• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • Bigg Boss 15 मध्ये शॉकिंग एलिमिनेशन; 'हा' स्पर्धक झाला घरातून 'OUT'

Bigg Boss 15 मध्ये शॉकिंग एलिमिनेशन; 'हा' स्पर्धक झाला घरातून 'OUT'

बिग बॉस 15 (Bigg Boss 15) ला अखेर त्याचे टॉप 5 स्पर्धक मिळाले आहेत. नुकतीच बिग बॉसच्या घरात एक पत्रकार परिषद झाली. ज्यामध्ये मीडिया कर्मचार्‍यांना शोचे टॉप 5 (Top 5) स्पर्धक निवडण्याचा अधिकार देण्यात आला होता.

 • Share this:
  मुंबई, 24 नोव्हेंबर-   बिग बॉस 15   (Bigg Boss 15)   ला अखेर त्याचे टॉप 5 स्पर्धक मिळाले आहेत. नुकतीच बिग बॉसच्या घरात एक पत्रकार परिषद झाली. ज्यामध्ये मीडिया कर्मचार्‍यांना शोचे टॉप 5  (Top 5)  स्पर्धक निवडण्याचा अधिकार देण्यात आला होता. या प्रक्रियेत ज्या पाच स्पर्धकांना टॉप 5 मध्ये स्थान मिळाले त्यात करण कुंद्रा, तेजस्वी प्रकाश, प्रतीक सहजपाल, शमिता शेट्टी आणि निशांत भट्ट यांची नावे आहेत. म्हणजेच, उर्वरित स्पर्धक बॉटम 6 मध्ये आहेत. आता कथित स्पर्धक सिम्बा नागपालला घरातून बेदखल करण्यात आल्याचं समोर येत आहे.
  View this post on Instagram

  A post shared by ColorsTV (@colorstv)

  वास्तविक पाहता, विशाल कोटियन, उमर रियाझ, नेहा भसीन, जय भानुशाली आणि राजीव अदातिया यांच्यासह सिम्बा नागपाल बॉटम 6 मध्ये होते.  त्यानंतर सोमवारी झालेल्या धक्कादायक एलिमिनेशन राउंडमध्ये सिंबाला  (Simba Nagpal)  घरातून बाहेर काढण्यात आले असल्याचं म्हटलं जात आहे. बिग बॉसच्या घरातील सर्व नवीन अपडेट्स देण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या द खबरीनुसार, सिम्बा ही एकमेव अशी स्पर्धक आहे जी घरातून बाहेर फेकली जाईल. सिंबाला घरात आलेल्या पाहुण्यांनी वारंवार बोलण्यास आणि निर्भयपणे व्यक्त होण्यास सांगितले होते. घरात जास्त वेळ झोपणे आणि खाणे यावरूनही त्याला ट्रोल करण्यात आले होते. 'शक्ती - अस्तित्व के एहसास की' मध्ये सिम्बाची सहकलाकार राहिलेल्या काम्या पंजाबीनेही तिला घरी उठून काहीतरी करायला सांगितले होते.  पण या सगळ्यानंतरही सिम्बा स्वतःच्या मर्जीने गेम खेळताना दिसला होता.दरम्यान, होस्ट सलमान खानने अलीकडेच सिम्बाचे कौतुक केले आणि सांगितले की बिग बॉसच्या घरात प्रवेश केल्यापासून सिम्बाची लोकप्रियता गगनाला भिडत आहे. सिम्बा शोमध्ये फारसा दिसत नसला तरी त्याची व्यक्तिरेखा प्रेक्षकांची मने जिंकत असल्याचे सलमानने सांगितले. हे ऐकून सिंबाही खूप आनंदी दिसत होता. सिम्बा गेल्या आठवड्यात उमर रियाझसोबतच्या लढतीमुळे चर्चेत होता. ज्यामध्ये तो उमरशी फिझिकल होतो  आणि त्याला पूलमध्ये ढकलतो. यानंतर, सिंबाला शिक्षा करून व्हीआयपी टास्कमधून बाहेर फेकण्यात आले होते. अलीकडे, निर्मात्यांनी शोमध्ये रस वाढवण्यासाठी बिग बॉसच्या माजी स्पर्धक रश्मी देसाई आणि देवोलिना भट्टाचार्जी यांना वाईल्ड कार्ड म्हणून निवडले आहे. याशिवाय बिग बॉस मराठीचा माजी स्पर्धक अभिजीत बिचुकले सुद्धा BB15 च्या घरात वाईल्ड कार्ड म्हणून प्रवेश करणार आहे.
  Published by:Aiman Desai
  First published: