मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Bigg Boss 15: बिग बॉसमध्ये बिग तडका! राखी सावंत पतीसोबत घेणार वाईल्ड कार्ड एन्ट्री

Bigg Boss 15: बिग बॉसमध्ये बिग तडका! राखी सावंत पतीसोबत घेणार वाईल्ड कार्ड एन्ट्री

 'बिग बॉस'च्या १५   (Bigg Boss 15)  व्या सीझनमध्ये नवे ट्विस्ट येत आहेत. हा शो घराघरात दररोज नवीन बदलांसह खूप मनोरंजक वळण घेत आहे. अशा परिस्थितीत या शोकडे प्रेक्षकांचा कल वाढत आहे. आता बातमी आहे की ड्रामा क्वीन राखी सावंत (Rakhi Sawant)  आपला कथित पती   (Husband)  रितेशसोबत   (Ritesh)  बिग बॉसच्या घरात वाइल्ड कार्ड एन्ट्री करणार आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 25 नोव्हेंबर- 'बिग बॉस'च्या १५   (Bigg Boss 15)  व्या सीझनमध्ये नवे ट्विस्ट येत आहेत. हा शो घराघरात दररोज नवीन बदलांसह खूप मनोरंजक वळण घेत आहे. अशा परिस्थितीत या शोकडे प्रेक्षकांचा कल वाढत आहे. आता बातमी आहे की ड्रामा क्वीन राखी सावंत (Rakhi Sawant)  आपला कथित पती   (Husband)  रितेशसोबत   (Ritesh)  बिग बॉसच्या घरात वाइल्ड कार्ड एन्ट्री करणार आहे. याबाबत नुकताच राखी सावंतने स्वतः आपल्या सोशल मीडियाद्वारे ही माहिती दिली आहे.

View this post on Instagram

A post shared by Suhana Khan (@suhanakhan2)

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 'बिग बॉस'च्या ओपनिंगमध्ये आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी राखी सावंत आता वाईल्ड कार्ड एंट्री करणार आहे. या बातमीने प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे.'बिग बॉस'चा भाग असलेल्या रश्मी देसाई आणि देबोलिना भट्टाचार्जी घरात प्रवेश करणार आहेत हे सर्वांनाच माहीत आहे. या दोन्ही अभिनेत्री सध्या क्वारंटाईनमध्ये वेळ घालवत आहेत. कोविड प्रोटोकॉल अंतर्गत क्वारंटाईन झाल्यानंतरच घराचा भाग होणार आहेत. त्यांनतर आता अभिनेत्री राखी सावंत घरात एन्ट्री करणार असल्याचं समोर आलं आहे.

नुकताच राखी सावंतने आपल्या इन्स्टाग्राम अकांउटवर एक प्रोमो शेअर केला आहे. त्यामध्ये बिग बॉसचे अनेक जुने सीन जोडण्यात आले आहेत. त्यानंतर राखी सावंतचा एक करंट क्लिपसुद्धा दाखवण्यात येत. ज्यामध्ये ती सांगते आपण आपल्या पतीसोबत बिग बॉस १५ मध्ये एन्ट्री करणार आहे. तसेच ती एका रूममध्ये जाताना दिसते जिथे एक व्यक्ती बसलेली असते. राखी त्याची रितेश अशी ओळख करून देते. मात्र ती व्यक्ती पाठमोरी बसलेली असते. त्यामुळे आपल्याला त्याचा चेहरा दिसत नाही. तसेच राखी सावंत त्याला विचारते तू माझ्यासोबत बिग बॉसमध्ये येणार का? यावर ती व्यक्ती म्हणते. हो नक्की येणार. असा हा नवा व्हिडीओ समोर आला आहे. व्हिडीओ पाहून चाहते भरभरून कमेंट्स करत आहेत. तसेच सर्वांनाच त्या व्यक्तीला पाहण्याची उत्सुकता लागली आहे. ज्याला राखी आपला नवरा म्हणून संबोधत आहे.

(हे वाचा:सलमान खानने सेलिब्रेट केला वडील सलीम खान यांचा बर्थडे; मध्यरात्री शेअर केली..... )

डान्सर-अभिनेत्री राखी सावंत सर्वांचे पूर्ण मनोरंजन करते. याची झलक 'बिग बॉस'मध्ये यापूर्वीच दिसून आली आहे. राखी यापूर्वी 'बिग बॉस 14' चा भाग असताना अंतिम फेरीत पोहोचली होती. सीझन 14 शोच्या स्पर्धकांसाठी राखी हे एक जबरदस्त आव्हान ठरले होते. राखी सावंत आपल्या बोल्ड आणि बिनधास्त अंदाजाने घरामध्ये जबरदस्त धम्माल करणार हे नक्की आहे. तत्पूर्वी राखीने तिच्या इन्स्टाग्राम पोस्टवर सलमान खानसोबतचा एक फोटो शेअर करून वाईल्ड कार्ड एन्ट्रीची बातमीही दिली आहे.

First published:

Tags: Bigg boss, Rakhi sawant