चाहत्यांनी सोशल मीडियावर 'BringBackDonal' हा ट्रेंड देखील चालवला आहे. 'एक दीवाना था' आणि 'दिल तो हैप्पी है जी' सारख्या लोकप्रिय टीव्ही शोमध्ये अभिनय करणारी डोनल शोच्या पहिल्या दोन आठवड्यांत प्रेक्षकांकडून मिळालेल्या प्रेमामुळे खूप आनंदी आहे.डोनलने न्यूज 18 शी शोमधील तिचा प्रवास, तोलामोलाचे समीकरण आणि सोशल मीडियावरील 'BringBackDonal' ट्रेंडबद्दल संवाद साधला आहे. यावेळी बोलताना डोनाल म्हणाली, 'मला लोकांकडून प्रचंड प्रेम मिळालं आहे, ज्याबद्दल मला माहिती नव्हतं. ते छान होतं. बिग बॉसच्या घरात मी जे काही करत होते, ते मी माझ्या मनाप्रमाणे करत होते. मी नेहमीच म्हटलं आहे की मी सत्याच्या बाजूने उभी राहीन, जे बरोबर आहे त्याच्या पाठीशी उभी राहीन. मी कोणतीही रणनीती आखून घरात गेले नव्हते.लोक माझ्याशी ज्याप्रकारे वागत होते त्याप्रमाणे मी लोकांशी वागत होते. मला लोकांकडून खूप प्रेम मिळालं आहे, हे हेच दर्शवतं की लोक माझ्यावर मनापासून प्रेम करतात. चाहते पाहू शकतात की मी एकमेव योद्धा आहे ज्यांना लोक बाजूला ठेवत आहेत. (हे वाचा:Bigg Boss 15:बिग बॉसच्या घरात मायशा अय्यर-ईशान सेहगलने केलं Kiss ... ) बिग बॉसमधून बाहेर येण्यावर काय म्हणाली डोनल- 'बिग बॉसच्या घरातून बेदखल करण्याबाबत डोनल म्हणाली, 'मी भूमिका घेत होते, यामुळे स्पर्धक मला घाबरत होते. ते मला बोलू देत नाहीत आणि मला कोणत्याही संभाषणात सहभागी होऊ देत नाहीत.अफसाना खानने सांगितले की, काही स्पर्धक मला शोमधून काढून टाकण्याचा कट रचत होते'.ती जय (भानुशाली), तेजस्वी (प्रकाश) आणि विशाल (कोटियन) सोबत होती जेव्हा ते पहिल्यांदा मला शोमधून बाहेर काढण्याची योजना आखत होते आणि कट करत होते. 'तिच्याशी बोलू नका, तिची कदर करू नका. ती कॅमेऱ्यावर दिसणार नाही.असं त्यांचं चाललं होतं;.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bigg boss, Entertainment