मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Bigg Boss 15:काम्या पंजाबीने केली जय भानुशालीची पाठराखण! तर शमिता शेट्टीला दिला टोला

Bigg Boss 15:काम्या पंजाबीने केली जय भानुशालीची पाठराखण! तर शमिता शेट्टीला दिला टोला

-'बिग बॉस 15' (Bigg Boss 15) हा टीव्ही शो खूपच रंजक बनला आहे. प्रत्येक स्पर्धकाच्या खेळावर प्रेक्षक आपापल्या प्रतिक्रियाही देत आहेत. वाईल्ड कार्ड एंट्रीमुळे हा शो आणखीनच मनोरंजक झाला आहे.

  • Published by:  Aiman Desai

मुंबई,26ऑक्टोबर-'बिग बॉस 15' (Bigg Boss 15) हा टीव्ही शो खूपच रंजक बनला आहे. प्रत्येक स्पर्धकाच्या खेळावर प्रेक्षक आपापल्या प्रतिक्रियाही देत आहेत. वाईल्ड कार्ड एंट्रीमुळे हा शो आणखीनच मनोरंजक झाला आहे. शोच्या चाहत्यांव्यतिरिक्त, सर्व सेलिब्रिटी देखील स्पर्धकांवर लक्ष ठेवून आहेत. आणि आपापल्या प्रतिक्रिया देत आहेत. शुक्रवारच्या एपिसोडवर प्रतिक्रिया देताना काम्या पंजाबी(Kamya Punjabi) म्हणाली आहे की, 25 लाखांची बक्षीस रक्कम सोडून देण्याचा निर्णय जय भानुशालीचा नव्हता. उर्वरित पाच स्पर्धकांची उमेदवारीही पणाला लागली होती.

शुक्रवारच्या एपिसोडमध्ये, एका टास्क दरम्यान, जय भानुशालीला सांगण्यात आलं की 'बिग बॉस'चे जंगलात राहणारे लोक २५ लाख रुपयांऐवजी घरात राहू शकतात. मात्र त्यासाठी दोन पर्याय आहेत. त्या ऐवजी  ही रक्कम त्यांच्या बक्षीस रकमेतून वजा केली जाईल. दुसरा पर्याय म्हणजे शो सोडणे.

जेव्हा जयने ठरवले की सर्वांनी शोमध्ये यायचं  तेव्हा शमिता शेट्टी म्हणाली की संपूर्ण बक्षिसाची रक्कम सोडून यायचं म्हणजे जय मूर्ख आहे. जयने प्रत्युत्तर दिलं  की तो फक्त त्याच्या तत्त्वांनुसार खेळेल. 15 लाखांपर्यंत नुकसान होऊ शकले असते, पण जयने बक्षिसाच्या रकमेचं अधिक नुकसान केलं आहे, असा दावाही शमिताने केला आहे.

या संपूर्ण घटनेवर काम्यानं ट्विट केलं आहे. ती लिहिते, 'शमिता शेट्टीकडून काय अपेक्षा होती? उर्वरित 25 लाख जिंकण्यासाठी 6 जणांनी शो सोडावा का? पहिलं  कार्य  25 लाखांवर थांबलं असतं हे कसं कळतं? हे फक्त जयवर अवलंबून नव्हतं ! उर्वरित 5 जण काय वरातीत आले का?'

(हे वाचा:Bigg Boss 15: राकेशसोबत या प्रसिद्ध मॉडेलची होणार वाईल्ड कार्ड एन्ट्री ... )

युजर्सनी दिल्या प्रतिक्रिया-

तथापि, शोच्या बहुतेक चाहत्यांनी काम्याशी  असहमती दाखवली आहे. एका यूजरने लिहिलं की, 'जयला 'बिग बॉस'ने मोठा सिग्नल दिला होता की त्यानं टास्क वाया घालवू नये आणि स्वतःसाठी खेळू नये. तसंच खिलाडूवृत्तीला बक्षिसाची रक्कम देण्याऐवजी इतरांना खेळू द्या! प्रत्येकजण जाण्याची त्याची अपेक्षा नव्हती, परंतु जयने खेळातील ट्विस्ट समजून घेण्याइतका हुशारपणा दाखवावा अशी अपेक्षा केली होती." आणखी एकाने ट्विट केलं आहे, "जय भानुशाली हा सर्वात कंटाळवाणा स्पर्धक आहे.  तरीही सगळे जय जयजयकार करत राहा.

First published:

Tags: Bigg boss, Entertainment