• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • Bigg Boss 15: मायशा अय्यरच्या पालकांच्या निधनाबाबत ऐकून रडू लागली शमिता; प्रतीकने दिला धीर

Bigg Boss 15: मायशा अय्यरच्या पालकांच्या निधनाबाबत ऐकून रडू लागली शमिता; प्रतीकने दिला धीर

नुकताच बिग बॉसच्या घरामध्ये 'जंगल में खुंखार दंगल' हा अनोखा टास्क पाहायला मिळाला. यावेळी जंगल आणि बिग बॉसच्या घरातील इतर स्पर्धकांमध्ये जोरदार टक्कर पाहायला मिळाली.

 • Share this:
  मुंबई, 14ऑक्टोबर- 'बिग बॉस १५'(Bigg Boss 15) मध्ये स्पर्धकांना विविध टास्क देले जात आहेत. दरम्यान 'जंगल में खुंखार दंगल' या टास्क दरम्यान शमिताला(Shamita Shetty) मायशा अय्यरचं(Miesha Iyer) सॅन्डल खराब करायचं असतं. या टास्क नंतर शमिताला स्वतःला वाईट वाटतं आणि ती आपल्या या वर्तवणुकीसाठी मायशाची माफी मागते. यावर मायशा तिला म्हणते 'प्रतीकला (Pratik Sahejpal) माहिती आहे, कि माझ्याकडे बाहेर कोणीही नाही जो मला हे साहित्य पाठवेल'. यावर प्रतीकसुद्धा मायशाची माफी मागतो आणि तिला आलिंगन देतो. नुकताच बिग बॉसच्या घरामध्ये 'जंगल में खुंखार दंगल' हा अनोखा टास्क पाहायला मिळाला. यावेळी जंगल आणि बिग बॉसच्या घरातील इतर स्पर्धकांमध्ये जोरदार टक्कर पाहायला मिळाली. प्रत्येक स्पर्धकाने आपल्या टास्कसाठी शंभर टक्के दिले आहेत. दरम्यान शमिता शेट्टीला मायशा अय्यरचे सॅन्डल खराब करायचे होते. आणि शमिताने ते केलंही मात्र त्यांनतर तिला स्वतःला वाईट वाटलं. यावेळी शमिताने तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. त्यावर मायशाने म्हटलं , 'प्रतीकला माहिती आहे माझ्यासाठी घरात या सर्व वस्तू पाठवण्यासाठी कोणीही नाही'. त्यांनतर शमिता किचनमध्ये असताना प्रतीकला विचारते मायशाने असं का म्हटलं? यावर उत्तर देत प्रतीक म्हणतो, 'मायशाचे आई-वडील आता या जगात नाहीत'. हे ऐकून शमिता भावुक होते, आणि ती रडू लागते. यावेळी प्रतीक तिला धीर देतो. (हे वाचा:Bigg Boss 15: Kissing व्हिडीओ VIRAL होताच चर्चेत आली मायशा अय्यर ...  ) त्यांनतर शमिता प्रतीकला मायशाला बोलवण्यास सांगते, प्रतीक मायशाला हाक देऊन बोलावतो. यावर मायशा आपण पीठ मळण्याच्या कामात असल्याचं सांगते. नंतर शमिता तिची माफी मागते. तिच्याजवळ जाऊन तिची दिलगिरी व्यक्त करते. आणि तिला आलिंगन देते. त्यांनतर आपली सॅन्डल्स काढून मायशाला सांगते यातील तुला जे आवडेल ते तू निवड. मायशा यासाठी नकार देते. मात्र शमिता तिला म्हणते तुझ्याकडे कोणताच पर्याय नाही. तुला यातील कोणतंही सॅन्डल निवडावचं लागेल. (हे वाचा:Bigg Boss 15:बिग बॉसच्या घरात मायशा अय्यर-ईशान सेहगलने केलं Kiss ...  ) यावर मायशा तिला म्हणते मी एक जंगलवासी असल्या कारणाने घरातील कोणत्याही सदस्याकडून काहीही घेऊ शकत नाही. आम्हाला तशी परवानगी नाही. यावर उत्तर देत शमिता तिला म्हणते तू यातील सॅन्डल निवडून बॉक्समध्ये ठेवून दे. तुला जेव्हा शक्य होईल तेव्हा तू ते तुझ्याकडे घे. यावर मायशा तिला म्हणते माझे सॅन्डल इतके महाग नव्हते. यावर शमिता तिला सांगते मी या बॉक्समध्ये ठेऊन देत आहे. तुला हवं तेव्हा तू घे.
  Published by:Aiman Desai
  First published: