Home /News /entertainment /

Bigg Boss 15: अफसाना खानला बिग बॉसमधून दाखवला बाहेरचा रस्ता; हिंसेमुळे झाली OUT

Bigg Boss 15: अफसाना खानला बिग बॉसमधून दाखवला बाहेरचा रस्ता; हिंसेमुळे झाली OUT

'बिग बॉस 15' (Bigg Boss 15) च्या लेटेस्ट एपिसोडमध्ये एक मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला आहे. व्हीआयपी तिकीट न मिळाल्याने अफसाना खान (Afsana Khan Evicted) चांगलीच संतापलेली पाहायला मिळाली. ती खूप रागावलेली दिसत होती आणि तिने स्वतःला इजा करण्याचा प्रयत्नदेखील केला.

पुढे वाचा ...
    मुंबई, 11 नोव्हेंबर-   'बिग बॉस 15'   (Bigg Boss 15)   च्या लेटेस्ट एपिसोडमध्ये एक मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला आहे. व्हीआयपी तिकीट न मिळाल्याने अफसाना खान  (Afsana Khan Evicted)  चांगलीच संतापलेली पाहायला मिळाली. ती खूप रागावलेली दिसत होती आणि तिने स्वतःला इजा करण्याचा प्रयत्नदेखील  केला. त्याला पॅनिक अॅटॅकही आला होता. रागाच्या भरात तिने डोक्याला हाताने मारायला सुरुवात केली आणि तिने हातात चाकूही उचलला. अफसाना आणि घरातील इतर सदस्यांच्या सुरक्षेसाठी बिग बॉसने अफसाना खानला ताबडतोब घरातून निघून जाण्यास सांगितले. यानंतर अफसाना खान Evicted झाली आहे. वास्तविक पाहता, हे सर्व व्हीआयपी झोन ऍक्सेस टास्क दरम्यान घडले. कॅप्टन उमर रियाझला चार स्पर्धक निवडण्यास सांगण्यात आले ज्यांना VIP बॅच जिंकण्याची संधी मिळेल ज्यामुळे त्यांना गेममध्ये पुढे जाण्यास मदत होईल. अफसाना ही उमरची जवळची मैत्रीण आहे.उमरने निवडलेल्या चार लोकांपैकी ती एक असेल अशी तिची अपेक्षा होती. पण तसं झालं नाही आणि ती नाराज झाली. अफसानाला वाटले की आपला विश्वासघात झाला आहे. आणि तिला तिच्या भावना हाताळता आल्या नाहीत. दरम्यान तिचा स्वतः वरील ताबा सुटला आणि त्यानंतर घरात फार मोठा राडा पाहायला मिळाला. अफसाना खान उमर रियाझ, करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश यांना पाठिंबा देत नसल्याबद्दल ओरडताना दिसत आहे. अफसानाने सर्वांचे जीवन नरक बनवण्याची धमकी दिली आणि तिला काही झाले तर ते जबाबदार असतील असे म्हणते. यानंतर ती स्वत:ला मारायला लागते आणि जोरजोरात रडू लागते. दरम्यान जय भानुशालीने तिला शांत करण्याचा प्रयत्न केला आणि सांगितले की त्यांनी नाराज होणे योग्य आहे.  पण तिने स्वतःची काळजी घ्यावी. घरातील सर्वजण अफसानाला समजावून सांगत होते. मात्र ती किचनच्या स्लॅबमधून चाकू उचलताना आणि स्वतःला इजा करण्याची धमकी देताना दिसत होती. जय आणि इतर कुटुंबीय त्याला वाचवण्यासाठी धावले होते. अफसाना खानने हे पहिल्यांदा केले नव्हते. याआधीही अफसानाला एका टास्कदरम्यान पॅनीक अटॅक आला होता. यामध्येही तिने स्वतःला इजा पोहोचवण्याचा प्रयत्न केला होता. आफसाना डोकं आपटत होती. घरच्यांनीही खूप समजावण्याचा प्रयत्न केला. वीकेंड का वारमध्ये सलमान खाननेही तिला खूप समजावलं होतं. मात्र ती  पुन्हा तशाच प्रकारे वागली आणि बिग बॉसने तिला बाहेरचा रस्ता दाखवला.
    Published by:Aiman Desai
    First published:

    Tags: Bigg boss, Entertainment

    पुढील बातम्या