मुंबई,10ऑक्टोबर- 'बिग बॉस १५'(Bigg Boss 15) चा नवा प्रोमो सध्या तुफान व्हायरल होत आहे.या प्रोमोमध्ये सध्या सोशल मीडियावर ट्रेंड करत असलेल्या 'मनिके मागे हिथे' गाण्याची मूळ श्रीलंकन गायिका योहानी आलेली दिसत आहे. शोचा होस्ट सलमान खान (Salman Khan) योहानीसोबत (Yohani) स्टेजवर मजामस्ती करताना दिसत आहे.
View this post on Instagram
कलर्स वाहिनीवर सर्वात लोकप्रिय आणि तितकाच विवादित शो बिग बॉस प्रसारित केला जातो. १९ ऑक्टोबरपासून या शोला सुरुवात झाली आहे. सध्या बिग बॉसचा १५ वा सीजन सुरु आहे. बिग बॉसच्या १५ व्या सीजनमध्ये पहिल्या दिवसापासूनच अनेक धमाके होत आहेत. त्यामुळे हा सीजन दिवसेंदिवस जास्त रंजक होताना दिसत आहे. नुकताच बिग बॉस १५ चा नवा प्रोमो समोर आला आहे. यामध्ये श्रीलंकन गायिका योहानीने उपस्थिती लावली आहे. योहानी सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. तिला आपल्या 'मनिके मांगे' या गाण्यामुळे तुफान लोकप्रियता मिळाली आहे.
बिग बॉसच्या नव्या प्रोमोमध्ये योहानीने बिग बॉसच्या स्टेजवर धामकेदार एंट्री केलेली दिसत आहे. तर नंतर ती सलमान खानला 'मनिके मांगे हिथे' गाणं आपल्या सोबत म्हणायला सांगते. यावेळी फारच मजेशीर प्रसंग दिसून येतो. योहानी ही श्रीलंकन आहे. आणि तिचं हे ट्रेंडिंग सॉंगसुद्धा श्रीलंकन भाषेत आहे.त्यामुळे तिच्यासोबत हे गाणंम्हणत असताना सलमानची त्रेधा तिरपीट उडते. तिला या गाण्याचे उच्चारच करता येत नाही. सलमानचे उच्चार पाहून योहानी मोठ्याने हसू लागते. त्यामुळे सलमानही हसू लागतो.
(हे वाचा:Bigg Boss 15:बिग बॉसच्या घरात मायशा अय्यर-ईशान सेहगलने केलं Kiss ... )
'मनिके मागे हिथे' हे गाणं सध्या सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय झालं आहे. प्रत्येक कलाकार असो किंवा सर्वसामान्य व्यक्ती या गाण्यावर रिल्स बनवताना आणि डान्स करताना दिसून येत आहे. त्यामुळे या गाण्याची आणि तिच्या गायिकेची मोठी चर्चा आहे. हे गाणं मूळचं श्रीलंकन सिहंली भाषेत गायिका आणि रॅपर योहानी डिसिल्व्हाने गायिलं आहे. तिने हे गाणं सुरुवातील २०२० मध्ये एक टिक टॉक व्हिडीओसाठी बनवलं होतं. हे गाणं ऐकून एका श्रीलंकन कम्पोजरने योहानीला गाण्यासाठी बोलावून घेतलं. आणि हे गाणं आज सुपरहिट ठरलं आहे. संपूर्ण जगभरात हे गाणं ट्रेंड करत आहे. सध्या या गणायचे मराठी, हिंदी, इंग्लिश, तेलुगू, तामिळ अशा विविध भाषांमध्ये व्हर्जन निघाले आहेत
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Big boss, Entertainment