मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Bigg Boss 15: Kissing व्हिडीओ VIRAL होताच चर्चेत आली मायशा अय्यर; एक्स बॉयफ्रेंडवर केले होते गंभीर आरोप

Bigg Boss 15: Kissing व्हिडीओ VIRAL होताच चर्चेत आली मायशा अय्यर; एक्स बॉयफ्रेंडवर केले होते गंभीर आरोप

मायशा अय्यर सध्या बिग बॉस १५ मध्ये सहभागी झाली आहे. मात्र यामध्ये ती आपल्या बोल्ड अंदाजामुळे पहिल्याच आठवड्यात चर्चेत आली आहे.

मायशा अय्यर सध्या बिग बॉस १५ मध्ये सहभागी झाली आहे. मात्र यामध्ये ती आपल्या बोल्ड अंदाजामुळे पहिल्याच आठवड्यात चर्चेत आली आहे.

मायशा अय्यर सध्या बिग बॉस १५ मध्ये सहभागी झाली आहे. मात्र यामध्ये ती आपल्या बोल्ड अंदाजामुळे पहिल्याच आठवड्यात चर्चेत आली आहे.

  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 12ऑक्टोबर- टीव्हीवरील (Tv Show) सर्वात लोकप्रिय शो 'बिग बॉस' (Bigg Boss 15) सध्या आपलं मनोरंजन करत आहे.तब्बल १६ स्पर्धकांनी घरात एन्ट्री घेतली होती. त्यात आता १५ स्पर्धक घरामध्ये राहिले आहेत. हे स्पर्धक दिवसेंदिवस चर्चेत आहेत. या स्पर्धकांबद्दल अधिक जाणून घेण्याची सर्वांनाच उत्सुकता आहे. दरम्यान सर्वात जास्त चर्चेत आलेले स्पर्धक म्हणजे मायशा अय्यर(Miesha Iyer) आणि ईशान सेहगल होय. पहिल्याच आठवड्यात बिग बॉसच्या घरात किस करत या दोघांनीही खळबळ माजवली आहे. या दोघांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यापासून सर्वांना त्यांच्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता लागली आहे. त्यातील आज आपण मायशा अय्यरबद्दल जाणून घेणार आहोत.

View this post on Instagram

A post shared by Miesha⭐ (@mieshaiyer)

मायशा अय्यर ही स्पर्धक २५ वर्षांची आहे. ती मूळची मुंबईचीच आहे. मायशाचे वडील मुंबईचे एक उद्योगपती आहेत. तर तिची आई ही फॅशन जगताशी संबंधित आहे. मायशाने मुंबईमध्ये आपलं शिक्षण पूर्ण केलं आहे. त्यांनतर तिने मॉडेलिंगकडे आपला मोर्चा वळवला. मायशाने सर्वप्रथम M TVवरील 'एस ऑफ स्पेस' यातून टीव्ही जगतात प्रवेश केला होता. यामध्ये तिचा प्रतीक सहेजपालसोबत अनेकवेळा वाद पाहायला मिळाला होता. अर्थातच बिग बॉस १५ मध्ये आमने-सामने येणारे मायशा आणि प्रतीक याआधीही एकमेकांसोबत भिडले आहेत. त्यांनतर मायशाने 'स्पिलट्सविला १२' मध्येही सहभाग घेतला होता. त्यातीलही वादविवादामुळे ती अनेकवेळा चर्चेत आली होती.

View this post on Instagram

A post shared by Miesha⭐ (@mieshaiyer)

मायशा आणि रिलेशनशिप-

मीडिया रिपोर्टनुसार, टीव्ही जगतात येण्याआधी मायशा अय्यरही एका उद्योगपतीच्या मुलासोबत रिलेशनशीपमध्ये होती. ते अनेक वर्षे एकमेकांना डेट करत असल्याचं म्हटलं जात. मात्र त्यांनतर त्यांच्या नात्याचा शेवट फार वाईट आल्याचं म्हटलं जात. मायशाने आपल्या बॉयफ्रेंड विरोधात पोलिसात तक्रार केल्याचंही म्हटलं जात. तिने आपल्या बॉयफ्रेंडवर खंडणी, त्रास देणे आणि पाठलाग करणे असे अनेक आरोप लावले होते. तिचा एक व्हिडीओ वूटवर 'ब्रेकअप स्टोरीस' मध्ये पाहायला मिळतो.मात्र त्याच्या बॉयफ्रेंडच्या नावाचा तिने खुलासा केलेला नाहीय.

त्यांनतर असं म्हटलं जात की मायशा अय्यर 'रोडीज' फेम आशिष भाटीयासोबत रिलेशनशिपमध्ये होती. या दोघांना अनेकवेळा एकत्र पाहिलं जात होत.

बिग बॉस १५-

मायशा अय्यर सध्या बिग बॉस १५ मध्ये सहभागी झाली आहे. मात्र यामध्ये ती आपल्या बोल्ड अंदाजामुळे पहिल्याच आठवड्यात चर्चेत आली आहे. बिग बॉसमध्ये सध्या तिची ईशान सेहगलसोबत अधिक जवळीकता वाढत आहे. त्यामुळे सोशल मीडियावर ती चर्चेत आहे. नुकताच या दोघांचा बिग बॉसच्या घरातील किस करत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. मात्र नॅशनल टेलिव्हिजनवर हे सर्व करत असल्याचं म्हणत या दोघांना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं जात आहे.

First published:

Tags: Bigg boss, Entertainment