मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /'BB 15' मधून OUT होताच व्हेकेशनवर निघाले मायशा-ईशान; लव्ह बर्ड्सचा एयरपोर्ट VIDEO होतोय VIRAL

'BB 15' मधून OUT होताच व्हेकेशनवर निघाले मायशा-ईशान; लव्ह बर्ड्सचा एयरपोर्ट VIDEO होतोय VIRAL

मायशा अय्यर  (Miesha Ayyar) आणि ईशान सेहगल  (Ishan Sehgal)  यांना गेल्या आठवड्यात 'बिग बॉस 15' (Bigg Boss 15)  मधून बाहेर काढण्यात आलं आहे . बिग बॉस 15 सुरू झाल्यानंतर काही दिवसांतच मायशा आणि ईशानने घरात एकमेकांवर प्रेम व्यक्त केले होते.

पुढे वाचा ...

मुंबई, 12 नोव्हेंबर- मायशा अय्यर  (Miesha Ayyar) आणि ईशान सेहगल  (Ishan Sehgal)  यांना गेल्या आठवड्यात 'बिग बॉस 15' (Bigg Boss 15)  मधून बाहेर काढण्यात आलं आहे . बिग बॉस 15 सुरू झाल्यानंतर काही दिवसांतच मायशा आणि ईशानने घरात एकमेकांवर प्रेम व्यक्त केले होते. त्यांच्या रोमान्सच्या चर्चेवरही लोकांनी प्रश्न उपस्थित केले. अनेकांना या दोघांचा रोमान्स खोटा वाटला. बिग बॉसच्या बाकी स्पर्धकांचाही असा विश्वास होता की शोमध्ये राहण्यासाठी दोघेही प्रेमात असल्याचे नाटक करत होते.

पण, आता दोघांनीही आपल्या नात्यावर शिक्कामोर्तब केल्याचे दिसत आहे. गुरूवारी माईशा आणि ईशान एअरपोर्टवर स्पॉट झाले होते. दोघांनी एकमेकांचा हात धरलेला दिसला. बॉलिवूड पॅप इंस्टाग्राम हँडलनुसार, दोघेही सुट्टीसाठी गोव्याला रवाना झाले आहेत. एअरपोर्टवर मायशा व्हाइट टॉप आणि ब्लॅक शॉट्समध्ये दिसली, तर इशान सहगल व्हाइट जीन्स आणि डेनिम जॅकेटमध्ये होता.

दोघेही एकमेकांसोबत अतिशय रोमँटिक मूडमध्ये दिसले. काही दिवसांपूर्वी न्यूज18 सोबतच्या संवादात दोघांनीही त्यांच्या नात्याबद्दल मोकळेपणाने सांगितले होते. मायशा अय्यर म्हणाली होती की, 'आपल्या सर्वांमध्ये विचार करण्याची ताकद आहे. लोक म्हणतात की आमचं नातं खोटं होतं. पण मला सांगायचं आहे की, जर आम्ही खरंच काहीतरी प्लॅन केलं असतं तर आम्ही काहीतरी चांगलं केलं असतं. पहिल्या आठवड्यातच हे मान्य केलं नसतं. त्या गोष्टीला आम्ही आणखीन लांबवलं असतं.

(हे वाचा:Bigg Boss 15: अफसाना खानला बिग बॉसमधून दाखवला बाहेरचा रस्ता; हिंसेमुळे झाली OUT)

मायशा पुढे प्रश्न विचारते, 'जेव्हा 10 वर्षे एकत्र राहूनही लोक वेगळे होतात. लग्ने तुटतात, मग आपण 3 दिवसात प्रेमात का पडू शकत नाही?' मायशा अय्यर पुढे म्हणाली, 'लव्ह लाइफमध्ये वैधता कालावधी आणि कालबाह्यता तारीख सोबत येत नाही. जेव्हा व्हायचे असते तेव्हा असे घडते आणि आमच्या बाबतीत असे घडले. बिग बॉसच्या घरात, एक आठवडा एका महिन्यासारखा असतो, तुम्ही एकमेकांसोबत 24 तास घालवता. आम्ही खूप वेळ एकत्र घालवला.

First published:
top videos

    Tags: Bigg boss, Entertainment