मुंबई, 2 डिसेंबर- बहुचर्चित आणि तितकाच विवादित शो म्हणून बिग बॉसकडं (Bigg Boss) पाहिलं जातं. हा शो सतत चर्चेत असतो. सध्या बिग बॉसचा १५ वा (Bigg Boss 15) सीजन सुरु आहे. हा सीजन एका फारच रंजक वळणावर येऊन पोहोचला आहे. कारण घरात काही जुन्या सीजनच्या स्पर्धकांची एंट्री झाली आहे. हे जुने स्पर्धक घरात येताच नव्या स्पर्धकांसोबत राडे करताना दिसून येत आहेत. नुकताच समोर आलेल्या एका व्हिडीओमध्ये शमिता (Shamita Shetty) आणि देबोलीनामध्ये (Devoleena Bhattacharjee) इतक्या प्रचंड प्रमाणात वाद झाला कि शमिता चक्कर येऊन पडली.
Promo For Tomorrow#ShamitaShetty Fainted and was taken into medical room she is all fine and back in the house now#BiggBoss15 || #BB15pic.twitter.com/mz06GI39hP
— The Khabri (@TheRealKhabri) December 1, 2021
बिग बॉस १५ ला आणखी रंजक बनवण्यासाठी घरामध्ये काही वाईल्ड कार्ड स्पर्धक आणण्यात आले आहेत. यामध्ये रश्मी देसाई, देबोलीना भट्टाचार्जी, राखी सावंत, राखीचा पती रितेश आणि मराठी बिग बॉसचा स्पर्धक अभिजित बिचकुले यांचा समावेश आहे. या स्पर्धकांनी घरात येताच तुफान आणलं आहे. वाईल्ड कार्ड स्पर्धकांसोबत घरातील इतर स्पर्धकांचे खटके उडताना दिसत आहेत. नुकताच द खबरीने आपल्या ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये स्पर्धकांचा वाद टोकाला गेल्याच दिसत आहे. या व्हिडीओमध्ये गोपी बहू फेम अभिनेत्री देबोलिना भट्टाचार्जी आणि शिल्पा शेट्टीची बहीण शमिता शेट्टी यांच्यामध्ये तुफान वाद झालेला दिसून येत आहे.
या व्हिडीओमध्ये देवोलीना शमिताला म्हणता आहे, 'हे आरेतुरे तुझ्या घरी कर इथे नाही..' यावर शमिता ऐकत नाही. शमिता उत्तर देत म्हणते, तुझं डोकं कुठं आहे डार्लिंग...'तुझा डोकं...' त्यांनतर शमिता वारंवार तिला तू... तू करतच बोलते. त्यांनतर देवोलिनाचा पारा चढतो. आणि तो शमिताकडे धावतच येते. या दोघीही एकेमकांच्या अंगावर जाण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र घरातील इतर सदस्य त्यांना थांबवतात. मात्र तरीसुद्धा त्यांच्यात शाब्दिक वाद सुरूच असतो. आणि अशातच शमिताला अचानक चक्कर येते. आणि ती करण कुंद्राच्या हातातच बेशुद्ध होते. त्यानंतर करण तिला उचलून आत घेऊन जातो. असा हा व्हिडीओ आहे. हा व्हिडीओ समोर येताच चाहते मोठ्या प्रमाणात कमेंट्स करत आहेत. स्पर्धकामधील हा वाद जास्तच वाढत असल्याचं दिसत आहे.
(हे वाचा: Bigg Boss 15: राखी सावंतसमोर पती रितेशनं केलं शमिता शेट्टीला प्रपोज ...)
फक्त याच सीजनमध्ये नाही, तर बिग बॉस १४ आणि १३ मध्येही देवोलिना आणि रश्मी देसाईने जबरदस्त ड्रामा केला होता. या दोघींना घरातील प्रत्येक गोष्टीचा बऱ्यापैकी अनुभव आलेला आहे. त्यामुळे या दोघीही इतर स्पर्धकांसोबत सतत राडे करताना दिसून येतात. घरामध्ये एंट्री होताच या दोघीनी आपला गेम सुरु केला आहे. नुकताच रश्मी देसाई आणि प्रतीक सेहेजपाल यांच्यामध्ये जोरदार वाद झाला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bigg boss, Entertainment