मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Bisexual आहे Bigg boss ची ही स्पर्धक; मुलांबाबत आकर्षण पण...; लग्नाबाबत उलगडलं मोठं गुपित

Bisexual आहे Bigg boss ची ही स्पर्धक; मुलांबाबत आकर्षण पण...; लग्नाबाबत उलगडलं मोठं गुपित

कुणाशी लग्न करणार बायसेक्शुअल असलेली मूस जट्टाना

कुणाशी लग्न करणार बायसेक्शुअल असलेली मूस जट्टाना

बिग बॉसची (Bigg boss) स्पर्धक मूस जट्टानाने (Moose Jattana) ती बायसेक्शुअल (Bisexual) असल्याचं सांगितलं.

मुंबई, 12 ऑगस्ट : भारताचा सर्वांत मोठा आणि सुपरहिट रिअॅलिटी शो असलेला बिग बॉस (Big Boss 15) नवीन पर्वासह आता ओटीटी (OTT) या डिजिटल प्लॅटफॉर्मवर दाखल झाला आहे. चार दिवस झाले नाहीत तोपर्यंतच या स्पर्धकांमध्ये वादावादीला सुरुवात झाली असून, प्रत्येक स्पर्धकाविषयी अनेक धक्कादायक बाबी पुढं येत आहेत. या शोमध्ये निशांत भट्टचं कनेक्शन बनून मूस जट्टाना (Moose Jattana)  ही 20 वर्षीय गोंडस दिसणारी, बबली स्वभावाची तरुणी सहभागी झाली आहे. पहिल्याच दिवसापासून तिने प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे. मात्र तिच्या एका कबुलीनं सर्वांनाच धक्का बसला आहे. तिनं स्वतःच्या बाबतीतलं अतिशय धक्कादायक गुपित या शोमध्ये उघड केलं आहे.

मूसनं ती बायसेक्शुअल (Bisexual) असल्याचं कबूल केलं असून, मुलांकडेही ती आकर्षित होत असल्याचं सांगितलं आहे. मात्र एखाद्या मुलीबरोबर तिचं नातं अधिक घट्ट असेल तर ती एखाद्या मुलाबरोबर लग्न करून सेटल होण्याऐवजी त्या मुलीबरोबर सेटल होण्याला प्राधान्य देईल, असंही तिनं स्पष्ट केलं आहे.

हे वाचा - BB OTT: स्वतःला Bisexual घोषित करणाऱ्या मूस जट्टानाचे अतरंगी PHOTO

मूळची पंजाबमधल्या (Punjab) मोहालीची (Mohali) असलेल्या मूसचं खरं नाव मुस्कान जट्टाना (Muskan Jattana) असं आहे. ती सोशल मीडिया एनफ्ल्युएन्सर, ब्लॉगर, यू-ट्यूबर असून, इन्स्टाग्रामवर तिचे एक लाख 75 हजार फॉलोअर्स आहेत. विविध विषयांवर बिनधास्त मतं व्यक्त करण्यासाठी ती ओळखली जाते. महिलांच्या हक्कांसाठी ती नेहमीच आवाज उठवते. तिचा ‘व्हायरल मूस’ हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप चर्चेत होता.

हे वाचा - रुबिनाला पाहून पती अभिनव शुक्ला झाला हैराण;अभिनेत्रीचे सुपरहॉट फोटो होतायत VIRAL

मुस्कानचे आई-वडील मोहालीत राहत असले, तरी मुस्कान मात्र दिल्लीत राहते. गायक सिद्धू मुसेवाला याची ती कट्टर चाहती असून, म्हणूनच कदाचित ती स्वतःला मूस (Moose) म्हणवून घेते, असं सांगितलं जातं. तिचे मित्र आणि चाहतेही आता तिला याच नावाने हाक मारतात. ठाम मत असणाऱ्या मूसचं बिग बॉसच्या घरात फक्त तीन ते चार लोकांशी चांगलं पटतं. त्यात प्रतीकशी तिची चांगली मैत्री झाली आहे. दोन-चार दिवसांतच तिचा अक्षरा सिंह, मिलिंद गाबा यांच्याशी वाद झाला आहे.

First published:

Tags: Big boss, Entertainment