मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Bigg Boss 15: 'विश्व् सुंत्री'ने सदस्यांना दिला 440व्होल्टचा झटका ; '25 लाख गमवा किंवा शोमधून बाहेर व्हा',ठेवली अनोखी अट

Bigg Boss 15: 'विश्व् सुंत्री'ने सदस्यांना दिला 440व्होल्टचा झटका ; '25 लाख गमवा किंवा शोमधून बाहेर व्हा',ठेवली अनोखी अट

सध्या घरात 'तिकीट टू मुख्य घर' हा टास्क सुरू आहे. परंतु बिग बॉसने यात एक मोठा ट्विस्ट आणला आहे. या कार्यासाठी बिग बॉसने कुटुंबातील सदस्यांसमोर एक अट ठेवली आहे.

सध्या घरात 'तिकीट टू मुख्य घर' हा टास्क सुरू आहे. परंतु बिग बॉसने यात एक मोठा ट्विस्ट आणला आहे. या कार्यासाठी बिग बॉसने कुटुंबातील सदस्यांसमोर एक अट ठेवली आहे.

सध्या घरात 'तिकीट टू मुख्य घर' हा टास्क सुरू आहे. परंतु बिग बॉसने यात एक मोठा ट्विस्ट आणला आहे. या कार्यासाठी बिग बॉसने कुटुंबातील सदस्यांसमोर एक अट ठेवली आहे.

  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 23ऑक्टोबर- 'बिग बॉस 15' (Bigg Boss 15) मध्ये एकामागून एक ट्विस्ट येत आहेत. या शोबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. या घरात काही दिवसांपूर्वी स्पर्धक आठवड्याच्या मध्यावर बेदखल झाले होते, ज्यामध्ये विधी पांड्या (Vidhi Pandya) आणि डोनल बिष्ट(Donal Bisht) या दोघींना इन-हाउस मतदानामुळे शोमधून बाहेर पडावं लागलं होतं, परंतु आता शोमध्ये एक रंजक कार्य चालू आहे. ज्यामुळे शोमध्ये खळबळ उडाली आहे. सध्या घरात 'तिकीट टू मुख्य घर' हा टास्क सुरू आहे. परंतु बिग बॉसने यात एक मोठा ट्विस्ट आणला आहे. या कार्यासाठी बिग बॉसने कुटुंबातील सदस्यांसमोर एक अट ठेवली आहे. की मुख्य घरात जाण्यासाठी त्यांच्या बक्षीस रकमेतून काही रक्कम कापली जाईल.

View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

बराच गदारोळ आणि भांडणानंतर, शमिता शेट्टी, तेजस्वी प्रकाश, करण कुंद्रा आणि विशाल कोटियन सुमारे 7 लाख गमावल्यानंतर घरात पोहोचतात. मात्र, जय भानुशाली सुरुवातीपासूनच बक्षिसाची रक्कम वाचवण्याचा प्रयत्न करत होता.आता 'विश्व सुत्री'ने घरात असे फासे फिरवले आहेत की कुटुंबातील सदस्यही आश्चर्यचकित झाले आहेत. वास्तविक, 'विश्व सुत्री' ने कुटुंबातील सदस्यांसमोर एक अट ठेवली आहे. की एकतर 25 लाख रुपये गमावून मुख्य घरात प्रवेश करा. किंवा शो सोडून जा. आता जंगलात राहणारे सदस्य काय भूमिका घेतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

(हे वाचा:Bigg Boss 15: राकेशसोबत या प्रसिद्ध मॉडेलची होणार वाईल्ड कार्ड एन्ट्री ... )

मीडिया रिपोर्टनुसार, या घोषणेनंतर कुटुंबातील सदस्य घरी परतले आहेत. येत्या एपिसोड्समध्ये ते समोर येणार आहे. त्याचवेळी, निर्माते आता राकेश बापटला बिग बॉसमध्ये वाईल्ड कार्ड एंट्री देण्याचा विचार करत आहेत. शोमध्ये राकेश बापट आणि शमिता शेट्टी यांना एकत्र पाहणं त्यांच्या चाहत्यांसाठी फारच मजेशीर असेल. शमिता शेट्टी आणि राकेश बापट यांची 'बिग बॉस ओटीटी'मध्ये भेट झाली होती. आणि तेथे कनेक्शन झाल्यानंतर दोघांमध्ये जवळीकता निर्माण झाली होती.

(हे वाचा:Bigg Boss 15:बिग बॉसच्या घरात मायशा अय्यर-ईशान सेहगलने केलं Kiss ... )

राकेश आणि शमिताने शोमध्ये दोघेही एकमेकांना आवडत असल्याचं म्हटलं होतं. त्यांनी 'बिग बॉस ओटीटी'मध्येच सांगितलं होतं की त्यांची मैत्री शोच्या बाहेरही अशीच राहील. मात्र, दोघांनीही आपलं नातं अद्याप अधिकृत केलेलं नाही. शोच्या बाहेर, दोघांनाही लंच डेट आणि डिनर डेट्सवर अनेक वेळा स्पॉट केलं गेलं. अशा परिस्थितीमध्ये बिग बॉसच्या घरात राकेश बापट आला तर शो आणखीनच रंजक होईल.तसेच एका रिपोर्टनुसार, माजी मॉडेल आणि उद्योजक राजीव अदातिया 'बिग बॉस 15' च्या घरात प्रवेश करण्यासाठी सज्ज आहे. राजीव मनोरंजन क्षेत्रातील लोकांमध्ये एक सुप्रसिद्ध चेहरा आहे. आणि बॉलिवूडच्या अनेक मोठ्या सेलिब्रिटींच्या अगदी जवळचा मित्र आहे. महत्वाचं म्हणजे राजीव हा शमिता शेट्टीचा मानलेला भाऊ आहे.

First published:

Tags: Bigg boss, Entertainment