मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Bigg Boss 15: बिग बॉसच्या घरात जय आणि प्रतीकमध्ये तुफान राडा; VIDEO आला समोर

Bigg Boss 15: बिग बॉसच्या घरात जय आणि प्रतीकमध्ये तुफान राडा; VIDEO आला समोर

बहुप्रतीक्षित 'बिग बॉस १५' (Bigg Boss 15) ची धमाकेदार सुरुवात झाली आहे. २ ऑक्टोबरला ग्रँड प्रीमियरद्वारे तब्बल १६ स्पर्धक बिग बॉसच्या घरात दाखल झाले आहेत.

बहुप्रतीक्षित 'बिग बॉस १५' (Bigg Boss 15) ची धमाकेदार सुरुवात झाली आहे. २ ऑक्टोबरला ग्रँड प्रीमियरद्वारे तब्बल १६ स्पर्धक बिग बॉसच्या घरात दाखल झाले आहेत.

बहुप्रतीक्षित 'बिग बॉस १५' (Bigg Boss 15) ची धमाकेदार सुरुवात झाली आहे. २ ऑक्टोबरला ग्रँड प्रीमियरद्वारे तब्बल १६ स्पर्धक बिग बॉसच्या घरात दाखल झाले आहेत.

मुंबई, 5ऑक्टोबर- बहुप्रतीक्षित 'बिग बॉस १५' (Bigg Boss 15) ची धमाकेदार सुरुवात झाली आहे. २ ऑक्टोबरला ग्रँड प्रीमियरद्वारे तब्बल १६ स्पर्धक बिग बॉसच्या घरात दाखल झाले आहेत. यावेळी जंगल थीम ठेवण्यात आली आहे. बिग बॉस OTT चे फायनलिस्ट निशांत भट्ट, शमिता शेट्टी आणि प्रतीक सेहजपाल घरातील इतर सर्व सुविधा देण्यात आल्या आहेत. तर दुसरीकडे इतर सर्व स्पर्धकांना जंगलात राहायला सांगितलं आहे. दरम्यान शोमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा सुरु झाला आहे. स्पर्धक एकमेकांसोबत राडे घालताना दिसून येत आहेत. जय भानुशाली(Jay Bhanushali) आणि प्रतीक सहेजपालमध्ये (Pratik Sahejpal) जबरदस्त वाद पाहायला मिळाला.

View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

बिग बॉस १५ च्या घरात स्पर्धकांमध्ये मोठा वादविवाद दिसून आला. बिग बॉस OTT स्पर्धकांना घरातील सर्व सुविधा देत घरावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. याचदरम्यान प्रतीकी आणि जयमध्ये घरातील स्वच्छतेवर तुफान वाद पाहायला मिळाला. नुकताच शोच्या येणाऱ्या एपिसोडच्या झलकमध्ये पाहायला मिळालं. प्रतीक आपल्या शेजारी पडलेल्या कपविषयी विचारतो. हा कप कोणाचा आहे? तसेच प्रतीक म्हणतो आपलं सर्व साहित्य सर्व स्पर्धकांनी ज्या त्या ठिकाणी व्यवस्थित ठेवायला हवं. मात्र यावर जय उत्तर देतो, 'ते कप माझं माझं आहे आणि मी माझ्या घरामध्ये जस राहतो.येथेही तसंच राहणार. आणि त्यांनतर दोघांमध्ये जोरदार वादावादी पाहायला मिळते.

(हे वाचा:Bigg Boss 15: घरात एन्ट्रीच्या आधी तेजस्वीने शेअर केला VIDEO; तर ... )

प्रतीक सतत सांगताना दिसतो की घरातील लोकांची वागणूकिचा त्यांना त्रास होत आहे. तर दुसरीकडे जय त्याला आपला पाठलाग न करण्याचा सल्ला देतो. मात्र प्रतीक एकत नसतो तर दुसरीकडे जय त्याला व्यव्स्थीत आणि हळू आवाजात बोलण्यास बजावतो. मात्र प्रतीक सतत त्याच्या मागेमागे फिरत त्याला इरिटेट करतो. त्यांनतर पुन्हा वाद पेटतो. येणाऱ्या एपिसोडची झलक पाहून सर्वांनाच मोठा राडा होणार असल्याचं लक्षात आलं आहे.

(हे वाचा:Shehnaz Gill या दिवशी शूटिंगवर परतणार; जाणून घ्या डिटेल्स)

दरम्यान प्रतीक जयला म्हणत आहे, 'मला फक्त एकच वाटत आहे, या गोष्टीमुळे तुला दंड होऊ शकतो. मात्र जय त्याला उत्तर देतो असं कुठेही लिहिलेलं नाहीय. की गोष्टीमुळे दंड देण्यात येईल. यावर प्रतीक म्हणतो मला घरात स्वच्छता ठेवायची सवय आहे. त्यामुळे इथेही स्वच्छता ठेवणं तितकंच महत्वाचं आहे. आता या दोघांमध्ये कोण माघार घेतो हे पाहणं महत्वाचं ठरेल.

First published:
top videos

    Tags: Bigg boss, Entertainment