Home /News /entertainment /

Bigg Boss 15: दिव्या अग्रवालची बिग बॉसच्या घरात होणार एन्ट्री? बॉयफ्रेंड वरुण सूदच्या ट्विटने केला खुलासा

Bigg Boss 15: दिव्या अग्रवालची बिग बॉसच्या घरात होणार एन्ट्री? बॉयफ्रेंड वरुण सूदच्या ट्विटने केला खुलासा

'बिग बॉस OTT'(Bigg Boss OTT) सुद्धा बिग बॉसप्रमाणे धमाकेदार होता. नुकताच या सीजनचा महाअंतिम सोहळा पार पडला. यामध्ये दिव्या अग्रवालने(Divya Agrwal) बाजी मारत ट्रॉफ आपल्या नावावर केली आहे.

    मुंबई, 25 सप्टेंबर- 'बिग बॉस OTT'(Bigg Boss OTT) सुद्धा बिग बॉसप्रमाणे धमाकेदार होता. नुकताच या सीजनचा महाअंतिम सोहळा पार पडला. यामध्ये दिव्या अग्रवालने(Divya Agrwal) बाजी मारत ट्रॉफ आपल्या नावावर केली आहे. 'बिग बॉस ott' नंतर दिव्या अग्रवालच्या फॅन फॉलोईंगमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे दिव्या सध्या फारच आनंदात आहे. दिव्याचे चाहते आत्ता तिला बिग बॉस १५(Bigg Boss 15) मध्ये पाहू इच्छित आहेत. काही दिवसांपूर्वी दिव्याने म्हटलं होतं, जर तिला शो मेकर्सकडून कॉल आला तर ती नक्की बिग बॉस १५ मध्ये सहभागी होणार. मात्र आत्ता तिचा बॉयफ्रेंड वरुण सूदने(Varun Sood) वेगळाच इशारा दिला आहे. वरुण सूदने दिव्याच्या एका चाहतीच्या ट्विटला उत्तर देत मोठा इशारा दिला आहे. दिव्याच्या अनेक चाहत्यांना अशी अपेक्षा आहे. की दिव्याने बिग बॉस १५ मध्ये सहभाग घ्यावा. एका चाहतीने ट्विट करत म्हटलं होतं, 'दिव्याचे चाहते खूपच हेल्पलेस फील करत आहेत. कारण आम्ही आमचा मेसेज तिच्या पर्यंत पोहचवू शकत नाही. आम्हाला वाटतं कि तिने बिग बॉसमध्ये सहभाग घ्यावा. आणि घेतलाच तर पहिल्या दिवसापासून तिने घरात एन्ट्री करावी. किंवा तिने पुढच्या वर्षी परत प्रयत्न करावा. दिव्यामध्ये विनर कॉलीटी आहे. तिच्यामध्ये जिंकण्याची धमक आहे. त्यामुळे आम्हाला वाटतं तिने पहिल्याच दिवशी घरात एन्ट्री घ्यावी'. (हे वाचा:Bigg Boss 15: सलमान खानच्या शोमध्ये या 5 नावांची एन्ट्री झाली ... ) दिव्याच्या चाहतीचा हा ट्विट पाहून, अभिनेता आणि दिव्याचा बॉयफ्रेंड वरुण सूदने यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. वरुणने रिट्विट करत म्हटलं आहे, 'ती त्या लोकांसोबत का लढेल, ज्यांना तिनं आधीच हरवलं आहे'. वरूण सूदच्या या उत्तरावर मोठ्या प्रमाणात संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. काहींनी वरूणला इतका घमंड चांगला नाही भाऊ म्हणत फटकारलं आहे. मात्र वरूणच्या या ट्विटवरून सर्वांनाच अंदाज आला आहे, की दिव्या अग्रवाल 'बिग बॉस १५'मध्ये सहभाग घेणार नाही. बिग बॉस ott मधील स्पर्धक शमिता शेट्टी, निशांत भट्ट आणि प्रतीक सहेजपाल हे बिग बॉस १५ मध्ये सहभाग होणार असल्याचं बिग बॉसच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये जाहीर करण्यात आलं आहे. (हे वाचा:Bigg Boss 15: तारक मेहताची सोनूचं नव्हे तर हा अभिनेतासुद्धा झळकणार ... ) बिग बॉस OTT चा हा पहिला सीजन होता. सुरुवातीलाच स्पष्ट करण्यात आलं होतं. बिग बॉस १५ च्या आधी हा शो डिजिटल प्लॅटफॉर्मवर दाखवला जाणार आहे. ६ आठवड्यानंतर हा शो बिग बॉस १५ च्या रूपात टीव्हीवर शिफ्ट केला जाणार आहे. त्यानुसार या शोचा महाअंतिम सोहळा पार पडला. आणि आता बिग बॉस १५ साठी सर्वजण सज्ज झाले आहेत. येत्या २ ऑक्टोबरला बिग बोस १५ चा ग्रँड प्रीमिअर होणार आहे. यामध्ये सर्व स्पर्धकांचा खुलासा होणार आहे. तत्पूर्वी नुकताच झालेल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये प्रतीक सहेजपाल, शमिता शेट्टी, निशांत भट्टसोबतचं डोनल बिष्ट आणि असीम रियाजचा भाऊ उमर रियाज यांच्या नावाचा खुलासा करण्यात आला आहे.
    Published by:Aiman Desai
    First published:

    Tags: Bigg boss, Entertainment

    पुढील बातम्या