Home /News /entertainment /

BIG BOSS 15 : अभिजित बिचुकलेंनी सलग सहा तास किसिंग सीन केलेत? धक्कादायक खुलासा

BIG BOSS 15 : अभिजित बिचुकलेंनी सलग सहा तास किसिंग सीन केलेत? धक्कादायक खुलासा

अभिजित बिचुकले एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आले आहेत. बिग बॉसच्या घरात आता येत्या एपिसोडमध्ये बिचुकलेंच्या बाबत खूप मोठा आणि धक्क्दायक खुलासा होणार आहे.

    मुंबई, 16 जानेवारी : मराठी 'बिग बॉस' सिझन 2 मध्ये प्रसिद्ध झालेले अभिजित बिचुकले सध्या हिंदी 'बिग बॉस' सिझन 15 मध्ये प्रचंड धुमाकूळ घातलाना दिसत आहेत. इतर स्पर्धकांच्या तुलनेत ते खेळामध्ये काहीसे कमी पडताना दिसत असले तरी ते कोणत्यातरी कारणाने निश्चितच चर्चेत येतात. त्यांची बोलण्याची शैली, आक्रमकपणा, विनोदी वृत्ती किंवा विनोद सहन करण्याची वृत्ती पाहिल्यानंतरच ते प्रेक्षकांना आकर्षित करतात. पण हिंदी बिग बॉसच्या घरात त्यांनी घेतलेल्या काही भूमिकांमुळे घरातील अनेक सदस्यांच्या विरोधाला त्यांना सामोरं जावं लागलेलं आहे. विशेष म्हणजे आता अभिजित बिचुकले एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आले आहेत. बिग बॉसच्या घरात आता येत्या एपिसोडमध्ये बिचुकलेंच्या बाबत खूप मोठा आणि धक्क्दायक खुलासा होणार आहे. खरंतर सोशल मीडियावर येत्या एपिसोडचा एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या एपिसोडमध्ये 'पर्दाफाश रिपोर्टिंग' नावाच्या सेगमेंटद्वारे अनेक धक्कादायक खुलासे होणार आहेत. या टास्कमध्ये तेजस्वी प्रकाश अभिजित बिचुकलेंबद्दल प्रचंड धक्कादायक खुलासा करणार आहे. बिचुकले दादाने एका म्युजिक व्हिडीओत 6 तासांचा किसिंग सीन केला होता, असं तेजस्वी म्हणते. बिचुकलेंबद्दलचा हा खुलासा ऐकून घरातील सर्वच सदस्याना मोठा धक्का बसतो. (Fitness साठी आकाश ठोसर घेतोय अशी मेहनत! तुम्हीही पाहा परश्याचा जबरदस्त VIDEO) येत्या एपिसोडमध्ये काही पत्रकार घरातल्यांना प्रश्न विचारताना दिसतील. यावेळी रश्मी देसाई अभिजित बिचुकलेंवर भडकताना दिसेल. बिचुकले महिलांप्रती वाईट विचार करतात, असं रश्मी यावेळी बोलते. रश्मीच्या वक्तव्यानंतर अभिजित बिचुकले भडकतात. "हे वारंवार बोलून माझी इमेज डॅमेज केली जात आहे", असं बिचुकले म्हणतात. त्यावर रश्मी बिचुकलेंना इडियट असं म्हणते. तर त्यावर अभिजित बिचुकले हे रश्मीला इडियट तुझा संपूर्ण परिवार असं म्हणतात.
    विशेष म्हणजे अभिजित एवढ्यावरच थांबत नाहीत. ते कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून आलेल्यांशीदेखील वाद घालतात. त्यावर सलमान खान त्यांना शांत राहण्याचा सल्ला देतात. तर दुसरीकडे देवोलीना राखी सावंत बद्दल शॉकिंग खुलासा करते. राखी दोन दिवस जेलमध्ये जाऊन आलीय, असं देवोलीना म्हणते. रविवारच्या एपिसोडचा हा प्रोमो बघितल्यानंतर एपिसोडमध्ये भरपूर भन्नाट गोष्टी बघायसा मिळण्याची शक्यता आहे.
    Published by:Chetan Patil
    First published:

    पुढील बातम्या