मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /'मी कुणाच्या बापाला घाबरत नाही'; Big Boss 15 मध्ये VIP म्हणून एंट्री करताच Abhijit Bichukale यांचा राडा

'मी कुणाच्या बापाला घाबरत नाही'; Big Boss 15 मध्ये VIP म्हणून एंट्री करताच Abhijit Bichukale यांचा राडा

अभिजीत बिचकुले (Abhijeet bichukale) यांची बिग बॉस 15 (Bigg boss 15) च्या घरात वाईल्ड कार्ड एंट्री झाली आहे.

अभिजीत बिचकुले (Abhijeet bichukale) यांची बिग बॉस 15 (Bigg boss 15) च्या घरात वाईल्ड कार्ड एंट्री झाली आहे.

अभिजीत बिचकुले (Abhijeet bichukale) यांची बिग बॉस 15 (Bigg boss 15) च्या घरात वाईल्ड कार्ड एंट्री झाली आहे.

  मुंबई, 29 नोव्हेंबर : बिग बॉस (Big Boss) आणि अभिजीत बिचुकले (Abhijit Bichukale) हे समीकरण आतापर्यंत खास ठरलं आहे. सध्या बिग बॉस 15 (Big Boss 15) सुरू आहे. या शोमध्ये आता अभिजीत बिचुकले यांचं आगमन झालं आहे. सध्या ते बिग बॉस 15मध्ये व्हीआयपी स्पर्धक (VIP Contestant) म्हणून सहभागी झाले आहे. बिग बॉसच्या घरात येताच त्यांनी राडा केला आहे.

  रश्मी, देवोलीना, राखी आणि रितेश यांच्या एंट्रीनंतर बिचुकले यांची एंट्री झाल्यानं शोमधल्या स्पर्धकांची झोप पुरती उडाली आहे. सातारा (Satara) इथले रहिवासी असलेले अभिजीत बिचुकले स्वतःला सामाजिक कार्यकर्ते आणि नेता मानतात. राष्ट्रपती आणि पंतप्रधानपदी विराजमान होण्याचं स्वप्नही बिचुकलेंनी पाहिलं असून, त्यांनी निवडणूकही लढवली होती. आता बिग बॉसच्या घरात व्हीआयपी म्हणून येताच त्यांनी आपला तोरा दाखवला आहे.

  Film window ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. ज्यात अभिजीत बिचुकले यांची एंट्री दाखवली आहे. या एपिसोडमध्ये व्हीआयपी स्पर्धक म्हणून आलेले अभिजीत बिचुकले अन्य स्पर्धकांकडे सिंगल बेडची मागणी करतात. 'मी कुणाच्या बापाला घाबरत नाही', असं ते म्हणताना दिसतात.

  हे वाचा - 'आमच्यावेळी हे नव्हतं....'; प्रसाद ओकचा नेमका रोख कुणाकडे?

  बिग बॉसच्या घरात सिंगल बेड फक्त उमरकडे (Umar) असून त्याने तो बिचुकलेंना देण्यास नकार दिला. त्यामुळे बिचुकले चिडले असता, हा प्रश्न सोडवण्यासाठी राखी सावंत (Rakhi Sawant) मध्यस्थी करते आणि ते व्हीआयपी स्पर्धक असल्याचं उमरला सांगते. हे ऐकून उमर अधिकच चिडतो. या वेळी उमर म्हणतो, की 'व्हीआयपी आज असतो उद्या नसतो. मी माझा बेड देणार नाही.' त्यामुळे या दोघांमधलं भांडण विकोपाला गेल्याचं एपिसोडमध्ये दिसून आलं.

  हे वाचा - चाहत्यांचे कृत्य पाहून बॉलिवूडचा 'भाईजान' Salman Khan भडकला, म्हणाला...

  खरंतर बिचुकले काही दिवसांपूर्वीच या शोमध्ये दाखल होणार होते. परंतु, कोरोना (Corona) झाल्यानं हा निर्णय रद्द झाला होता. परंतु, कोरोनातून बरे झाल्यानंतर ते आता शोमध्ये सहभागी झाले आहेत. बिग बॉसच्या घरात येताच त्यांनी उमरशी भांडण करून खळबळ उडवून दिली आहे. अभिजित बिचुकलेंची शोमधली दमदार एंट्री पाहता ते यापुढे कशा पद्धतीनं खेळी करतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

  First published:
  top videos

   Tags: Bigg boss, Entertainment