मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Bigg Boss 15: अभिजित बिचुकलेवर संतापले सर्व स्पर्धक; तर सलमानने करण कुंद्राला दिलं चॅलेंज

Bigg Boss 15: अभिजित बिचुकलेवर संतापले सर्व स्पर्धक; तर सलमानने करण कुंद्राला दिलं चॅलेंज

  'बिग बॉस 15'   (Bigg Boss 15)   च्या चाहत्यांसाठी सलमान खान पुन्हा एकदा धमाकेदार वीकेंड का वार घेऊन येणार आहे. आज 'दबंग खान'आपल्या स्टाईलमध्ये कुटुंबातील सदस्यांच्या कामाचा आठवडाभरातील लेखाजोखा मांडणार आहे.

'बिग बॉस 15' (Bigg Boss 15) च्या चाहत्यांसाठी सलमान खान पुन्हा एकदा धमाकेदार वीकेंड का वार घेऊन येणार आहे. आज 'दबंग खान'आपल्या स्टाईलमध्ये कुटुंबातील सदस्यांच्या कामाचा आठवडाभरातील लेखाजोखा मांडणार आहे.

'बिग बॉस 15' (Bigg Boss 15) च्या चाहत्यांसाठी सलमान खान पुन्हा एकदा धमाकेदार वीकेंड का वार घेऊन येणार आहे. आज 'दबंग खान'आपल्या स्टाईलमध्ये कुटुंबातील सदस्यांच्या कामाचा आठवडाभरातील लेखाजोखा मांडणार आहे.

मुंबई, 4 डिसेंबर-   'बिग बॉस 15'   (Bigg Boss 15)   च्या चाहत्यांसाठी सलमान खान पुन्हा एकदा धमाकेदार वीकेंड का वार घेऊन येणार आहे. आज 'दबंग खान'आपल्या स्टाईलमध्ये कुटुंबातील सदस्यांच्या कामाचा आठवडाभरातील लेखाजोखा मांडणार आहे. वीकेंड का वार मध्ये, सारा अली खान आणि रवीना टंडन या शोमध्ये दिसणार आहेत. त्याचवेळी सलमान खान   (Salman Khan)  पुन्हा एकदा करण कुंद्राला चिथावणी देताना दिसणार आहे. त्याचबरोबर शमिता शेट्टीलाही तिच्या वागणुकीवर धडा शिकवणार आहे.तर दुसरीकडे अभिजित बिचकुलेचा तुफान राडा पाहायला मिळणार आहे.

बिग बॉस 15 चा वीकेंड का वार एपिसोड आज खूप धमाकेदार असणार आहे. मनोरंजनाचा मोठा डोस देण्यासाठी, सारा अली खान आज तिच्या 'अतरंगी रे' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी शोमध्ये येणार आहे. सारासोबत खूप मस्ती केल्यानंतर सलमान खान आज करण कुंद्राची शाळा घेणार आहे. आहे. वास्तविक, एका टास्कदरम्यान प्रतीक सहजपाल आणि करणमध्ये जोरदार भांडण झाले. या लढतीत करणने प्रतीकला लाथ मारली होती.

सलमान खानने करण कुंद्रावर केली टीका-

शोचा एक नवा प्रोमो समोर आला आहे. ज्यामध्ये सलमान खान करण कुंद्रावर जोरदार टीका करताना दिसत आहे. सलमान रागाच्या भरात करण व त्याच्या खेळावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत म्हणतो- 'तुझी अक्कल कुठे गवत चरायला जाते का? जेव्हा तुमच्याकडे शब्द नसतात तेव्हा तुम्ही हातपाय चालवायला लागता.सलमानचा राग पाहून करण खाली मान घालून बसलेला दिसतो.

एवढेच नाही तर रवीना टंडन घरात एक टास्क करण्यासाठी येणार आहे. ज्यामध्ये कुटुंबातील सदस्य या आठवड्यात ज्या कुटुंबातील सदस्यांची चूक असेल त्यांची नावे ठरवतील. रश्मी देसाई अभिजीत बिचुकले याचं नाव घेणार आहे. त्यांनी शमिता शेट्टीबद्दल काही वेळा टिका करत 'मेरी पैरो की जुती है शमिता' असं म्हटलं आहे. याचा खुलासा तिने सलमान खान आणि शमितासमोर केला. हे ऐकून शमिता चिडते आणि म्हणते की त्याने तिच्यासाठी अनेकवेळा घाणेरडे शब्दही वापरले आहेत.

(हे वाचा:जान्हवी कपूरच्या अ‍ॅटिट्यूडवर भडकले युजर्स; VIRAL VIDEO मुळे अभिनेत्री ट्रोल)

स्वतःला योग्य ठरवत अभिजीत सलमान खानला सांगतो की शमिता त्याच्या आडनावाची खिल्ली उडवते आणि म्हणून मी अशा मुलींना पाया खाली घालतो मी. असे म्हणायला मला लाज वाटत नाही. असे म्हणताच संपूर्ण घर अभिजीतच्या विरोधात होऊन समोर येते आणि ओरडते. तो तिथून बाहेर पडतो आणि म्हणतो 'उडत गेला हा शो, मी चांगल्या कुटुंबातून आलो आहे'. त्यामुळे या विकेंडला जबरदस्त राडा पाहायला मिळणार आहे.

First published:
top videos

    Tags: Bigg boss, Entertainment