मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Bigg Boss 15 फेब्रुवारीच्या आधीच बंद होणार ?; हे आहे कारण

Bigg Boss 15 फेब्रुवारीच्या आधीच बंद होणार ?; हे आहे कारण

Bigg Boss 15  फेब्रुवारी 2022 पूर्वीच बंद (Bigg Boss to end before February) होण्याची शक्यता आहे. प्रत्येक आठवड्याला या शोचा टीआरपी घसरत चालल्यामुळे निर्माते हा निर्णय घेण्याचा विचार करत आहेत.

Bigg Boss 15 फेब्रुवारी 2022 पूर्वीच बंद (Bigg Boss to end before February) होण्याची शक्यता आहे. प्रत्येक आठवड्याला या शोचा टीआरपी घसरत चालल्यामुळे निर्माते हा निर्णय घेण्याचा विचार करत आहेत.

Bigg Boss 15 फेब्रुवारी 2022 पूर्वीच बंद (Bigg Boss to end before February) होण्याची शक्यता आहे. प्रत्येक आठवड्याला या शोचा टीआरपी घसरत चालल्यामुळे निर्माते हा निर्णय घेण्याचा विचार करत आहेत.

    मुंबई, 10 नोव्हेंबर-   टीव्हीवरच्या सर्वांत प्रसिद्ध रिअॅलिटी शोजपैकी एक म्हणजे बिग बॉस! सलमान खान होस्ट करत असलेल्या या शोचा सध्या 15वा सीजन (Bigg Boss Season 15) सुरू आहे. दर सीजनप्रमाणे याही वेळी स्पर्धकांची नावं जाहीर झाल्यानंतर प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाली होती; मात्र काही एपिसोड्सनंतरच या शोचा टीआरपी (Bigg Boss 15 TRP) खाली जाऊ लागल्याचं दिसत आहे. यामुळे आता निर्मात्यांवर हा शो पूर्ण होण्यापूर्वीच बंद करण्याची वेळी आली आहे.

    याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली नसली, तरी ‘स्पॉटबॉय’ने दिलेल्या एका वृत्तानुसार हा शो फेब्रुवारी 2022 पूर्वीच बंद (Bigg Boss to end before February) होण्याची शक्यता आहे. प्रत्येक आठवड्याला या शोचा टीआरपी आणखी घसरत चालल्यामुळे निर्माते हा निर्णय घेण्याचा विचार करत असल्याचं या वृत्तात म्हटलं आहे. विशेष म्हणजे, वीकेंड्सला होणाऱ्या ‘वीकेंड का वार’ या स्पेशल एपिसोडचा टीआरपीदेखील (Weekend ka War TRP) अगदीच कमी झाला आहे. 'आज तक'ने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

    वाचा : Shruti Haasan चा Traditional Look पाहून मैत्रीण झाली फिदा! चक्क लग्नासाठी.....

    काही जणांच्या मते, या सीजनमध्ये स्पर्धकांच्या लव्ह लाइफवर जास्त लक्ष दिल्यामुळे टीआरपी घसरला आहे. तेजरण आणि शारा (TejRan and Shara in Bigg Boss) या दोघांवरच जास्त फोकस होत असल्यामुळे दर्शकांमध्ये नाराजी आहे. ‘बॉलिवूड लाइफ’ने दिलेल्या माहितीनुसार, कित्येक जण या शोचं लाइव्ह फीड (Bigg Boss live feed) पाहतात. यामुळेही मालिकेच्या टीआरपीवर परिणाम होत आहे. कारण एकदा लाइव्ह फीडमध्ये थेट प्रक्षेपण पाहिल्यानंतर पुन्हा मालिका पाहण्यात प्रेक्षकांना रस उरत नाही.

    पहिल्या दोन आठड्यांपर्यंत हा शो चांगल्या प्रकारे सुरू होता; मात्र त्यानंतर याचा टीआरपी घसरत चक्क एकवर पोहोचला आहे. निर्मात्यांनी या शोमध्ये प्रेक्षकांचा रस टिकून राहण्यासाठी विविध प्रयोग केले. तसंच, होस्ट आणि इतर गोष्टींवर मोठ्या प्रमाणात पैसेही खर्च केले. शोमध्ये मोठ्या स्टार्सना आणणं, जंगल थीम सेट उभारणं आणि सलमान खानची फी (Bigg Boss Salman Khan Fees) हे सगळं पकडून शोचं एकूण बजेट सुमारे 500 कोटी असल्याचं म्हटलं जात आहे. एवढं करूनही हा शो अगदीच खराब प्रदर्शन करत आहे. सलमाननेदेखील कित्येक वेळा स्पर्धकांना वॉर्निंग दिली आहे. तरीही त्यांच्या गेममध्ये सुधारणा होताना दिसून येत नाहीये.

    वाचा : स्टार प्रवाहच्या नव्या मालिकेत दिसणार ऑलमोस्ट सुफळ संपूर्णचा हा चेहरा

    अशा सर्व गोष्टी लक्षात घेऊन, निर्माते हा सीजन लवकरच गुंडाळण्याची शक्यता आहे. हा शो खरंतर 2022च्या फेब्रुवारीपर्यंत चालणार होता. मात्र, आता त्यापूर्वीच हा शो ऑफएअर जाऊ शकतो.

    First published:
    top videos

      Tags: Bigg boss, Bigg Boss OTT, Entertainment, Salman khan