मुंबई, 14 मे- टीव्हीवरील लोकप्रिय रिऍलिटी शो 'बिग बॉस 15'
(Bigg Boss 15) मुळे करण कुंद्रा
(Karan Kudra) चांगलाच प्रसिद्धीत आला आहे. या शो नंतर अभिनेता कंगना राणौतच्या 'लॉक अप'
(Lock Upp) या शोमध्ये जेलरच्या भूमिकेत दिसून आला. सध्या करण 'डान्स दिवाने ज्युनियर्स'
(Dance Diwane Juniors) हा शो देखील होस्ट करत आहे. एकापाठोपाठ एक प्रोजेक्टमध्ये व्यग्र असलेल्या करणजवळ बिग बॉस 15 पासूनच विविध प्रोजेक्ट्स येत आहेत. दरम्यान करण कुंद्रा, अभिनेत्री आणि बिग बॉस 15 ची विजेती तेजस्वी प्रकाशसोबतच्या
(Tejsswi Prakash) रिलेशनशिपमुळेसुद्धा सतत चर्चेत असतो. हा अभिनेता पुन्हा एकदा आपल्या खाजगी आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. करणने नुकतंच मुंबईमध्ये आपलं घर खरेदी केलं आहे.
तेजस्वी प्रकाशसोबतच्या रिलेशनशिपमुळे दररोज चर्चेत असणारा करण कुंद्रा आज मात्र आपल्या नव्या घरामुळे चर्चेत आला आहे. करण कुंद्रा बद्दल अशी चर्चा आहे की, त्याने मुंबईतील वांद्रे येथील एका रॉयल अपार्टमेंटमध्ये एका आलिशान फ्लॅटसाठी रजिस्ट्रेशन केलं आहे. करण कुंद्राने आपल्यासाठी सी फेसिंग अपार्टमेंट रजिस्टर केलं आहे. रिपोर्टनुसार, त्याच्या अपार्टमेंटमधून समुद्राचे उत्तम दृश्य दिसते. सी फेसिंग असण्यासोबतच या फ्लॅटला खाजगी लिफ्ट आणि स्विमिंग पूलदेखील आहे. करण लवकरच या फ्लॅटमध्ये शिफ्ट होणार असल्याचं म्हटलं जात आहे.
करणच्या या नव्या घराची किंमत कोटींच्या घरात आहे. रिपोर्ट्सनुसार, त्याने हा फ्लॅट 20 कोटींहून अधिक रुपयांना विकत घेतला आहे. असं म्हटलं जातं की, करण गेल्या काही महिन्यांपासून चांगल्या घराच्या शोधात होता आणि आता त्याला हे स्वप्नातील घर गवसलं आहे. त्याने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहून चाहत्यांनी असा अंदाज लावला आहे की हा तोच अपार्टमेंट आहे जो त्याने विकत घेतला आहे. या व्हिडिओत त्याचे वडीलसुद्धा दिसत आहेत.
करण कुंद्राने नवं घर खरेदी केल्याचं समजताच चाहते असा अंदाज लावत आहेत की, करण लवकरच तेजस्वीसोबत या घरात शिफ्ट होणार आहे. परंतु करण किंवा तेजस्वीने याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाहीय. 'बिग बॉस 15' मुळे या दोघांची भेट झाली होती. त्यांनतर ते प्रेमात पडले. चाहत्यांना ही जोडी फारच पसंत पडली होती. सोशल मीडियावर त्यांना 'तेजरण' असं नावदेखील देण्यात आलं आहे. याआधी करण कुंद्रा मॉडेल आणि व्हीजे अनुष्का दांडेकरला डेट करत होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.