मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Bigg Boss 15: अफसाना खान पुन्हा आऊट ऑफ कन्ट्रोल; VIP तिकीट नं मिळाल्यानं उचलला चाकू

Bigg Boss 15: अफसाना खान पुन्हा आऊट ऑफ कन्ट्रोल; VIP तिकीट नं मिळाल्यानं उचलला चाकू

बिग बॉस 15  (Bigg Boss 15)  पहिल्या दिवसापासूनचप्रेक्षकांचं जबरदस्त मनोरंजन करत आहे. येत्या एपिसोडमध्ये आणखी काही ट्विस्ट येणार आहेत. बिग बॉसच्या आगामी एपिसोड्समध्ये एक भयानक वळण पाहायला मिळणार आहे. शोची स्पर्धक आणि पंजाबी गायिका अफसाना खान   (Afsana Khan)  पुन्हा एकदा नियंत्रणाबाहेर गेल्याचे पाहायला मिळणार आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 10 नोव्हेंबर- बिग बॉस 15  (Bigg Boss 15)  पहिल्या दिवसापासूनचप्रेक्षकांचं जबरदस्त मनोरंजन करत आहे. येत्या एपिसोडमध्ये आणखी काही ट्विस्ट येणार आहेत. बिग बॉसच्या आगामी एपिसोड्समध्ये एक भयानक वळण पाहायला मिळणार आहे. शोची स्पर्धक आणि पंजाबी गायिका अफसाना खान   (Afsana Khan)  पुन्हा एकदा नियंत्रणाबाहेर गेल्याचे पाहायला मिळणार आहे. शोमध्ये व्हीआयपी तिकीट न मिळाल्यानंतर अफसानाचा उग्र रूप पाहायला मिळणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, प्रसिद्ध पंजाबी गायिका अफसाना खान शोमधून बाहेर झाली आहे. तिला शोमधून बाहेर काढण्याची अनेक कारणे समोर येत आहेत.

View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

एका टास्क दरम्यान, घरातील कॅप्टन उमर रियाझला करण कुंद्रा, निशांत भट, तेजस्वी प्रकाश आणि अफसाना खान यामधून तिघांची निवड करायची होती. त्याने अफसाना सोडून इतर तीन स्पर्धकांची निवड केली. उमर रियाझच्या या निर्णयानंतर ती खूप संतापलेली दिसणार आहे. अशातच ती आपल्या रागावर नियंत्रणसुद्धा गमावणार आहे. हे लवकरच आपल्याला पाहायला मिळणार आहे. किचन एरियाजवळ बसलेली असताना, अफसाना शमिता शेट्टी, जय भानुशाली, करण कुंद्रा, उमर रियाझ यांना सांगते की सर्वांचाच स्पष्टपणे तीच निशाणा होती. आणि त्यांना तिला काढून टाकायचे होते. अफसाना म्हणते की हा शो नातेसंबंध टिकवून ठेवण्याबद्दल नाही. आणि आरडाओरडा सुरू करते आणि स्वतःला मारहाण करते. ती पुढे म्हणते की त्यांनी चुकीच्या व्यक्तीला आव्हान दिले आणि आता सर्व नियंत्रणाबाहेर गेले.

वास्तविक, उमर, तेजस्वी आणि करण यांच्याशी अफसानाचे खूप जवळचे नाते आहे. आणि तिला तिच्या मित्रांनी सोडून दिल्याचं दुःख होतं. जय भानुशाली तिला समजावून सांगतो की ती नाराज होणारच आहे, पण तितकीशी नाही. काही सेकंदात, अफसाना खान चाकू उचलते आणि काही वस्तू फेकून स्वत: ला इजा करण्यासाठी जाते. उमर रियाझ, जय भानुशाली आणि करण कुंद्रा तिला थांबवण्यासाठी तिच्याकडे धावतात आणि तिला शांत करण्याचा प्रयत्न करताना दिसतात, परंतु ती नियंत्रणात येत नाही.

(हे वाचा:Bigg Boss 15: बिग बॉसच्या घरातून राकेश बाटपला रुग्णालयात केलं दाखल; या गंभीर....)

अशी बातमी आहे, की उमर रियाझने अफसानाला व्हीआयपी झोनमधून बाहेर काढल्यानंतर या गायिकाचे स्वतः वरील नियंत्रण सुटले. यादरम्यान अफसानाचे शमिता शेट्टीसोबत कडाक्याचे भांडण होते. मारामारीदरम्यान अफसाना शमिता शेट्टीसोबत फिजिकल होते. अफसानाने शमिता शेट्टीसोबत फिजिकल होण्याचा प्रयत्न केल्यानंतर बिग बॉसने कुटुंबातील सर्व सदस्यांना लिव्हिंग एरियामध्ये एकत्र येण्यास सांगितले आणि शमितासोबत फिजिकल झाल्यामुळे अफसाना खानला शोमधून बाहेर पडावे लागणार अशी घोषणा बिग बॉस करणार आहेत.

First published:

Tags: Bigg boss, Entertainment