मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Bigg Boss 15: मायशा-ईशानच्या रडण्याची निशांतनं उडवली खिल्ली; पाहून भडकली शमिता शेट्टी

Bigg Boss 15: मायशा-ईशानच्या रडण्याची निशांतनं उडवली खिल्ली; पाहून भडकली शमिता शेट्टी

बिग बॉस 15  (Bigg Boss 15)  च्या मध्ये, माईशा अय्यर   (Miesha Ayyar)  आणि उमर रियाझ  (Umar Riaz) यांनी एका भावनिक टास्कमध्ये कॅप्टनपदासाठी स्पर्धा केली. या टास्कमध्ये स्पर्धकांच्या कुटुंबीयांनी त्यांना दिवाळीनिमित्त भेटवस्तू पाठवल्या होत्या.

पुढे वाचा ...

मुंबई,6 नोव्हेंबर-   बिग बॉस 15  (Bigg Boss 15)  च्या मध्ये, माईशा अय्यर   (Miesha Ayyar)  आणि उमर रियाझ  (Umar Riaz) यांनी एका भावनिक टास्कमध्ये कॅप्टनपदासाठी स्पर्धा केली. या टास्कमध्ये स्पर्धकांच्या कुटुंबीयांनी त्यांना दिवाळीनिमित्त भेटवस्तू पाठवल्या होत्या. एकतर गिफ्ट सोडून देणं किंवा पुढचा कॅप्टन बनण्याच्या इच्छेशी तडजोड करणं हे स्पर्धकांच्या हातात होतं. यामध्ये उमरने त्याच्यासोबत जास्त इंधन स्लॉट देऊन टास्क जिंकला, मायशा अय्यर हारली पण तिने लोकांची मने जिंकली. कारण तिने आपला स्लॉट उमरला दिला होता.

या टास्कमुळे बिग बॉसच्या घरातही जोरदार भांडण सुरू झालं. टास्कदरम्यान भावूक झालेल्या मायशा आणि ईशान सेहगलची निशांत भट आणि तेजस्वी प्रकाश यांनी खिल्ली उडवली होती. शमिता शेट्टी  (Shamita Shetty)  निशांतला  (Nishant Bhatt) दोघांची चेष्टा करताना पाहत होती. ज्यामुळे ती संतापली. थोड्या वेळाने, तिचा स्वतः वरील ताबा सुटला आणि तिने निशांतला लोकांबद्दल असंवेदनशील असल्याबद्दल फटकारण्यास सुरुवात केली.

शमिता शेट्टीने निशांत भटच्या या वागण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत सर्वांच्या भावनांची खिल्ली उडवल्याचा आरोप केला. आजूबाजूचे सगळे रडत असतील तर त्यांना रडायची गरज नाही, अशी प्रतिक्रिया निशांतने दिली. यावेळी त्यानं सांगितलं की तिच्या भावनिक क्षणी तिचं सांत्वन करण्यासाठी तो कसा गेला होता.निशांत पुढे म्हणाला की, त्याला इतरांप्रमाणे जे वाटेल ते व्यक्त करण्याचा अधिकार आहे. "घरातील प्रत्येकाला व्यक्त होण्याचा अधिकार आहे," यावेळी शमिताने निशांतचे युक्तिवाद ऐकण्यास नकार दिला आणि त्याला प्रश्न केला कि, असं वर्तन त्याला मते मिळविण्यात मदत करेल का ?'

शमिता शेट्टीने निशांतला अंगठा दाखवला आणि त्याच्यासमोर टाळी वाजवली. तिच्या प्रतिक्रियेने चिडलेल्या निशांतने विचारले, "काय करतेस शमिता?" टास्क दरम्यान शमिता आणि निशांत या दोघांनाही दिवाळी गिफ्ट नाकारण्यात आले होते.

First published:

Tags: Bigg boss, Entertainment