मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Bigg Boss 15: बिग बॉसच्या घरातून राकेश बाटपला रुग्णालयात केलं दाखल; या गंभीर आजाराने त्रस्त आहे अभिनेता

Bigg Boss 15: बिग बॉसच्या घरातून राकेश बाटपला रुग्णालयात केलं दाखल; या गंभीर आजाराने त्रस्त आहे अभिनेता

शमिता आणि राकेश पहिल्यांदाच 'बिग बॉस ओटीटी'च्या घरात भेटले होते. आणि शोमध्ये दोघांचे कनेक्शन जमले होते. त्यांनी वेळोवेळी एकमेकांबद्दलच्या भावना दर्शवल्या होत्या. आणि काही वेळेतच एकमेकांबद्दलचे प्रेम व्यक्त केले होते.

  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 10 नोव्हेंबर- 'बिग बॉस 15'  (Bigg Boss)  मध्ये वाईल्ड कार्ड एंट्री करणाऱ्या राकेश बापटला (Rakesh Bapat Hospitlised) मध्येच शो सोडावा लागला. राकेश यांना किडनी स्टोनमुळे तीव्र वेदना होत होत्या. यानंतर, शो थेट रुग्णालयात गेला आहे आणि डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली आहे आणि लवकरच तो बरा होऊन शोमध्ये सहभागी होऊ शकतो. राकेशने अलीकडेच मैत्रिणी नेहा भसीनसोबत शोमध्ये वाईल्ड कार्ड एन्ट्री केली. त्याला पाहून त्याची प्रेमिका आणि अभिनेत्री शमिता शेट्टी खूप खूश आणि भावुक झाली होती.

ETimes च्या रिपोर्टनुसार, 'बिग बॉस 15' च्या जवळच्या सूत्रांनी सांगितले की, राकेश बापटला 8 नोव्हेंबरच्या रात्री प्रचंड वेदना होत होत्या आणि 9 नोव्हेंबर रोजी दिवसा मुंबईच्या फिल्मसिटीमधील 'बिग बॉस 15' च्या घरातून त्याला बाहेर घेऊन जाण्यात आले होते. राकेशला सध्या मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तो सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली असून लवकरच बरा होऊन शोमध्ये परतण्याची शक्यता आहे.

राकेश बापटने दिवाळीच्या आठवड्यात गोरिला ड्रेस परिधान करून घरात प्रवेश केला होता. त्याला पाहून त्याची प्रेयसी शमिताला आश्चर्यचा सुखद धक्का बसला होता. तो दुसरी 'बिग बॉस ओटीटी' स्पर्धक नेहा भसीनसोबत घरामध्ये दाखल झाला होता. दरम्यान शमिताने राकेशला मिठी मारली होती. तसेच तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते. बिग बॉसने नुकतीच घरामध्ये राकेश-शमितासाठी एक सुंदर डेट आयोजित केली होती. बिग बॉसच्या टीमने एक सुंदर आणि रोमँटिक डेट आयोजित केली होती. दोघेही घरातील इतर सदस्यांव्यतिरिक्त एकमेकांसोबत वेळ घालवताना खूप आनंदी दिसत होते.

शमिता आणि राकेश पहिल्यांदाच 'बिग बॉस ओटीटी'च्या घरात भेटले होते. आणि शोमध्ये दोघांचे कनेक्शन जमले होते. त्यांनी वेळोवेळी एकमेकांबद्दलच्या भावना दर्शवल्या होत्या. आणि काही वेळेतच एकमेकांबद्दलचे प्रेम व्यक्त केले होते. यादरम्यान या जोडीने अनेक चढउतारही अनुभवले. पण ते एकमेकांच्या पाठीशी ठाम राहिले. शोमधून बाहेर पडताना राकेशने शमिताला बाहेर भेटण्याचं आवाहनसुद्धा दिलं होतं. त्यानुसार या दोघांना अनेक ठिकाणी डिनर डेट पाहण्यात आलं होतं.

First published:

Tags: Bigg boss, Entertainment