मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Bigg Boss 15: आज ग्रँड प्रीमियरमध्ये सलमान खान स्पर्धकांसोबत लावणार मनोरंजनाचा तडका; वाचा शोच्या सर्व डिटेल्स

Bigg Boss 15: आज ग्रँड प्रीमियरमध्ये सलमान खान स्पर्धकांसोबत लावणार मनोरंजनाचा तडका; वाचा शोच्या सर्व डिटेल्स

 'बिग बॉस १५' (Bigg Boss 15) ची प्रतीक्षा आज अखेर संपणार आहे. दररोज रसिक प्रेक्षकांना मनोरंजाचा डोस मिळणार आहे. आज होस्ट सलमान खानसोबत या शोचा प्रीमियर(Grand premiere) होणार आहे.

  मुंबई, 2 ऑक्टोबर- 'बिग बॉस १५' (Bigg Boss 15) ची प्रतीक्षा आज अखेर संपणार आहे. दररोज रसिक प्रेक्षकांना मनोरंजाचा डोस मिळणार आहे. आज होस्ट सलमान खानसोबत या शोचा प्रीमियर(Grand premiere) होणार आहे. यामध्ये सलमान खान तब्बल १६ स्पर्धकांसोबत मनोरंजनाचा तडका लावणार आहे. नेहमीप्रमाणेच शोमध्ये ग्लॅमर, संगीत, वादविवाद, प्रेम सर्वाचं मिश्रण दिसून येणार आहे. या शोसाठी तुम्हीही उत्सुक असाल तर शोसंबधी या डिटेल्स आवर्जून वाचा. काय असणार वेळ- अत्यंत लोकप्रिय आणि तितकाच विवादित बिग बॉस हा शो आजपासून आपल्या भेटीला येत आहे. आजपासून दररोज आपण हा शो कलर्स वाहिनीवर पाहू शकता. दररोज रात्री १०.३० वाजता तर शनिवार आणि रविवारी रात्री ९. ३० वाजता हा शो आपल्याला पाहता येणार आहे. तर इतर शोप्रमाणे बिग बॉससुद्धा २४ तास VOOT वर पाहता येणार आहे.
  View this post on Instagram

  A post shared by ColorsTV (@colorstv)

  थीम- यावेळी शोमध्ये जंगल थीम पाहायाला मिळणार आहे. सर्व स्पर्धक तब्बल 250 कॅमेऱ्यांच्या देखरेखीत राहणार आहेत. दरम्यान सलमान खानने म्हटलं, 'जंगलमध्ये मंगल होणार की दंगल. मी यावेळी सर्वांच्या चेहऱ्यावर हास्य बघू इच्छितो. काही प्रमाणात भाडणं, काही प्रमाणात रोमान्स. तसेच मी यावेळी काही स्पर्धकांना स्वतःसाठी लढताना बघू इच्छितो तर काहींना आपल्यांसाठी'. (हे वाचा:Bigg Boss 15: घरात एन्ट्रीच्या आधी तेजस्वीने शेअर केला VIDEO; तर प्रतीक सहेजपालन) बिग बॉसचं घर कोणी केलं डिझाईन- बिग बॉसच्या इतर गोष्टींप्रमाणेच रसिकांना बिग बॉसच्या घराचीही उत्सुकता असते. बिग बॉसच्या घरची डिझाईन चाहत्यांना फार पसंत पडते. प्रत्येक सीजनमध्ये घरात गरजेनुसार बदल केले जातात. यावेळीही असेच बदल पाहायला मिळणार आहेत. यावेळी बिग बॉसची थीम जंगलवर आधारित आहे. त्यामुळे यावेळी बिग बॉसच्या घराचं डिझाईन प्रसिद्ध फिल्ममेकर उमंग कुमार यांनी केलं आहे. घराला अगदी जंगल थीममध्ये डिझाईनकरण्यात आलं आहे. (हे वाचा:'Bigg Boss 15' च्या घरात पोहोचण्यासाठी 'हा' असणार बिग टास्क – News18 ... ) या स्पर्धकांची होणार एन्ट्री- बिग बॉस १५ मध्ये आपले कोणते लाडके कलाकार दिसणार याबद्दल चाहत्यांना मोठी उत्सुकता लागून होती. मात्र काही दिवसांपूर्वी स्पर्धकांच्या नावाचा खुलासा झालं आहे. त्यानुसार आज घारमध्ये प्रतीक सहजपाल, शमिता शेट्टी, निशांत भट्ट, जय भानुशाली , तेजस्वी प्रकाश, करण कुंद्रा, अकसा सिंह, डोनल बिष्ट, उमर रियाज, सिंबा नागपाल,साहिल श्रॉफ आणि पंजाबी सिंगर अफसाना खान यांची धमाकेदार एन्ट्री पाहायला मिळणार आहे.
  Published by:Aiman Desai
  First published:

  Tags: Bigg boss, Entertainment, Salman khan

  पुढील बातम्या