मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /हॉटेल कॉरिडोरमधेच इंटिमेट झाले मायशा-ईशान; VIRAL VIDEO मुळे 'बिग बॉस' फेम कपल पुन्हा चर्चेत

हॉटेल कॉरिडोरमधेच इंटिमेट झाले मायशा-ईशान; VIRAL VIDEO मुळे 'बिग बॉस' फेम कपल पुन्हा चर्चेत

. 'बिग बॉस 15'च्या सुरुवातीला एका जोडप्याची खूप चर्चा झाली होती. शो सुरू झाल्यानंतर एका आठवड्यातच ईशान सहगल आणि मायशा अय्यर   एकमेकांच्या मिठीत दिसले होते. अनेकांना हा पब्लिसिटी स्टंट वाटला होता; मात्र या जोडीनं हा समज खोटा ठरवला आहे. सध्या ईशान आणि मायशा एकमेकांच्या प्रेमात बुडाल्याचं दिसत आहे.

. 'बिग बॉस 15'च्या सुरुवातीला एका जोडप्याची खूप चर्चा झाली होती. शो सुरू झाल्यानंतर एका आठवड्यातच ईशान सहगल आणि मायशा अय्यर एकमेकांच्या मिठीत दिसले होते. अनेकांना हा पब्लिसिटी स्टंट वाटला होता; मात्र या जोडीनं हा समज खोटा ठरवला आहे. सध्या ईशान आणि मायशा एकमेकांच्या प्रेमात बुडाल्याचं दिसत आहे.

. 'बिग बॉस 15'च्या सुरुवातीला एका जोडप्याची खूप चर्चा झाली होती. शो सुरू झाल्यानंतर एका आठवड्यातच ईशान सहगल आणि मायशा अय्यर एकमेकांच्या मिठीत दिसले होते. अनेकांना हा पब्लिसिटी स्टंट वाटला होता; मात्र या जोडीनं हा समज खोटा ठरवला आहे. सध्या ईशान आणि मायशा एकमेकांच्या प्रेमात बुडाल्याचं दिसत आहे.

पुढे वाचा ...

  मुंबई,2  डिसेंबर-   'बिग बॉस'च्या  (Big Boss)  घरामध्ये स्पर्धकांना बराच काळ एकमेकांच्या सहवासात राहावं लागतं. बाहेरच्या जगाशी त्यांचा संपर्क पूर्णपणे तुटून जातो. अशा परिस्थितीमध्ये स्पर्धकच एकमेकांचा आधार ठरतात. बिग बॉसच्या घरामध्ये आतापर्यंत अनेक प्रेमकहाण्या   (Lovestories)  फुलल्या आहेत. घरामध्ये तयार झालेल्या काही जोड्या स्पर्धेपुरत्या मर्यादित राहिल्या, तर काही जोड्या स्पर्धा संपल्यानंतरही टिकून आहेत. 'बिग बॉस 15'च्याही   (Big Boss 15)   सुरुवातीला एका जोडप्याची (Couple) खूप चर्चा झाली होती. शो सुरू झाल्यानंतर एका आठवड्यातच ईशान सहगल (Ishan Sehgal) आणि मायशा अय्यर   (Miesha Iyer)   एकमेकांच्या मिठीत दिसले होते. अनेकांना हा पब्लिसिटी स्टंट वाटला होता; मात्र या जोडीनं हा समज खोटा ठरवला आहे. सध्या ईशान आणि मायशा एकमेकांच्या प्रेमात बुडाल्याचं दिसत आहे. या दोघांचा एक रोमँटिक व्हिडिओ (Romantic video) व्हायरल झाला आहे.

  View this post on Instagram

  A post shared by Miesha⭐ (@mieshaiyer)

  ईशान आणि मायशा बिग बॉसच्या घरातून बाहेर पडले असून, एकमेकांना वेळ देत आहेत. आता मायशा आणि ईशान सहगलचा एक व्हिडिओ समोर आला आहे. तो व्हिडिओ पाहून चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. मायशा अय्यरनं आपल्या ऑफिशियल इन्स्टाग्राम अकाउंटवर एक रोमँटिक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये मायशा आणि ईशान या दोघांमध्ये कमालीची केमिस्ट्री दिसते. हा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ हॉटेलच्या कॉरिडॉरमधला असून, त्यात मायशा आणि ईशान रोमँटिक झाल्याचं दिसत आहे. दोघांच्या लूकबद्दल बोलायचं झालं तर, मायशानं लाल रंगाचा सुंदर वन-पीस घातला आहे. त्या ड्रेसमध्ये ती हॉट दिसत आहे. ईशान सहगलदेखील काळ्या शर्ट-पँटमध्ये खूपच हँडसम दिसत आहे.

  या व्हिडिओला मायशानं एक खास कॅप्शनही दिळी आहे. 'वाइन, फूड अँड ए मॅन सो फाइन', असं मायशानं त्यात लिहिलं आहे. दोघांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर ईशाननं कमेंटही (Comment) केली आहे, ज्यामध्ये त्यानं मायशावरचं प्रेम व्यक्त केलं आहे. ईशान-मायशाच्या व्हिडिओवर नेटीझन्सनी कमेंट्स केल्या आहेत. काही चाहत्यांनी 'आग लगा दी' अशी कमेंट केली आहे, तर काहींनी आगीचे इमोजी (Emoji) शेअर केले आहेत. काही जणांनी या कपलला ट्रोलदेखील केलं आहे. 'तुम दोनों तो कभी नहीं सुधरोगे, अरे यार कितना फेक हैं दोनों....', अशा शब्दांमध्ये दोघांवर टीका करण्यात आली आहे.

  (हे वाचा:Bigg Boss 15:बिग बॉसच्या घरात मायशा अय्यर-ईशान सेहगलने केलं Kiss ... )

  'बिग बॉस 15'च्या सुरुवातीला ईशान सहगल आणि मायशा अय्यरनं खूप प्रसिद्धी मिळवली होती. शोमध्ये प्रवेश करताच दोघंही खूप लवकर एकमेकांकडे आकर्षित झाले होते. काही दिवसांतच दोघांनी एकमेकांवरचं प्रेमही जाहीरपणे व्यक्त केलं होतं. आता बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतरही दोघांची केमिस्ट्री अजिबात कमी झालेली नाही. दोघेही एकमेकांसोबत भरपूर क्वालिटी टाइम स्पेंड करताना दिसतात. व्हेकेशनला जाण्यापासून ते डिनर डेटपर्यंत (Dinner date) सगळीकडे दोघे एकत्रच दिसतात.दोघांचा व्हिडिओ व्हायरल होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही ईशान आणि मायशाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.

  First published:

  Tags: Bigg boss, Entertainment