मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

BB 15: अभिजीत बिचुकलेच्या Kiss च्या मागणीवर देवोलीनाची आई भडकली, म्हणाली...

BB 15: अभिजीत बिचुकलेच्या Kiss च्या मागणीवर देवोलीनाची आई भडकली, म्हणाली...

बिग बॉस 15 (Bigg Boss 15) च्या या आठवड्यातील वीकेंड का वारमध्ये शोचा होस्ट सलमान खानने (Salman Khan) घरातील प्रत्येकाची चांगलीच शाळा घेतली. रितेशपासून ते देवोलिना भट्टाचार्जी (Devoleena Bhattacharjee) आणि अभिजीत बिचुकलेला (Abhijeet Bichukale) सलमान खानच्या रोषाला सामोरे जावे लागले.

पुढे वाचा ...
  • Published by:  News18 Trending Desk

मुंबई, 21 डिसेंबर-बिग बॉस 15 (Bigg Boss 15) च्या या आठवड्यातील वीकेंड का वारमध्ये शोचा होस्ट सलमान खानने (Salman Khan) घरातील प्रत्येकाची चांगलीच शाळा घेतली. रितेशपासून ते देवोलिना भट्टाचार्जी (Devoleena Bhattacharjee) आणि अभिजीत बिचुकलेला (Abhijeet Bichukale) सलमान खानच्या रोषाला सामोरे जावे लागले. अभिजीत बिचकुलेने देवोलिना भट्टाचार्जीला 'पप्पी' म्हणजेच KISS साठी विचारले होते. या आठवड्यातील सर्वाधिक चर्चेचा मुद्दा हा किस्सचा ठरला होता. वीकेंड का वारमध्येही सलमान खानने या मुद्द्यावरून अभिजीत आणि देवोलीनाची चांगलीच क्लास घेतली होती. आता देवोलीना भट्टाचार्जीची आई अंतमा यांचेही वक्तव्य देखील याप्रकरणी समोर आले आहे.

एका टास्कदरम्यान अभिजीत बिचकुलेने kiss मागितल्याने देवोलिना भट्टाचार्जी भडकली होती. त्यानंतर तिनं घरात खळबळ उडवून दिली. आता तिची आई अंतिमा यांनीही या प्रकरणी आपले मत मांडले आहे. ETimes च्या वृत्तानुसार, देवोलीनाच्या आईने अभिजित बिचकुलेच्या कृतीवर नाराजी व्यक्त केली आहे आणि त्याला 'फालतू' म्हटले आहे.

वाचा-काजल अग्रवालच्या घरी पाळणा हलणार? Viral Photo मध्ये दिसला बेबी बंप

ETimes च्या रिपोर्टनुसार, देवोलिना भट्टाचार्जीची आई म्हणाली की, 'हे फालतू आहे. ते पाहून मला खूप राग आला. सुरुवातीला मला वाटले की तो तिच्याशी बहिणीप्रमाणे वागतो, म्हणूनच त्याने असे म्हटले असावे. पण, नंतर तो तिला kiss साठी वारंवार विचारत राहिला. यावर सलमान खान आणि इतरांनी सांगितले की, तिनं आधी यावर प्रतिक्रिया द्यायला हवी होती. पण, देवोलीनाला देखील वाटले असेल की तो गंमत करत आहे, असेच मला देखील हे पाहून वाटल्याचे देवोलिना भट्टाचार्जीची आईने सांगितले.

View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

अंतमा पुढे म्हणाल्या की, 'मला पहिल्यापासून अभिजीत आवडत नाही.' याशिवाय त्या रश्मी आणि देवोलिना यांच्यातील भांडणावरही व्यक्त झाल्या. मला वाटते रश्मी स्वार्थी आहे. मागच्या सीजनमध्ये मी देवोलीनाला तिच्यापासून दूर राहण्यास सांगितले होते. पण, आम्ही चांगले मैत्रिणी आहोत, असे ती म्हणाली असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

वाचा-बिग बॉस मराठीची स्पर्धक मीनल शाहच्या सपोर्टमध्ये उतरला प्रिन्स नरूल्ला

'तेव्हा मी जाऊ दिले, पण आता मला वाटतं देवोलीनाला कळलं असेल की मी तिला आधीच इशारा का दिला होता.' यासोबतच येत्या आठवड्यात दोघींमध्ये सर्व काही ठीक होईल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली आहे. रश्मी देसाई आणि देवोलिना भट्टाचार्जी यांच्यात आजकाल बरीच चकमक सुरू आहे. तर, बिग बॉस 13 च्या सीजनमध्ये दोघांचे नाते खूप चांगले होते. त्याच वेळी, सीजन 15 मध्ये देखील सुरुवातीला दोघींमध्ये खूप चांगले बाँडिंग होते.

First published:

Tags: Bigg boss, Bollywood News, Entertainment, Salman khan