Home /News /entertainment /

Bigg Boss 15: सलमान खानच्या शोमध्ये या 5 नावांची एन्ट्री झाली कन्फर्म; पाहा LIST

Bigg Boss 15: सलमान खानच्या शोमध्ये या 5 नावांची एन्ट्री झाली कन्फर्म; पाहा LIST

गुरुवारी 'बिग बॉस 15'ची प्रेस मिटिंगचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी स्पर्धकांच्या नावाचा खुलासा करण्यात आला आहे

    मुंबई, 24 सप्टेंबर- नुकताच 'बिग बॉस OTT'(Bigg Boss OTT) चा महाअंतिम सोहळा पार पडला आहे. त्यांनतर प्रेक्षकांना 'बिग बॉस 15'(Bigg Boss 15)ची ओढ लागली आहे. लवकरच ही प्रतीक्षासुद्धा संपणार आहे. येत्या 2 ऑक्टोबरला बिग बॉसचा ग्रँड प्रीमिअर होणार आहे. यावेळीच सर्व स्पर्धकांचादेखील खुलासा करण्यात येणार आहे. मात्र तत्पूर्वीच प्रेक्षकांना स्पर्धकांबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता लागली आहे. दरम्यान खात्रीशीर 5 स्पर्धकांची नवे समोर आली आहेत. नुकताच बिग बॉस 15 च्या प्रेस मिटिंगमध्ये या नावांचा खुलासा करण्यात आला आहे. या दोन नावांवर झाला शिक्का मोर्तब- गुरुवारी 'बिग बॉस 15'ची प्रेस मिटिंगचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी २ स्पर्धकांच्या नावाचा खुलासा करण्यात आला आहे. बिग बॉस 13 चा स्पर्धक असीम रियाजचा भाऊ उमर रियाज आणि अभिनेत्री डोनल बिष्ट यांच्या नावावर शिक्का मोर्तब झाला आहे. या दोघांचं नाव प्रेस नोटमध्ये जाहीर करण्यात आलं आहे. या दोघांनी व्हिडीओ कॉलद्वारे सर्वांशी संवाददेखील साधला. या प्रेस मीटचं होस्टिंग अभिनेत्री आणि बिग बॉसच्या माजी स्पर्धक आरती सिंग आणि देबोलीना भट्टाचार्या यांनी केलं. 'बिग बॉस OTT'चे 3 स्पर्धक- उमर रियाज आणि डोनल बिष्टशिवाय अजून 3 स्पर्धकांच्या नावावर शिक्का मोर्तब झाला आहे. त्यामध्ये बिग बॉस ottचा टॉप ५ स्पर्धक प्रतीक सहेजपालचा समावेश आहे. प्रतीकने शो क्वीट करत बिग बॉस १५चं तिकीट मिळवलं होतं. तसेच आरती आणि देबोलीनाने प्रेस मिटिंगमध्ये जाहीर केलं की निशांत भट्ट आणि शमिता शेट्टीदेखील या सीजनचे स्पर्धक असणार आहेत. (हे वाचा:Bigg Boss15: 'उतरन' फेम टीना दत्ताची बिग बॉसमध्ये होणार एन्ट्री!अभिनेत्रीच्या..) काय असणार खास- यावेळी शोमध्ये जंगल थीम पाहायाला मिळणार आहे. सर्व स्पर्धक तब्बल 250 कॅमेऱ्यांच्या देखरेखीत राहणार आहेत. दरम्यान सलमान खानने म्हटलं, 'जंगलमध्ये मंगल होणार की दंगल. मी यावेळी सर्वांच्या चेहऱ्यावर हास्य बघू इच्छितो. काही प्रमाणात भाडणं, काही प्रमाणात रोमान्स. तसेच मी यावेळी काही स्पर्धकांना स्वतःसाठी लढताना बघू इच्छितो तर काहींना आपल्यांसाठी'. (हे वाचा:Bigg Boss15: 'थीम आणि ट्विस्टपासून स्पर्धकांपर्यंत' जाणून घ्या बिग बॉस 15 च्या..) या नावांचीसुद्धा होतेय चर्चा- बिग बॉस 15 साठी पप्रसिद्ध अभिनेता करण कुंद्राच्या नावाची जोरदार चर्चा सुरु आहे. तसेच अभिनेत्री तेजस्वी प्रकाश, अकासा सिंग, नागपाल सिम्बा, विशाल कोटियन, अर्जुन बिजलानी, अफसाना यांच्या नावाचीसुद्धा जोरदार चर्चा होत आहे. मात्र अधिकृत माहिती मिळालेली नाही.
    Published by:Aiman Desai
    First published:

    Tags: Bigg boss, Entertainment

    पुढील बातम्या