मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /VIDEO - अरे बापरे! रात्री झोपेत Rakhi sawant अशी काय करतेय? Bigg boss 15 च्या घरात सर्वांचीच हवा झाली टाईट

VIDEO - अरे बापरे! रात्री झोपेत Rakhi sawant अशी काय करतेय? Bigg boss 15 च्या घरात सर्वांचीच हवा झाली टाईट

ड्रामा क्वीन राखी सावंतचं (Rakhi sawant) हे नवं रूप पाहून बिग बॉसच्या (Bigg boss 15) घरातील सदस्यांना फुटला घाम

ड्रामा क्वीन राखी सावंतचं (Rakhi sawant) हे नवं रूप पाहून बिग बॉसच्या (Bigg boss 15) घरातील सदस्यांना फुटला घाम

ड्रामा क्वीन राखी सावंतचं (Rakhi sawant) हे नवं रूप पाहून बिग बॉसच्या (Bigg boss 15) घरातील सदस्यांना फुटला घाम

मुंबई, 27 डिसेंबर : अभिनेत्री राखी सावंत (Rakhi sawant) जिला ड्रामा क्वीन म्हणूनही ओळखलं जातं. सध्या ती बिग बॉस 15 (Bigg boss 15) चा भाग आहे. बिग बॉसच्या घरात ती काही ना काही करून कायम चर्चेत राहते. आता तर या ड्रामा क्वीनचं असं रूप समोर आलं आहे, जे तुम्ही कधीच पाहिलं नसेल. राखी सावंत रात्री झोपेत असं काही करताना दिसली (Rakhi sawant doing strange things at night)  त्यामुळे घरातील सर्वांचीच हवा टाईट झाली आहे.

बिग बॉस 15 चा एक नवा प्रोमो समोर आला आहे. ज्यामध्ये विचित्र हरकती करताना दिसते आहे. मह्त्त्वाचं म्हणजे राखी सावंत झोपेत आहेत. झोपेतच ही असं काही भयंकर करत होती जे पाहून घरातील इतर सदस्यांना घाम फुटला. राखीचं असं रूप त्यांनीही कधी पाहिलं नव्हतं. त्यामुळे राखीला नेमकं झालं तरी काय आहे, ती अशी का करते आहे, असा प्रश्न त्यांनाही पडला आहे.

कलर्स टीव्हीच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आल आहे. व्हिडीओत पाहू शकता बिग बॉसच्या घरातील हे रात्रीचं दृश्य आहे. बेडरूममधील हा व्हिडीओ आहे. बेडरूमच्या लाइट्स बंद आहेत.  राखी बेडवर झोपली आहे. त्यावेळी ती विचित्र हालचाल करते. त्यावेळी घरातील इतर सदस्यांचं तिच्याकडे लक्ष जातं. तिला पाहून ते दोघंही घाबरतात.

हे वाचा - बिग बॉस मराठी जिंकल्यानंतर तरी विशाल उलगडणार का 'सौंदर्या'चे राज?

राखी झोपेतच सुरुवातीला आपले हातपाय झटकते. त्यावेळी दुसऱ्या बेडवर उमर आणि रश्मी दोघं गप्पा मारत असतात. त्यांचं लक्ष तिच्याकडे जाताच तेदेखील थोडं घाबरतात. रश्मी म्हणते, तिच्यावर ब्लँकेट टाकून येऊ का? यानंतर ती तिच्याजवळ ब्लँकेट घेऊन जाते. राखी पुन्हा झटका आल्यासारखी करते. रश्मीला धडकीच भरते. ती तिथून दूर पळते.  यानंतर उमर येतो आणि तो राखीला स्पर्श करतो, तेव्हा राखी ओरडतच उठते. ते पाहून उमर, रश्मी आणि प्रतीक सर्वजण घाबरतात.

View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

राखीला झोपेत काही जाणवलं, ही तिची कोणती समस्या आहे की तिचं अनोखं रूप असं या व्हिडीओतील कॅप्शनमध्ये देण्यात आलं आहे.

हे वाचा - सनी लिओनीच्या अटकेची का होतेय मागणी; काय आहे प्रकरण?

याआधी राखी बिग बॉस 14 मध्येही तिने लोकांना घाबरवलं होतं. त्यावेळी ती जुली बनायची. आपल्यामध्ये जुलीची आत्मा आहे. आपल्याला काहीच माहिती नाही असं ती दाखवायची. त्यामुळे प्रोमोत दिसलेल्या राखीच्या या भयंकर वागण्यामागील कारण आज रात्रीच समजेल. रात्री 10.30 वाजता दाखवल्या जाणाऱ्या एपिसोडमध्ये हे पाहायला मिळेल. त्यावेळी राखी नेमकं काय सांगेल याची उत्सुकता आता सर्वांना लागली आहे.

First published:
top videos

    Tags: Bigg boss, Entertainment, Rakhi sawant