मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

BB 15: 'तू माझ्यावर कधी प्रेम केलेच नाहीस..', तेजस्वीच्या बोलण्याने करण लागला रडू, Video

BB 15: 'तू माझ्यावर कधी प्रेम केलेच नाहीस..', तेजस्वीच्या बोलण्याने करण लागला रडू, Video

'बिग बॉस 15' (Bigg Boss 15) च्या आगामी एपिसोडच्या प्रोमो पाहून करण कुंद्रा (Karan Kundrra) आणि तेजस्वी प्रकाश (Tejasswi Prakash) यांची प्रेमकहाणी संपुष्टात येण्याची शक्यता दिसत आहे.

  • Published by:  News18 Trending Desk

मुंबई, 23 डिसेंबर -'बिग बॉस 15' (Bigg Boss 15) च्या आगामी एपिसोडच्या प्रोमो पाहून करण कुंद्रा (Karan Kundrra) आणि तेजस्वी प्रकाश (Tejasswi Prakash) यांची प्रेमकहाणी संपुष्टात येण्याची शक्यता दिसत आहे. व्हिडिओ क्लिपमध्ये तेजस्वी आणि करणमधील भांडण होताना दिसत आहे. ज्यामध्ये तेजस्वीने आरोप केला आहे की, करणने तिच्यावर कधीही प्रेम केले नाही. करण (Bigg Boss 15 Karan Kundrra crying) यामुळे रडताना दिसत आहे.

करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश यांच्यातील फरक

'बिग बॉस 15'च्या घरात करण आणि तेजस्वी यांना त्यांचे चाहते सोशल मीडियावर 'तेजरन' नावाने हाक मारतात. मात्र बुधवारच्या एपिसोडमध्ये दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला. जेव्हा दोघांमध्ये भांडण झाले तेव्हा तेजस्वीने त्याच्यावर साथ देत नसल्याचा आरोप केला. आता, आगामी एपिसोडच्या प्रोमो व्हिडिओमध्ये या दोघांच्यातील गोष्टी आणखी बिघडत असल्याचं दिसत आहे.

वाचा-Tiger 3 मध्ये कतरिनाला टक्कर देणार ही अभिनेत्री ? ऋतिकसोबत केलंय काम

करण कुंद्रा रडताना दिसला

तेजस्वी करणला म्हणते, 'जसा तू पलटलास त्यावरून एकच दिसून येते तू माझ्यावर कधीच प्रेम केलेच नाहीस.' प्रोमो व्हिडिओमध्ये करण रडताना दिसत आहे. तो म्हणतो, 'जो आठ आठवडे तिच्यासाठी उभा राहिला ती माझ्या प्रेमाबद्दल विचारत आहे.'

View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

आधीच्या ब्रेकअपबद्दल बोलताना दिसला करण

करण रडतो आणि म्हणतो, 'माझ्यासोबत प्रत्येक वेळी असेच घडते.' अभिनेत्याच्या बोलण्यातून तो त्याच्या आधीच्या ब्रेकअपचा संदर्भ देत असल्याचे दिसते. करणने यापूर्वी प्रसिद्ध मॉडेल अनुषा दांडेकरला डेट केले होते. करणने तिच्याशी खोटे बोलून आपली फसवणूक केल्याचे अनुषाने सोशल मीडियावर पोस्ट लिहित म्हटले होते. नाव न घेता ती म्हणाली होती, 'मी माफीची वाट पाहत राहिली, जी कधीच मागितली गेली नाही.'

वाचा-Drishyam फेम अभिनेत्रीचं बोल्ड फोटोशूट! Esther Anil च्या फोटोंवर खिळल्या नजरा

करणने एका मुलाखतीत हे आरोप फेटाळून लावले होते आणि म्हटले होते की, 'मी अनुषाकडून खूप काही शिकलो आहे आणि मी तिचा आणि तिच्या कुटुंबाचा खूप आदर करतो. मी व्यावसायिकपणे पुढे जात असताना माझ्यावर असे आरोप का केले जात आहेत?

First published:

Tags: Bigg boss, Entertainment, Salman khan