मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Bigg Boss 15: राकेशसोबत या प्रसिद्ध मॉडेलची होणार वाईल्ड कार्ड एन्ट्री! शमितासोबत आहे खास नातं

Bigg Boss 15: राकेशसोबत या प्रसिद्ध मॉडेलची होणार वाईल्ड कार्ड एन्ट्री! शमितासोबत आहे खास नातं

'बिग बॉस 15' (Bigg Boss 15) मध्ये आठवड्याच्या मध्यातून बेदखल झाल्यापासून, घरात वाइल्ड कार्ड एंट्रीबद्दल (Wild card Entry) वेगवेगळे अनुमान लावले जात आहेत.

'बिग बॉस 15' (Bigg Boss 15) मध्ये आठवड्याच्या मध्यातून बेदखल झाल्यापासून, घरात वाइल्ड कार्ड एंट्रीबद्दल (Wild card Entry) वेगवेगळे अनुमान लावले जात आहेत.

'बिग बॉस 15' (Bigg Boss 15) मध्ये आठवड्याच्या मध्यातून बेदखल झाल्यापासून, घरात वाइल्ड कार्ड एंट्रीबद्दल (Wild card Entry) वेगवेगळे अनुमान लावले जात आहेत.

  मुंबई,21ऑक्टोबर- 'बिग बॉस 15' (Bigg Boss 15) मध्ये आठवड्याच्या मध्यातून बेदखल झाल्यापासून, घरात वाइल्ड कार्ड एंट्रीबद्दल (Wild card Entry) वेगवेगळे अनुमान लावले जात आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून अनेक अहवालांमध्ये असा दावा केला जात आहे की 'बिग बॉस ओटीटी' फेम राकेश बापट या शोमध्ये वाइल्ड कार्ड एंट्री करतील. राकेश हा शमिता शेट्टीचा (Shamita Shettuy) जवळचा मित्र आहे. आता आणखी एक स्पर्धक वाइल्ड कार्ड म्हणून घरात प्रवेश करणार आहे. राजीव आदातिया(Rajiv Adatia) असे या स्पर्धकाचे नाव आहे. तो एक मॉडेल आहे.
  View this post on Instagram

  A post shared by Rajiv Adatia (@rajivadatia)

  एका रिपोर्टनुसार, माजी मॉडेल आणि उद्योजक राजीव अदातिया 'बिग बॉस 15' च्या घरात प्रवेश करण्यासाठी सज्ज आहे. राजीव मनोरंजन क्षेत्रातील लोकांमध्ये एक सुप्रसिद्ध चेहरा आहे. आणि बॉलिवूडच्या अनेक मोठ्या सेलिब्रिटींच्या अगदी जवळचा मित्र आहे. त्याचं सोशल मीडिया अकाऊंट एन्जॉय करत आणि बॉलिवूड सेलिब्रिटींसोबत काम करण्याच्या फोटोंनी भरलेला आहे. राजीव अदातिया शमिता शेट्टीच्या अगदी जवळ आहे, जी आधीच या सीझनची स्पर्धक आहे. शमिता ही राजीवची मानलेली बहीण आहे. आणि बिग बॉसच्या घरात असताना ते एकमेकांशी कसं जुळवून घेतात हे पाहणं मनोरंजक असेल. त्याचबरोबर राकेश बापट हा शमिताचा खूप जवळचा मित्र आहे. राकेश आणि शमिता शेट्टीचं बिग बॉस ओटीटीमध्ये कनेक्शन होतं आणि दोघांमध्ये लव्ह अँगलही खूप दाखवण्यात आला होता. तथापि, या दोघांनी आतापर्यंत त्यांचे संबंध केवळ मैत्रीपुरते मर्यादित असल्याचं सांगितलं आहे. (हे वाचा:Bigg Boss 15: करण-तेजस्वीमध्ये फुलतंय नवं नातं? चाहत्यांनी दिलं ... ) 'बिग बॉस ओटीटी'मध्ये राकेश आणि शमिता या दोघांनी एकमेकांना पसंत करत असल्याची पुष्टी केली होती. राकेशनं सांगितलं होतं की शोच्या बाहेरही दोघे मित्र राहतील. शोच्या बाहेर, दोघांनाही लंच डेट आणि डिनर डेट्सवर अनेक वेळा स्पॉट केलं गेलं आहे. राकेश बापट 'बिग बॉस 15' साठी बाहेरून शमिता शेट्टीला सपोर्ट करत आहे. तर घरामध्ये, शमिता राकेश बापटला शोमध्ये अनेक वेळा मिस करताना दिसली आहे. (हे वाचा:Bigg Boss 15 मध्ये वाइल्ड कार्ड एंट्री होणार; शमिता शेट्टीला मिळणार ... ) नुकताच बिग बॉसमधून डोनल बिष्ट आणि विधी पंड्याचं शॉकिंग असं एलिमिनेशन झालं होतं. सध्या शोचा तिसरा आठवडा सुरु आहे. तत्पूर्वीच शोमध्ये अनेक इंटरेस्टिंग गोष्टी पाहायला मिळत आहेत. शोमध्ये दररोज राडे होत आहेत. तर दुसरीकडे मायशा आणि ईशान यांची हॉट लव्हस्टोरी दिसून येत आहे. घरात रोज नवनवीन ट्विस्ट येत आहेत. घरातील सर्व स्पर्धकांनी नियमांकडे दुर्लक्ष केल्यानंतर बिग बॉसने दोन दिवसांपूर्वी सर्वांना शिक्षा केली होती. यामुळे, मुख्य घरातील लोकही घराबाहेर आले आहेत. आणि 'जंगल रहिवाशां'सोबत राहात आहेत. नव्या एपिसोडमध्ये, सर्व स्पर्धकांनी पुन्हा बिग बॉसचे नियम मोडले आणि यामुळे, बिग बॉसने 'जंगलवासिस' च्या स्वयंपाकघराचा गॅस पुरवठा बंद करून त्यांना सर्व सुविधांपासून वंचित केलं आहे.
  Published by:Aiman Desai
  First published:

  Tags: Bigg boss, Entertainment

  पुढील बातम्या