मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Bigg Boss15: जंगलातील 4 रहिवाशांची झाली घरात एन्ट्री! तर अफसानाने फाडला अकासाचा शर्ट,पाहा VIDEO

Bigg Boss15: जंगलातील 4 रहिवाशांची झाली घरात एन्ट्री! तर अफसानाने फाडला अकासाचा शर्ट,पाहा VIDEO

'बिग बॉस' 15 मध्ये, जंगलात राहणाऱ्या सर्व वनवासींना पहिल्या दिवसापासून मुख्य घराच्या सर्व सुविधांपासून दूर ठेवण्यात आले आहे.

'बिग बॉस' 15 मध्ये, जंगलात राहणाऱ्या सर्व वनवासींना पहिल्या दिवसापासून मुख्य घराच्या सर्व सुविधांपासून दूर ठेवण्यात आले आहे.

'बिग बॉस' 15 मध्ये, जंगलात राहणाऱ्या सर्व वनवासींना पहिल्या दिवसापासून मुख्य घराच्या सर्व सुविधांपासून दूर ठेवण्यात आले आहे.

मुंबई, 16ऑक्टोबर- 'बिग बॉस 15'(Bigg Boss 15) मध्ये प्रेक्षकांचं पहिल्या दिवसापासून पूर्ण मनोरंजन होत आहे. बिग बॉसच्या स्पर्धकांमध्ये प्रेम,राडे, मनोरंजन सर्वकाही एकत्र पाहायला मिळत आहे.टीव्हीवर वेगवेगळ्या पात्रांमध्ये दिसणाऱ्या कलाकारांचा खरा चेहरा सर्वांसमोर येत आहे. बिग बॉसच्या घरात तीन स्पर्धक वगळता आतापर्यंत घरात 13 वनवासी होते. पण यातील 4 स्पर्धक त्यांना दिलेलं टास्क जिंकल्यानंतर जंगलमधून बिग बॉसच्या आलिशान घरात आले आहेत. दरम्यान पंजाबी गायिका अफसाना खानने (Afsana Khan) घरात खळबळ माजवली आहे. अफसानाने नकाशाचे ब्लॉक गोळा करत असताना सिंगर आणि त्याची सह-स्पर्धक आकासा सिंगचा(Akasa Singh) संपूर्ण शर्ट फाडला त्यानंतर घरात प्रचंड गोंधळ उडाला आहे.

View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

'बिग बॉस' 15 मध्ये, जंगलात राहणाऱ्या सर्व वनवासींना पहिल्या दिवसापासून मुख्य घराच्या सर्व सुविधांपासून दूर ठेवण्यात आले आहे. जंगलातून मुख्य घरात प्रवेश करण्यासाठी, बिग बॉसने एक टास्क दिले होते, ज्याचे नाव होते 'जहर का कहर'. या टास्कदरम्यान, वनवासींची तीन टीम तयार करण्यात आली होती. टीम टायगर, टीम डिअर आणि टीम प्लांट. विजेत्या टीमला बिग बॉसच्या मुख्य घरात प्रवेश मिळणार होता.

अफसानाने फाडला अकासाचा शर्ट-

टास्क दरम्यान, अफसाना आणि अकासा यांच्यात जोरदार लढाई झाली. वास्तविक, नकाशाचे ब्लॉक्स गोळा करताना, अफसानाने अकासाचा संपूर्ण शर्ट फाडला होता. त्यानंतर अकासाने रडत संचालक शमिताला सांगितलं, 'माझा संपूर्ण टी-शर्ट कॅमेरासमोर उघड करण्यात आला आहे. त्यांनतर अकासाने एक पांढरे घालून पुन्हा टास्कमध्ये सहभाग दिसून आलं.मात्र अफसाना इथेच थांबली नाही, तर तिने अकासालाही लाथ मारली. त्यानंतर अकासाने म्हटले, की अफसानाने कपडे फाडू नये. निशांतने अफसानाला लाथ मारण्याचे कारण विचारले तर उमरने त्याचा टी-शर्ट अकासाला देऊ केला.

(हे वाचा:Bigg Boss 15 च्या जंगलात झाली भयंकर 'दंगल'! अनेक सदस्य जखमी, पाहा VIRAL VIDEO)

शमिताशी झाला मोठा वाद-

अफसानाच्या या कृत्याबद्दल शमिता शेट्टीने तिला फटकारले असता. तिने शमिताशी वाद घालण्यास सुरुवात केली. या चर्चेदरम्यान अफसानाने शमिताला अनेक चांगल्या-वाईट शब्दांचा वापर केला. तसेच अफसाना शमिताला 'म्हातारी' 'घाणेरडी स्त्री'अशा अनेक आपत्तीजनक शब्दांचा वापरसुद्धा केला आहे. यावेळी घरातील इतर स्पर्धक अफसानाला समजावताना दिसून आले.

(हे वाचा:Bigg Boss 15: Kissing व्हिडीओ VIRAL होताच चर्चेत आली मायशा अय्यर ... )

कोणी जिंकला टास्क-

टीम टायगरमध्ये विशाल, जय, तेजस्वी आणि आकासा होते. टीम डिअरमध्ये मायशा, करण कुंद्रा, उमर रियाज आणि विधी होते. तर टीम प्लांटमध्ये ईशान, सिम्बा, डोनल आणि अफसाना टीम प्लांटमध्ये होते. या टास्कमध्ये शमिता शेट्टीला टास्कचा संचालक बनवण्यात आलं होतं. निशांत भट्ट आणि प्रतीक सहजपाल हे शास्त्रज्ञ होते. टीम टायगर या टास्कमध्ये विजयी झालीहोती, त्यानंतर त्यांना जंगलातून बिग बॉसच्या आलिशान घरात प्रवेश मिळाला आहे.

First published:

Tags: Bigg boss, Entertainment