• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • Bigg Boss 15: बिग बॉसच्या घरात परतणार 'नाही' शमिता शेट्टी? आई सुनंदा शेट्टीने केला खुलासा

Bigg Boss 15: बिग बॉसच्या घरात परतणार 'नाही' शमिता शेट्टी? आई सुनंदा शेट्टीने केला खुलासा

'बिग बॉस 15' (Bigg Boss 15) च्या सोमवारच्या एपिसोडमध्ये शमिता शेट्टीला (Shamita Shetty) वैद्यकीय स्थितीमुळे (Shamita Shetty Medical Condition) बीबीच्या घरातून बाहेर करण्यात आले होते. काही दिवसांपासून शमिताची प्रकृती ठीक नव्हती.

 • Share this:
  मुंबई, 18 नोव्हेंबर-   'बिग बॉस 15'   (Bigg Boss 15)  च्या सोमवारच्या एपिसोडमध्ये शमिता शेट्टीला  (Shamita Shetty)  वैद्यकीय स्थितीमुळे  (Shamita Shetty Medical Condition)  बीबीच्या घरातून बाहेर करण्यात आले होते. काही दिवसांपासून शमिताची प्रकृती ठीक नव्हती. अलीकडील भागांमध्ये, ती मानेच्या मणक्याभोवती किनेसियोलॉजी टेप घातलेली दिसली होती. एका टास्कदरम्यान तिच्या बोटाला हेअरलाइन फ्रॅक्चरही झालं होतं. यापूर्वी असे सांगण्यात आले होते की शमिता 1-2 दिवसात शोमध्ये परत येईल परंतु ती अद्याप बाहेर आहे. शमिता शेट्टीच्या वैद्यकीय स्थितीमुळे अभिनेत्री कधी शोमध्ये परत येईल का, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. अखेर या सर्व अटकळांना पूर्णविराम देत तिची आई सुनंदा शेट्टी यांनी शमिता शोमध्ये परतणार असल्याची पुष्टी केली. एका चाहत्याच्या प्रश्नानंतर शमिता शेट्टीच्या आईने हा खुलासा केला आहे. एका चाहत्याने ट्विट करून विचारले, "मॅडम तिचं (शमिता) साहित्य बीबी हाउसमधून काढून टाकण्यात आलं आहे... ती परत येणार आहे की नाही? यावर सुनंदा शेट्टी यांनी 'होय' असे उत्तर दिले आहे. शमिता शेट्टीच्या प्रकृतीची बातमी ऐकून तिचे चाहते चिंतीत झाले होते. एका चाहत्याने ट्विट केले, "शमिता परत येईल! तिला वैद्यकीय मदत मिळत आहे हे चांगले आहे, तिला खूप वेदना होत होत्या. ती बरी होईल आणि धमाकेदार एन्ट्री करेल!” दुसर्‍या युजरने लिहिले, “ती लवकरच बरी होईल. काही कमेंट वाचा, असा विचार करणाऱ्यांना तिरस्कार वाटला जे म्हणत आहेत शमिताला लाइक केले जात आहे आणि तिचा खेळ सुधारण्यासाठी बाहेर पाठवले जात आहे . सुरुवातीला, ती शारीरिकरित्या एकटीच टास्क खेळत असे आणि नंतर तिच्या शिरा दबल्या गेल्या आहेत. आणि त्यामुळे तिला अलीकडची टास्क खेळता येत नाहीत.” नुकताच बॉयफ्रेंड राकेश बापटनेही सोडलं होतं घर- अलीकडेच शमिताचा बॉयफ्रेंड आणि अभिनेता राकेश बापट यालाही वैद्यकीय आणीबाणीमुळे घर सोडावे लागले होते. राकेश बापटला किडनी स्टोनमुळे प्रचंड वेदना होत होत्या. त्यामुळे त्याला 'बिग बॉस 15' च्या घरातून बाहेर पडावे लागले होते. नुकतीच गायिका नेहा भसीनसोबत वाइल्ड कार्ड एंट्री म्हणून त्याने घराघरात प्रवेश केला होता.
  Published by:Aiman Desai
  First published: