Home /News /entertainment /

Bigg Boss 15: करण-तेजस्वीमध्ये फुलतंय नवं नातं? चाहत्यांनी दिलं 'TejRan' असं नाव

Bigg Boss 15: करण-तेजस्वीमध्ये फुलतंय नवं नातं? चाहत्यांनी दिलं 'TejRan' असं नाव

'बिग बॉस' (Bigg Boss 15) या शोचा मोठा चाहतावर्ग आहे. प्रेक्षक या शोची आतुरतेने वाट पाहात असतात. शोमध्ये भांडणे,वादविवाद,मैत्री,खुन्नस,आणि पूर्व सर्व काही एकत्र पाहायला मिळतं.

  मुंबई, 21ऑक्टोबर- 'बिग बॉस' (Bigg Boss 15) या शोचा मोठा चाहतावर्ग आहे. प्रेक्षक या शोची आतुरतेने वाट पाहात असतात. शोमध्ये भांडणे,वादविवाद,मैत्री,खुन्नस,आणि पूर्व सर्व काही एकत्र पाहायला मिळतं. सर्व मसाला एकत्र पाहायला मिळत असल्याने चाहतेही शोकडे आकर्षित होतात. तसेच दरवर्षी शोमध्ये अनेक लव्हस्टोरी(Lovestory) पाहायला मिळतात. यावर्षीसुद्धा आपल्याला मायशा आणि ईशानची लव्हस्टोरी दिसून येत आहे. मात्र अजून एक नातं असं आहे जे प्रेक्षकांना फार आवडत आहे. आणि या दोघांमध्ये मैत्रीच्या पुढं काही घडणार का याची उत्सुकता सर्वांनां लागून राहिली आहे.
  View this post on Instagram

  A post shared by ColorsTV (@colorstv)

  १९ ऑक्टोबरपासून बिग बॉस १५ आपल्या भेटीला आलं आहे. तब्बल १६ स्पर्धकांनी शोमध्ये सहभाग घेतला होता. मात्र आता घरात १३ सदस्य राहिले आहेत. नुकताच बिग बॉसमधून डोनल बिष्ट आणि विधी पंड्याचं शॉकिंग असं एलिमिनेशन झालं होतं. सध्या शोचा तिसरा आठवडा सुरु आहे. तत्पूर्वीच शोमध्ये अनेक इंटरेस्टिंग गोष्टी पाहायला मिळत आहेत. शोमध्ये दररोज राडे होत आहेत. तर दुसरीकडे मायशा आणि ईशान यांची हॉट लव्हस्टोरी दिसून येत आहे.या सर्वांच्या मध्ये एक जोडी अशी आहे. जी प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे. इतकंच नव्हे तर सोशल मीडियावर यांच्याबद्दल जोरदार चर्चा सुरु आहेत. आणि प्रेक्षकांनी यांना 'तेजरण' असं टोपणनावदेखील दिलं आहे. बिग बॉस १५ मध्ये स्पर्धक असलेले तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा यांच्यामध्ये जवळीकता वाढत असल्याचं दिसून येत आहे. शोमध्ये सुरुवातीपासूनच यांच्यामध्ये मैत्री झाली होती. दोघेही सतत एकेमकांसोबत असतात. करण आणि तेजस्वी घरात एकमेकांना चांगले मित्र समजतात. सतत दोघे एकेमकांसाठी बाजू घेताना आणि एकमेकांना आधार देताना दिसून येतात. नुकताच बिग बॉसमध्ये झालेल्या एका टास्कनंतर करण कुंद्रा दुःखी झाला होता. त्यावेळी तेजस्वी त्याच्याशी संवाद साधताना दिसून आली. करणने मन मोकळं करत आपली नाराजी तेजस्वी जवळ व्यक्त केली. यावेळी बोलताना करणनं म्हटलं, 'मला सर्वसामान्यपणे इतका राग येत नाही, मात्र मला माहिती नाही मी इथं कसं सांभाळू. यावर उत्तर देत तेजस्वी तिला म्हणते तू नको काळजी करू तुला जेव्हा राग येईल मी इथे तुला सांभाळून घेईन'. (हे वाचा:Bigg Boss 15:बिग बॉसच्या घरात मायशा अय्यर-ईशान सेहगलने केलं Kiss ... ) फक्त याच वेळी नव्हे तर घरातील इतर अनेक गोष्टींत हे दोघे सोबत असतात. एकमेकांना समजून घेत धीर देताना दिसून येतात. त्यामुळे या दोघांची मैत्री आता नवं वळण घेते कि काय असं सर्वांना वाटत आहे. सध्या सोशल मीडियावर याबद्दल जोरदार चर्चा सुरु आहेत. चाहत्यांना ही जोडी फारच पसंत पडत आहे. सोशल मीडियावर चाहते या दोघांना 'तेजरण' असं नाव देत आहेत. सध्या या दोघांना 'तेजरण' म्हणूनच बोलवलं जात आहे. त्यामुळे भविष्यकाळात बिग बॉसच्या घरात या जोडीमध्ये खरंच मैत्रीपेक्षा अधिक काही घडलं तर ती चाहत्यांसाठी एक प्रकारची मेजवानीच असेल. (हे वाचा:Bigg Boss 15: बिग बॉसच्या घरात जय आणि प्रतीकमध्ये तुफान राडा ... ) सध्या घरातील स्पर्धकांमधील स्पर्धा कठीण होत आहे. यावरून बिग बॉस ट्रॉफी जिंकण्यासाठी लोक किती उत्साहित आहेत हे दिसून येते. घरात रोज नवनवीन ट्विस्ट येत आहेत. घरातील सर्व स्पर्धकांनी नियमांकडे दुर्लक्ष केल्यानंतर बिग बॉसने दोन दिवसांपूर्वी सर्वांना शिक्षा केली होती. यामुळे, मुख्य घरातील लोकही घराबाहेर आले आहेत. आणि 'जंगल रहिवाशां'सोबत राहात आहेत. नव्या एपिसोडमध्ये, सर्व स्पर्धकांनी पुन्हा बिग बॉसचे नियम मोडले आणि यामुळे, बिग बॉसने 'जंगलवासिस' च्या स्वयंपाकघराचा गॅस पुरवठा बंद करून त्यांना सर्व सुविधांपासून वंचित केलं आहे
  Published by:Aiman Desai
  First published:

  Tags: Bigg boss, Entertainment

  पुढील बातम्या