मुंबई, 09 डिसेंबर: छोट्या पडद्यावर प्रचंड गाजणारा कार्यक्रम 'बिग बॉस' ( Bigg Boss) प्रेक्षकांमध्ये चर्चेत असतो. सध्या 'बिग बॉस 15' हा सीझन ( Bigg Boss 15 season ) सुरू आहे. ड्रामा क्वीन राखी सावंत ( Rakhi Sawant) हीदेखील बिग बॉसच्या घरात आली आहे. मात्र, राखीच्या पतीबद्दल ( Rakhi's husband ) अभिजित बिचुकले ( Abhijeet Bichukale) याने एक वाक्य बोलल्यामुळे या घरात मोठा वाद झाला. या वाक्यावरून राखीने 'बिग बॉस'च्या घरात चांगलाच गोंधळ घातला आहे. बॉलिवूड लाइफ डॉट कॉम ने याबाबत वृत्त दिले आहे.
'बिग बॉस 15' या सीझनमध्ये भांडण आणि आरडाओरडा नाही, असे होऊच शकत नाही. ही भांडणे सुरू असतानाच अशा काही गोष्टी प्रेक्षकांना (audience) समजतात की, ज्यामुळे प्रेक्षक आश्चर्यचकित होतात. या शोमध्ये अभिजित बिचुकलेने राखी सावंतच्या पतीबद्दल एक वाक्य बोलले होते. त्यावरून राखीने खूप गोंधळ घातला. राखीच्या पतीबद्दल बिचुकले म्हणाला होता की, 'तिने भाड्याने नवरा आणला आहे.' याच विषयावर मंगळवारच्या एपिसोडमध्ये शमिता शेट्टी, राखी सावंत, निशांत भट्ट आणि प्रतीक सहजपाल यांची चर्चा झाली होती. त्याचवेळी राखीला खूप राग आला, व तिने बिचकुलेला धडा शिकवण्याचा निर्णय घेतला.
हेही वाचा- Plane crash मध्ये बर्थडे दिवशीच झाला होता अमिताभ बच्चन यांची को-स्टार Taruni Sachdev हिचा मृत्यू
त्यानंतर बिचकुलेच्या रूममध्ये जात राखीने खूप गोंधळ घातला. 'तू मला म्हणतोस की मी भाड्याने नवरा आणला आहे, अरे तूच भाड्याचा टट्टू आहेस' असे म्हणत तिने अभिजितचे सामान फेकण्यास सुरुवात केली. त्याच्या दिशेने तिने रागाने खुर्ची फेकली, एवढचं नाही तर सुटकेसही जमिनीवर फेकून दिली.
View this post on Instagram
तिचा हा अवतार पाहून अभिजितने सावरासावर करण्यास सुरुवात केली. मी केवळ तसे बोलून विनोद केला होता, असे तो म्हणून लागला. सलमान भाईने देखील असे गंमतीने म्हटले होते, असेही त्याने सांगितले. पण राखीचा राग शांत झाला नाही. उलट ती शूज घालून बेडवर चढली आणि भाईने असे म्हटले नाही, असे म्हटली. त्यातच राखीचा पती रितेश देखील म्हणाला, 'अभिजितच्या मनात असेल म्हणूनच तो असा बोलला असेल.' त्यानंतर प्रतीक आणि बाकीच्या स्पर्धकांनी अभिजितला समजून सांगितले की, तू जे बोललास ते चुकीचं होतं. तेव्हा अभिजितने राखीची माफी मागितली.
माफी मागितल्यानंतर सुद्धा राखीचा राग शांत झाला नाही. ती रागाच्या भरात असे काही बोलून गेली की ते ऐकल्यानंतर सर्वच जण थक्क झाले. ती म्हणाली, 'मी चार वेळा लग्न केले आहे, पण हनिमूनही साजरा केला नाही.' राखी रागाच्याभरात हे वाक्य बोलली, पण आता तिचे उर्वरित तीन पती कोण आहेत, याची चर्चा सुरू झाली आहे. आता राखी हे वाक्य केवळ मनोरंजनासाठी बोलली आहे की रागाच्याभरात खरं बोलून गेली आहे, याचीही चर्चा रंगू लागली आहे.
हेही वाचा- VIDEO: Vickat Wedding आधी एअरपोर्टवर दिसला सलमान खान, पोहोचणार का Ex-गर्लफ्रेंडच्या लग्नात?
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Big boss, Rakhi sawant