आपल्याला घरात खरं प्रेम मिळेल अशी अपेक्षा पहिल्याच दिवशी व्यक्त केली आहे.

दरम्यान बिग बॉसच्या घरात जाताच अर्चना गौतम आणि 'छोटी सरदारनी' फेम अभिनेत्री निमरीत कौर अहलुवालिया यांच्यात चांगलाच राडा दिसून आला. निमरीत घरात जाताच स्वतःला कॅप्टन बनण्यासाठी सिद्ध करत आहे. खरं तर तिला बिग बॉसने हा टास्क दिला होता. ती घरातील पहिली स्पर्धक असल्याने बिग बॉसने तिला घरात येणाऱ्या प्रत्येक सदस्याला कामाचं वाटप करुन त्यांना त्यांचा बेड सुनिश्चित करुन देण्याचं काम दिलं होतं. जे ती काही प्रमाणात यशस्वीरित्या पार पाडत होती.

परंतु जेव्हा घरातील सदस्यांमीध्ये बेडबाबत संवाद सुरु असतो. तेव्हा निमरीत म्हणते, गरज पडली तर मी अर्चना यांचा बेड बदलून इतरांना देऊ शकते, आणि त्यांना दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट करु शकते. याच मुद्द्यावरुन अर्चना भडकते. आणि कोणत्याही परिस्थिती आपण आपला बेड सोडणार नसल्याचं सांगते. यावर घरातील इतर सध्या तिला समजावण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा ती तुम्हाला वेड लागलंय का म्हणून वाद घालू लागते.

(हे वाचा:Bigg Boss 16: बिग बॉसच्या घरात दिसणार 'उडारियां' फेम अंकित-प्रियांकाचा रोमान्स; समोर आल्या डिटेल्स )

यावेळी सर्वलोक निमरीतच्या बाजूने बोलू लागतात. तर मराठी बिग बॉस विजेता शिव ठाकरे अर्चनाला शांत करण्याचा पर्यटन करतो. त्याला तिच्या बेडजवळ घेऊन जातो. तिला समजावयाचा पर्यटन करतो. यावेळी अर्चना म्हणते, या बेडजवळ आरसा आहे. त्यामुळे हा बेड मला हवा. मला स्वतःला उठल्याबरोबर पाहायला आवडतं. त्यामुळे मला आरसा असलेला हा बेडच हवा. मी कोणासाठीही तो सोडणार नाही. आता येणाऱ्या काळात अर्चना आणखी कोणते राडे करते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

First published:

Tags: Bigg boss, Entertainment, Salman khan